कौन बनेगा करोड़पती १७ : पहिल्या आठवड्यातच मिळाला करोडपती, आता प्रश्न ७ कोटींचा!

मुंबई : अमिताभ बच्चन यांचा लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो कौन बनेगा करोड़पती पुन्हा एकदा सीझन १७ सोबत प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोचा नवीन सीझन ११ ऑगस्टपासून सुरू झाला असून पहिल्याच आठवड्यात शोला पहिला करोडपती मिळाला आहे. याचा प्रोमो चॅनलने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. केबीसी १७ चे पहिले करोडपती उत्तराखंडचे आदित्य कुमार आहेत.


आदित्य कुमार हे या सीझनचे पहिले करोडपती ठरले आहेत. विशेष म्हणजे ते ७ कोटींच्या जॅकपॉट प्रश्नासाठीही प्रयत्न करणार आहेत. मात्र ते ७ कोटी जिंकतात का नाही, हे पाहण्यासाठी एपिसोड प्रसारित होईपर्यंत थोडं वाट पाहावं लागेल. प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये या क्षणाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.


प्रोमोमध्ये आदित्य अमिताभ बच्चन यांच्याशी संवाद साधताना दिसतात. ते आपल्या कॉलेजच्या आठवणी शेअर करतात. त्यांनी सांगितले की एकदा कॉलेजच्या काळात त्यांनी आपल्या सगळ्या मित्रांना सांगितले होते की ते केबीसी साठी सिलेक्ट झाले आहेत आणि त्यांनी संपूर्ण आठवडा हा प्रँक केला.


आदित्य म्हणतात, “कॉलेजच्या दिवसांत मी माझ्या सगळ्या मित्रांना सांगितलं की मी केबीसी साठी सिलेक्ट झालोय आणि लवकरच केबीसी टीम शूटसाठी येणार आहे. त्यामुळे सगळे सज्ज झाले. कुणी नवी पँट शिवून घेतली, कुणी नवी शर्ट. आठवड्यानंतर जेव्हा त्यांनी विचारलं की कुणी आलं नाही का, तेव्हा मी सांगितलं की मी मजाक करत होतो.”


यानंतर आदित्य म्हणतात की यावेळी जेव्हा खरंच केबीसी चा कॉल आला, तेव्हा कोणीही विश्वास ठेवला नाही. जेव्हा त्यांना मेसेज दाखवला, तेव्हाच लोकांनी विश्वास ठेवला.


हे ऐकून अमिताभ बच्चन म्हणतात, “पोहोचलेच नाही, खूपच वर पोहोचलात आपण.” पुढे आदित्य अमिताभ बच्चन यांना म्हणतात, “सर, विश्वास बसत नाही.” यावर बिग बी उत्तर देतात, “आपण वरपर्यंत जाणार, ७ कोटींपर्यंत.”आता आदित्य हे ७ कोटींचा प्रश्न खेळून जोखीम घेणार आहेत. ते जिंकतात का नाही, हे पाहणं खूप रोचक ठरणार आहे.

Comments
Add Comment

मुंबईतील कचरा खासगीकरणाच्या निविदेला विलंब

खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबई महापालिकेच्या सफाई खात्याच्यावतीने कचरा उचलण्यासाठी वाहनांसह मनुष्यबळ

दुर्गंधी पसरत नाही की कचरा दिसत नाही, मुंबईतल्या अनोख्या कचरापेट्या

सचिन धानजी, मुंबई : मुंबईत आज कुणालाच आपल्या घरासमोर कचरा नको असतो. तसेच सार्वजनिक कचरा पेट्या असल्यास त्या

मुंबईत साथीच्या आजारांचे वाढले प्रमाण

मुंबई : गेल्या पंधरावड्यात साथीच्या आजारांनी पुन्हा डोके वर काढले. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात

'आपली एसटी' ॲपद्वारे कळणार लालपरीचा ठावठिकाणा - प्रताप सरनाईक

मुंबई : प्रत्येक थांब्यावर एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना एसटीचा अचुक ठावठीकाणा काळावा

नवी मुंबई विमानतळामुळे महामार्गावर 'ट्रॅफिक कोंडी'चा धोका!

विमानतळासाठी वाहतूक 'वळवणार'; पाम बीच रोडवरील गर्दी टाळण्यासाठी 'सिक्रेट प्लॅन' लागू नवी मुंबई: नवी मुंबई

तब्बल १५ वर्षांपासून महिला होती त्रस्त, महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी कायमची केली त्रासातून मुक्तता ..

मुंबई (खास प्रतिनिधी) : रजोनिवृत्तीनंतरच्या रक्तस्त्रावाच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्य ६५ वर्षीय महिलेवर