मुसळधार पाऊसामुळे शाळेची बस अडकली! मुंबई पोलिसांनी अशी केली विद्यार्थ्यांची सुटका

मुंबई: गेले दोन दिवस मुंबईला पाऊस झोडपतो आहे, अनेक ठिकाणी पाणी साचले असून, वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहेत.  त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या दरम्यानच एक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मुसळधार पाऊसात शाळेला जाणाऱ्या मुलांची बस रस्त्यावर पाणी साचल्यामुळे अडकली होती. गेली तासभर मुलं बसमध्ये अडकून पडली होती. अशावेळी स्थानिकांचा पुढाकार आणि झोन ४ च्या पोलिसांनी तात्काळ मदतकार्य करून मुलांना सुखरूप बाहेर काढले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर देखील प्रचंड व्हायरल होत आहे. पण ही घटना मुंबईत नेमकी कुठे घडली? आणि कोणत्या शाळेची ती बस होती? असे प्रश्न अनेकजण विचारत आहेत. तर याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.


 


मुंबईमध्ये सध्या मुसळधार पाऊसाने हाहाकार केला आहे. भारतीय हवामान खात्याने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला असून आणखीन तीन दिवस देखील अशाचप्रकारे मुसळधार पाऊसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे दुपारच्या शाळा आणि महाविद्यालयांना पूर्ण दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली,  तर सकाळच्या सर्व शाळांना अर्धा दिवसाची सुट्टी देण्यात आली. यादरम्यान मुलांना घरी घेऊन जाणारी शालेय बस पावसाच्या पाण्यात अडकल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.  ज्यामध्ये पोलिस मुलांना बसमधून काढून कंबरेवर घेऊन गुडघाभर पाण्यातून मार्ग काढताना दिसून आले. ही घटना माटुंगा पोलिस ठाण्याजवळ घडली. दिवसभर पडत असलेल्या पावसामुळे येथे पाणी भरले होते. डॉन बॉस्को स्कूलची बस या पाण्यात अडकली. बसमध्ये सहा लहान मुले, दोन महिला कर्मचारी आणि चालक जवळजवळ एक तास अडकून पडले होते.  अशावेळी स्थानिकांनी डीसीपी झोन ४ ला याबद्दलची माहिती दिली. तात्काळ कारवाई करून माटुंगाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र पवार आणि त्यांची टीम घटनास्थळी पोहोचली आणि दोन मिनिटांत सर्वांना वाचवले आणि त्यांना सुरक्षितपणे पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी मुलांची भिती दुर करण्यासाठी त्यांना बिस्किटे देखील दिली.


पोलिसांच्या या कामगिरीचे आता सर्वत्र कौतुक होत आहे. कारण या व्हिडीओमध्ये पोलिस मुलांना आपल्या कडेवर घेऊन पाण्यातून रस्ता काढत सुरक्षित ठिकाणी घेऊन जाताना दिसून येतात. पोलिसांमधली कार्यतत्परता आणि लहान मुलांप्रती त्यांच्यातल्या दर्यादिलीने पाहणाऱ्यांचे मन जिंकले.

Comments
Add Comment

मुंबईकरांचा प्रवास गारेगार , आजपासून २० वातानुकूलित बसमार्ग सुरू

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार आणि प्रदूषणमुक्त करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व

मुंबईत अर्धवट राहिलेल्या ४२५ रस्त्यांच्या कामांना सुरुवात, १५० कामे अद्याप थांबलेलीच

मुंंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या सिमेंट काँक्रिटच्या अर्धवट कामांना आता

मुुलुंड डम्पिंग ग्राऊंडवर धारावी प्रकल्पाचे होणार कास्टींग यार्ड?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याची विल्हेवाट लावून जमिन पुनर्प्राप्त करून देण्याच्या

Rain Update : 'मोंथा' चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, 'मोंथा' (Montha)

दिवाळी हंगामात लालपरीची ३०१ कोटींची कमाई

चांगले उत्पन्न आणल्याबद्दल मंत्री प्रताप सरनाईक यांच्यांकडून कर्मचाऱ्यांचे कौतुक मुंबई

मोनोरेल, मेट्रो सेवांसाठीचा आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा...

जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्षांच्या दिल्या अशा सूचना मुंबई (खास प्रतिनिधी) : सार्वजनिक वाहतूक