पक्षाच्या नावावर दुकानदारी करणाऱ्यांचा बंदोबस्त करणार

  26

अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना इशारा


मुंबई : मला नागपुरात उपमुख्यमंत्रीपदाचा विजयगड बंगला मिळाला आहे. नागपूरच्या या बंगल्यात मी लोकांच्या तक्रारी कार्यकर्त्यांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी खास स्टाफ नेमला आहे. त्या स्टाफने मला सांगितले आहे की, या कार्यालयात जिल्हाध्यक्षासह पदाधिकारी येतच नाहीत. जे येतात त्यांच्या तक्रारी आम्ही ऐकून घेतो आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.


जे तक्रारी घेऊन माझ्या बंगल्यातील कार्यालयात येतात, त्यांना माझा स्टाफ संबंधित कार्यालयात घेऊन जातो आणि तक्रार सोडवण्याचा प्रयत्न करतो. कार्यकर्त्यांनी जनतेमध्ये आपली प्रतिमा चांगली ठेवली पाहिजे. नाहीतर आमच्या आणि पक्षाच्या नावावर कोणी पदाधिकारी आपली दुकानदारी करणार असेल, तर त्याचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी माझी आहे, असे अजित पवार म्हणाले.



सर्व तक्रारी १०० टक्के सोडवता येत नाहीत. तुम्ही मुख्यमंत्री झालात तरी ते सोडवू शकत नाहीत. माझ्या स्वभाव असा आहे, की जे न होणारे काम असतात त्याबद्दल मी लगेच सांगून देतो. विदर्भातील पदाधिकाऱ्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही मला कामाची यादी द्या. मी अधिकाऱ्यांना ती यादी देतो आणि सांगतो की यादीतील नावे असलेले कार्यकर्ते काम घेऊन आले तर ते काम अजित पवाराने सांगितले आहे असे समजून कार्यकर्त्यांचे काम करा, असे अजित पवार म्हणाले. मात्र याद राखा, राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री असून ते नागपूरचे आहेत. त्यामुळे ते जेव्हा नागपूरात असतात, तेव्हा अधिकाऱ्यांना प्रोटोकॉलप्रमाणे त्यांच्यासोबत असणे आणि त्या संदर्भातील काम करणे आवश्यक असते, असे अजित पवार म्हणाले.


माझ्या नागपुरातील बंगल्यातील कार्यालयात कोण कोण येतो, त्याची नोंदवाहीत नोंद घेतली जाते. आजही सर्व पुरावे कोणकोण काम घेऊन तिथे आले हे उपलब्ध आहे. घरी बसून म्हणणार असाल की माझे काम करा, तर असं होणार नाही. हे युतीचे सरकार असल्याचे अजित पवार म्हणाले.



सार्वजनिक हिताच्या कामाला प्राधान्य


तुम्ही काम केले म्हणून लोक मते देतात, हे समीकरण डोक्यातून काढून द्या. कोणत्या कामाला महत्त्व देतात हे लोक पाहत असतात. महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षात होती. तरी त्यांच्या ३१ जागा निवडून आल्या आणि आम्ही सत्तेत होतो तरी आमच्या १७ जागा निवडून आल्याचे अजित पवार म्हणाले. कार्यकर्त्याने अधिकाऱ्यांना सांगितलेला काम नियमात बसणारे असले पाहिजे. नियमाच्या बाहेरचे काम अधिकाऱ्यांवर दबाव आणला तरी तो कसं करणार? अधिकाऱ्याला सांगायचे काम तुमचे वैयक्तिक नसावे, तो सार्वजनिक हिताचे काम असावे असे अजित पवार म्हणाले.

Comments
Add Comment

नोकरदार महिलांच्या मुलांसाठी राज्यात “पाळणा” योजना 

महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी दिशा मुंबई: राज्यातील नोकरदार महिलांच्या

कल्याण-डोंबिवली, चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

मुंबई : कल्याण डोंबिवलीतील काँग्रेसच्या नंदू म्हात्रे, जितेंद्र भोईर, हृदयनाथ

रायगड : पेणमधून यंदा दुप्पट गणेशमूर्ती परदेशात रवाना

रायगड जिल्ह्यातील गणेश मूर्तीकारांचे गाव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पेणमधून यंदा ४५ हजारांहून अधिक गणेशमूर्ती

पुण्यात सिंहगडावर पर्यटनाला आलेला युवक अद्याप बेपत्ता! नेमकं काय झालं?

पुणे : सध्या पावसाळी पर्यटनाला चेव फुटला असून, अनेक पर्यटनप्रेमी गड किल्ल्यांवर तसेच निसर्सरम्य ठिकाणी जात आहेत.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच होणार सुरु, सिडको अधिकाऱ्यांची मोठी माहिती

बहुचर्चित नवी मुंबईत तयार होणारं आंतरराष्ट्रीय विमानतळ आता लवकरच सुरू होणार आहे. या विमानतळावरून सुरुवातीला

पुणे घाट परिसराला ऑरेंज अलर्ट

मुंबई: राज्यात पुढील २४ तासासाठी पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय हवामान विभाग (IMD) आणि