पुण्यात पावसाचा जोर वाढला, भिडे पूल वाहतुकीसाठी बंद, रेड अलर्ट जारी

गेल्या तीन दिवसापासून पुणे जिल्ह्यात सततच्या मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने मुठा नदी दुथडी भरून वाहत आहे. भिडे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

प्रशासन व एनडीआरएफ पथके सज्ज असून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आलं आहे. एकता नगर परिसर पाण्याखाली गेला असून अनेक सोसायट्या आणि घरांमध्ये कमरेपर्यंत पाणी शिरले आहे. अचानक आलेल्या पाण्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रस्ते जलमय झाल्याने प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

भिडे पूलही पाण्याच्या प्रवाहात धोक्याच्या स्थितीत आल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे जुन्या पुण्यातून जाणाऱ्या वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असल्याने नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. पायाभूत सुविधा विस्कळीत झाल्याने शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

एनडीआरएफची पथकेही पुण्यात सज्ज ठेवण्यात आली आहेत. गरज असल्यास नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची तयारी करण्यात आली आहे. विशेषतः मुठा, मुळा व पवना नदी पात्रातील नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, पुढील काही तासांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांनी गरज असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 
Comments
Add Comment

मराठ्यांना कुणबी दाखले देण्यास सुरुवात

भुजबळांचे गैरसमज दूर करणार, शासननिर्णय व आश्वासनांची पूर्तता करण्याचे मंत्रिमंडळ उपसमितीचे

महापालिका प्रभाग रचनेच्या हरकतींवर उद्या सुनावणी

बालगंधर्व रंगमंदिर सज्ज पुणे : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग

पुणे मेट्रोचे गणेशोत्सवात साडेपाच कोटींचे उत्पन्न

पुणे : मानाच्या प्रमुख बाप्पांचे दर्शन, देखावे आणि विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी गणेशोत्सवातील दहा दिवसांच्या

जनसुरक्षा विधेयकाविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांचे उद्या राज्यभर आंदोलन

मुंबई : राज्यातील भारतीय जनता पक्ष युती सरकारने शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्याच्या नावाखाली आणलेल्या जनसुरक्षा

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

ड्रायव्हिंग करताना मोबाईल-हेडफोन वापरल्यास नोकरी जाणार!

पीएमपीएमएल चालकांसाठी  महत्त्वाची बातमी पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (PMPML) अलीकडेच झालेल्या