जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, एवढे मृत्यू

  58

जम्मू आणि काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात रविवारी पहाटे ढगफुटीत किमान सहा जणांचा मृत्यू झाला आणि सहा जण जखमी झाले. कठुआ जिल्ह्यातील राजबाग परिसरातील घाटी गावात आणि जवळच्या दोन ठिकाणी ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान झाले. अचानक आलेल्या पुरामुळे घाटी गावाचा जगाशी असलेला संपर्क तुटला. पोलीस आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले.

घटनास्थळावरुन आतापर्यंत ६ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त घटनास्थळावरुन सहा जखमींना सुरक्षितरित्या बाहेर काढून पुढील उपचारांसाठी सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी किश्तवाड जिल्ह्यात ढगफुटीच्या एका भीषण घटनेत ६० हून अधिक जणांचा जीव गेला होता.

कठुआ पोलिस स्टेशन हद्दीतील बगड आणि चांग्रा गावांमध्ये आणि लखनपूर पोलिस स्टेशन हद्दीतील दिलवान-हुटली येथे भूस्खलनाच्या घटना घडल्या, परंतु कोणतेही मोठे नुकसान झाले नाही.

मुसळधार पावसामुळे बहुतेक जलाशयांची पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे आणि उझ नदी धोक्याच्या पातळीजवळून वाहत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि लोकांना जलाशयांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Add Comment

बिजू जनता दलाचे (बीजेडी) प्रमुख आणि ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक पुन्हा रुग्णालयात दाखल

मुंबई: बिजू जनता दलाचे (बीजेडी) प्रमुख आणि ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना वयोमानाशी संबंधित

उपराष्ट्रपतीपदासाठी NDA कडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे नाव जाहीर

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाची आज नवी दिल्ली येथे महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत

Vice Presidential Election: उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएच्या उमेदवाराची आज होणार घोषणा

नवी दिल्ली: उपराष्ट्रपती पदासाठी आज एनडीएच्या उमेदवाराची दिल्लीत घोषणा होण्याची शक्यता आहे. संसदेचं पावसाळी

...नाही तर राहुल गांधींनी माफी मागावी !

नवी दिल्ली : मतचोरीचे आरोप करणाऱ्या पण हे आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे देणे टाळणाऱ्या काँग्रेस खासदार राहुल

मुख्य निवडणूक आयुक्त संतापले, मतचोरीवर बेधडक बोलले

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन बेलगाम आरोप करणाऱ्या राहुल गांधी आणि त्यांच्या

भारताच्या स्टार खेळाडूच्या घरी चोरी, अनेक मानाचे पदक आणि पुरस्कारही पळवले

पश्चिम बंगाल: भारताची प्रसिद्ध जलतरणपटू आणि पद्मश्री पुरस्कार विजेत्या बुला चौधरी यांच्या घरी चोरी झाली