पुण्यात सिंहगडावर पर्यटनाला आलेला युवक अद्याप बेपत्ता! नेमकं काय झालं?

पुणे : सध्या पावसाळी पर्यटनाला चेव फुटला असून, अनेक पर्यटनप्रेमी गड किल्ल्यांवर तसेच निसर्सरम्य ठिकाणी जात आहेत. मात्र, या दरम्यान योग्य काळजी घेतली नाही तर अपघात होण्याच्या घटना अनेकदा घडतात. अशीच एक घटना पुण्यातील सिंहगड येथून समोर येत आहे.


पावसाळी पर्यटनासाठी सिंहगड किल्ला प्रसिद्ध असून या परिसरात दरवर्षी देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येत असतात.  त्यानुसार या वर्षी देखील सिंहगडावर पर्यटकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र यादरम्यान, आपल्या मित्रांसोबत सिंहगड किल्ल्यावर पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटायला आलेला, एक युवक गडावरील तानाजी कड्यावरून पाय घसरून खोल दरीत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गौतम गायकवाड (वय २४) असे बेपत्ता तरुणाचे नाव असून त्याच्यासाठी शोधमोहिम राबवली जात आहे. गौतम हा हैदराबादवरुन मित्रांसमवेत पर्यटनास आला होता.


घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन आणि ग्रामीण पोलीस कर्मचारी, व स्थानिक गिर्यारोहक कार्यकर्ते या तरुणाचा रात्री उशिरापर्यंत शोध घेत होते. जवळपास एक हजार फुटापर्यंत खोल दरीत उतरून आपत्ती व्यवस्थापन पथकाने शोध घेण्याचा प्रयत्न केला. खोल दरीत जाऊन मुसळधार पाऊस, वाऱ्यात बेपत्ता गौतमचा शोध घेतला. मात्र रात्रीच्या अंधारात तो आढळून न आल्याने रात्री ११ वाजता शोधकार्य थांबवले. त्यानंतर, आज सकाळी ६ वाजता पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आलं आहे. सायंकाळी ४ वाजेपर्यंत गौतमचा अद्याप शोध लागलेला नाही.


मिळालेल्या माहितीनुसार, सिंहगड किल्ल्याच्या तानाजी कडा येथे हवा पॉइंटजवळील खोल दरीत पाय घसरून पडल्याने एक युवक बेपत्ता झाला असून घटनास्थळी प्रशासन व पोलीस (Police) कर्मचारी पोहोचले आहेत.  हैदराबाद येथून गौतमसह ५ जणांचा ग्रुप पुणे येथे फिरण्यासाठी आला होता. काल बुधवारी दुपारी ४.३० वाजता ते सिंहगडावर आले, या वेळेस सायंकाळच्या सुमारास तानाजी कड्याजवळ येऊन ते पर्यटनाचा आनंद घेत होते. त्यावेळी, गौतमने लघवीला जाऊन येतो असे मित्रांना सांगितले. मात्र, बऱ्याच वेळानंतरही तो परत आला नाही. त्यामुळे मित्रांनी गौतमचा शोध घेतला असता तो कुठेही आढळून आला नाही. जवळच हवा पॉइंटशेजारी त्याची चप्पल सापडली, मात्र तो दिसला नाही. सिंहगड भागात मुसळधार पाऊस असून, वाऱ्याचा वेगही जास्त आहे. वाऱ्याचा व जमिनीचा अंदाज न आल्याने गौतम खोल दरीत कोसळला असावा असा अंदाज त्याच्या मित्रांकडून लावला गेल्याने गौतमचा शोध घेतला जात आहे.


 
Comments
Add Comment

Job News : नोकरी शोधताय तर ही आहे तुमच्यासाठी बातमी

एसटीच्या रत्नागिरी विभागात ४३४ पदांची भरती रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) रत्नागिरी विभागामध्ये

आता ओबीसींचा महामोर्चा मुंबईकडे, दसऱ्यानंतर रंगणार निर्णायक लढा

मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात मराठा समाजाने आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठं बेमुदत

सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी, अनेक घरांमध्ये घुसले गटाराचे पाणी

सोलापूर : लवकरच परतीचा पाऊस सुरू होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पण राज्यातील काही भागांमध्ये

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती जाहीर

पक्षाला यश मिळण्यासाठी एकनाथ शिंदेंनी कंबर कसली मुंबई (प्रतिनिधी) : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या

बीडमध्ये रस्ते अपघातात नातीसह सरपंचाचा दुर्देवी मृत्यू

बीड: बीडच्या परळी तालुक्यात झालेल्या रस्ते अपघातात एका सरपंचाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. परळी

समृद्धी महामार्गावर खिळे नाही, तर ॲल्युमिनिअम नोजल्स! बेशिस्त कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई

एमएसआरडीसीचे स्पष्टीकरण मुंबई : छत्रपती संभाजीनगर येथील समृद्धी महामार्गावर खीळे लावण्यात आल्याचे काही