नांदेड जिल्ह्यात रावणगावचे ग्रामस्थ गाढ झोपेत असताना आभाळ फाटलं

नांदेड : मराठवाड्याच्या काही भागांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. नांदेडच्या मुखेड तालुक्यात रविवारी रात्री ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने सहा गावं पाण्याखाली गेली आहेत. यापैकी दोन गावांमध्ये ८० नागरिक अडकून पडले आहेत. पाण्याची पातळी वाढल्याने या नागरिकांना वाचवण्यासाठी राज्य आपत्ती निवारण दलाला बोलावले आहे. लहान होड्या आणि बोटींच्या साहाय्याने नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उद्गीर येथील धरणक्षेत्राच्या वरच्या भागात पाऊस झाला. त्यामुळे एका रात्रीत 18 फूट पाणी वाढले आहे.

धरणक्षेत्रात प्रचंड पाऊस झाल्याने मुखेड तालुक्यातील सहा गावं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. मुखेड तालुक्यात फारसा पाऊस झालेला नाही. मात्र, तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या उद्गीर येथील धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस झाला आहे. रविवारी रात्री गावकरी झोपल्यानंतर रात्री दोनच्या सुमारास उद्गीर भागात ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामुळे लेंडी नदीला पूर आला. मुखेड तालुक्यातील भेंडेगाव, बुद्रुक, भिंगोली, हसनाळ, रावणगाव, भासवाडी आणि मारजवाडी ही सहा गावं पाण्याखाली गेली आहेत. यापैकी चार गावांमधील नागरिकांना रात्रीच सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले. मात्र, रावणगाव येथील गावठाणात ८० जण अडकले आहेत. तर हसनाळ येथे नऊ जण अडकले आहेत. या सगळ्यांच्या मदतीसाठी सकाळी सहा वाजल्यापासूनच एसडीआरएफ, उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार संपूर्ण यंत्रणेसह बचावकार्यासाठी दाखल झाले आहेत.
Comments
Add Comment

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी

CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि

Amravati : अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूची NHRCकडून स्वतःहून दखल; महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना नोटीस

अमरावती येथील जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात बालकांच्या देखभाल विभागात (SNCU) लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा