जड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी चालकासोबत क्लीनरची आवश्यकता नाही, अधिसूचना जारी


मुंबई : जड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी चालकासोबत क्लीनरची आवश्यकता नाही. या संदर्भातली अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांकडून २९ ऑगस्टपर्यंत हरकती आणि सूचना मागण्यात आल्या आहेत. ही माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.


राज्यातील जड मालवाहतूक करणाऱ्या अनेक वाहनधारक संघटनांनी केलेल्या आंदोलनात चालकांसोबत क्लीनर देण्याची अट शिथील करण्याची आग्रही मागणी केली होती. आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने वाहन निर्मिती होत असल्यामुळे क्लीनरची गरज पडत नाही. तरी ही अट कायम ठेवल्यामुळे खर्च वाढत होता. हा खर्च कमी करण्यासाठीच क्लीनरची अट शिथील करण्याची मागणी होत होती. अखेर महाराष्ट्र शासनाने मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव जारी केला आहे. हरकती आणि सूचनांची दखल घेऊन राज्य शासन २९ ऑगस्ट रोजी अंतिम निर्णय जाहीर करणार आहे.


नागरिकांना हरकती - सूचना परिवहन आयुक्त, परिवहन आयुक्त कार्यालय, पाचवा मजला, फाउंटन टेलिकॉम बिल्डिंग, क्र. दोन, एम. जी. रोड, फोर्ट, मुंबई – 400 001 येथे पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


ड्रायव्हर असिस्ट सिस्टीमने सुसज्ज जड मालवाहतूक वाहनामध्ये क्लीनरची आवश्यकता नाही. कारण या वाहनांमध्ये 360 अंश दृश्य कॅमेरा, सर्व ब्लाइंड स्पॉट व मागील भागाचे थेट दृश्य उपलब्ध करून देणारी सुविधा, तसेच ध्वनी आणि दृश्य स्वरूपात इशारे देणारी प्रॉक्सिमिटी अलार्म प्रणाली असते. या सर्व यंत्रणेने सुसज्ज ड्रायव्हर असिस्ट सिस्टीम असल्यास संबंधित जड मालवाहक वाहनासाठी क्लीनरची आवश्यकता नाही.


Comments
Add Comment

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.

नारळासाठी ४५ रुपयांची फोडणी; आवक घटल्याने मुंबईकरांना भुर्दंड

मुंबई : सण, उत्सव कालावधीत नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुंबईकरांना सध्या या नारळासाठी ४५ ते ५० रुपये मोजावे

नरिमन पॉइंट ते वसईपर्यंत १० मार्गांवर होणार जलवाहतूक

मुंबई : महामुंबईत १० मार्गांवर जलवाहतूक सुरू होणार आहे. याद्वारे नव्या विमानतळाला चार मार्ग जोडले जाणार आहेत.

काय चाललंय काय ? एका महिन्यात तीन वेळा बंद पडली मोनोरेल

मुंबई : मध्य मुंबई आणि पूर्वेकडील उपनगरे यांना जोडणारी मोनोरेल ही वेगाने आरामदायी प्रवास करण्यासाठी सुरू

महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांनी 'या' भाषेत घेतली शपथ

मुंबई : आचार्य देवव्रत यांनी सोमवारी १५ सप्टेंबर रोजी सकाळी राजभवनात झालेल्या सोहळ्यात राज्यपालपदाची शपथ