किनारपट्टीला ‘एरिन’ चक्रीवादळाचा धोका, हवामान विभागाचा अलर्ट

  75

राज्यात अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने तडाका दिलाय. अटलांटिक महासागरातून येणारे ‘एरिन’ चक्रीवादळ आता वेगाने पुढे सरकत आहे. त्यामुळे हवामान खात्याने याबाबत गंभीर इशारा जारी केला आहे, कारण हे वादळ पुढील काही दिवसांत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने किनारपट्टीवरील राज्यांमध्ये येत्या सात दिवसांत मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांचा अंदाज आहे.

समुद्रात खोलवर घडणाऱ्या बदलांमुळे वाऱ्यांच्या दिशा अचानक बदलल्या असून, त्यांचा वेगही वाढला आहे. ही संकटाची पूर्वसूचना असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

अमेरिकेच्या राष्ट्रीय चक्रीवादळ केंद्राने (NHC) शुक्रवारी रात्री उशिरा दिलेल्या माहितीनुसार, ‘एरिन’ हे वादळ रविवारपर्यंत अती तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. वादळ सध्या लीवर्ड बेटांच्या उत्तरेकडे सरकत असून, येत्या 24 तासांत अँगुइला, सेंट मार्टिन, सेंट बार्थेलेमी, साबा, सेंट युस्टाटियस आणि सिंट मार्टिन या भागांमध्ये उष्णकटिबंधीय वादळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ‘एरिन’ हे चक्रीवादळ उत्तर लीवर्ड बेटे, व्हर्जिन बेटे आणि प्यूर्टो रिकोच्या अगदी जवळून जाण्याची शक्यता आहे. या क्षेत्रांसह टर्क्स आणि कैकोस तसेच आग्नेय बहामास यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या तरी हे वादळ दक्षिण फ्लोरिडापासून बरेच दूर आहे आणि तिथे धडकण्याची शक्यता कमी आहे. मात्र, फ्लोरिडापासून न्यू इंग्लंड आणि अटलांटिक कॅनडापर्यंतच्या किनारपट्टीवर उंच लाटा आणि धोकादायक रिप करंट्सचा धोका आहे.
Comments
Add Comment

गुहागर : चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी १५० गाड्यांचं बुकिंग

गुहागर आगारातून जास्तीत जास्त चाकरमान्यांना एसटी महामंडळाची सेवा दिली जात असून आतापर्यंत परतीच्या

दापोली : मुसळधार पाऊस, खेड-दापोली रस्ता बंद, असोंडमध्ये रस्ता वाहून गेला

दापोली तालुक्यातील वाकवली–उन्हावरे मुख्य रस्त्यावर असणाऱ्या असोंड गावातील एसटी स्टँडवरून कुंभारवाडीकडे

चिपळूण, खेड, दापोलीत मुसळधार पाऊस, पाहा कोकणातील पावसाचे अपडेट

गेल्या दोन दिवसापासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे,

आजही पाऊस बरसणार, कोकण,मुंबई, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासाठी पावसाचा अलर्ट

गेल्या दोन दिवसात पावसाने राज्यात सर्वदूर हजेरी लावली असून हवामान विभागाने आजही पावसाचा इशारा दिला आहे.

गणपतीला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटीच्या 2500 फेऱ्या

कोकणात गणेशोत्सवासाठी येणार असलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी अडीच हजार एसटी गाड्यांचे नियोजन

कोकणात पुढील 4 दिवस विजांसह मुसळधार पावसाचा इशारा

राज्यभरात सध्या अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून कोकणात पुढील ४ दिवस विजांसह मुसळधार पावसाचा इशारा