पाकिस्तानमध्ये पावसाचा हाहाकार; ३०७ लोकांचा मृत्यू, शेकडो बेपत्ता


इस्लामाबाद: गेल्या दोन दिवसांपासून पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि त्यामुळे आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे आतापर्यंत ३०७ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, शेकडो लोक अद्याप बेपत्ता आहेत. ही यंदाच्या मान्सूनमधील पाकिस्तानातील सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती मानली जात आहे.


पावसामुळे सर्वाधिक नुकसान वायव्य पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा प्रांतात झाले आहे. येथील प्रादेशिक आपत्ती निवारण प्राधिकरणाने (PDMA) शनिवारी सकाळी ३०७ लोकांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे.


ढगफुटी, भूस्खलन आणि वीज कोसळणे यांसारख्या घटनांमुळे ही जीवितहानी झाली आहे. राजधानी इस्लामाबादपासून तीन तासांच्या अंतरावर असलेल्या बुनर जिल्ह्याला या आपत्तींचा सर्वाधिक फटका बसला असून, येथे १८४ जणांचा मृत्यू झाला आहे.


पूरग्रस्त भागांमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. पाकिस्तानी लष्करही या कार्यात सहभागी झाले आहे. मात्र, सततच्या पावसामुळे बचाव कार्यामध्ये अडथळे येत आहेत. इतर भागांमध्येही नुकसान: खैबर पख्तुनख्वा व्यतिरिक्त इतर प्रांतांमध्येही मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरे, शेती आणि पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे.


हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, २१ ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिघडण्याची भीती आहे. पाकिस्तानमधील या नैसर्गिक आपत्तीमुळे देशासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.


Comments
Add Comment

Pakistan GHQ : रावळपिंडीत पाकिस्तानच्या लष्करी मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ गोळीबार; गोळीबार करणारा बंदूकधारी ठार

रावळपिंडी : पाकिस्तानमध्ये रावळपिंडीतील लष्करी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर हल्ला झाला. हल्ला करणाऱ्यावर

Bashar al-Assad : सीरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष असदना कोर्टाने ठोठावली फाशीची शिक्षा

सीरिया : माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद आणि त्यांचा धाकटा भाऊ महेर असद या दोघांना सीरियातील एका न्यायालयाने

Iran Cyber Attack : अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांना इराणचे हॅकिंगने उत्तर ? अमेरिकेच्या नागरिकांना हाल हाल करून मारण्याचा इराणचा डाव ?

वॉशिंग्टन डीसी : अमेरिका आणि इस्रायल यांनी इराण

Colombia Earthquake : कोलंबियाला भूकंपाचा भीषण धक्का! ७.४ रिश्टरचा शक्तिशाली भूकंप; १३२ जणांचा मृत्यू, परिस्थिती गंभीर

बोगोटा : कोलंबियाच्या पश्चिम भागाला सोमवारी शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या या

Russian cosmonaut : रशियन अंतराळवीरांकडून भारताला स्वातंत्र्यदिनाच्या विशेष शुभेच्छा

नवी दिल्ली : भारत आपला ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील रशियन

Japan warn US : अमेरिकन प्रचारात ॲनिमे व गेम्सचा वापर, जपानने अमेरिकेला सुनावले

टोकियो : जागतिक मुत्सद्देगिरीत एक अत्यंत अनोखा वाद समोर आला आहे. जगभरात लोकप्रिय असलेल्या जपानी संस्कृतीची ओळख