विरार, वसई, नालासोपारामधील अनेक भाग पाण्याखाली, पाऊस अजूनही कायम, रेड अलर्ट जारी

मुसळधार पावसाने वसई, विरार, नालासोपारा परिसराला झोडपून काढलं आहे. गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस या भागात सुरु असून आज बुधवारी देखील पाऊस सुरु आहे. सकाळी रेल्वे सेवा विरार ते अअंधेरी विस्कळीत झाली होती मात्र पुन्हा दुपारी १२ वाजल्यापासून सुरळीत सुरु झाली आहे.

वसई, विरार, नालासोपारामधील काही भाग १२ तासापासून पाण्याखाली आहे. तेथील विद्युत सप्लाय बंद असल्याने नागरीकांचे हाल बेहाल झाले आहेत. काल वसई विरार क्षेत्रात पावसाचं रौद्ररुप पाहायला मिळालं. संपूर्ण वसई विरार जलमय झालं होतं. अनेख सखल भागातील सोसायटीमध्ये पाणी जमा झाल्याने सोसायटीच्या मिटर बॉक्स पर्यंत पाणी गेले होते. त्यामुळे महावितरणाने खबरदारी घेत वीज सप्लाय बंद केला होता. ज्या सोसायटीचे पाणी उतरले तेथील ट्रान्सफार्म सुरु करण्यात आले. माञ अजही वसई विरार आणि नालासोपारातील काही भागातील पाणी ओसरलं नसल्याने लाईट नाही आहे.

जवळपास १२ तासापासून काही ठिकाणी लाईट नाही आहे. विरार येथील गोकुळ टाउनशिप, छेडा नगर, स्टेशन परिसर वसईतील स्टेशन परिसर तसेच माणिकपूर मधील काही भाग, नालासोपारा पूर्वेकडील स्टेशन परिसर, पश्चिमेतील श्रीप्रस्थ रोड, या ठिकाणी काल दुपारी ३ वाजल्यापासून वीज बंद करण्यात आली आहे. राञभर कोसळलेल्या पावसामुळे आताही सोसायटीमध्ये पाणी साचल्याने पाणी ओसरल्यावर तात्काळ वीज प्रवाह सुरु करण्यात येईल अशी माहीती महावितरणाचे अधिक्षक अभियंता संजय खंडारे यांनी दिली आहे.

वसई-विरार : गेल्या चार दिवसांपासून वसई-विरार शहराला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून पूरस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान नालासोपारा पूर्वेतील टाकी रोड, आपना नगर सोसायटी परिसरात पाण्यात मोठमोठे मासे दिसू लागले आहेत. इतकेच नव्हे तर कालपासून या परिसरात सापांचाही वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Comments
Add Comment

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण २०२४’ पुरस्कार

मुंबई : महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या ‘महाराष्ट्र भूषण २०२४’ या पुरस्कारासाठी निवड

शिवसेनेकडून निवडणूक प्रभारींची घोषणा

सिंधुदुर्गची आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकरांवर जबाबदारी मुंबई  : आगामी नगर परिषद व नगरपंचायत

स्थानिक निवडणुकांतून ‘पिपाणी’ वगळली

केंद्रीय निवडणूक आयोगाचा शरद पवारांना दिलासा मुंबई  : शरद पवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी मोठा

लक्ष्य सेनची जपान मास्टर्सच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक

सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेहचा सहज पराभव नवी दिल्ली : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने कुममातो

मुलं आणि शिक्षकांच्या मनाचा ठाव घेईल हे बालदिनाचे प्रभावी भाषण

दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस भारतभर “बालदिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस आपल्या देशाचे

आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात सुरू झाली 'सोलर शाळा'

गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि अंबानी उद्योग समूहातील सदस्य आणि ‘रोझी ब्लू