एक्सचेंजला व आपल्या रेग्युलेटरी फायलिंगमधील दिलेल्या माहितीनुसार बँकेने म्हटले आहे की,' रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १३ ऑगस्ट २०२५ रोजीच्या त्यांच्या पत्राद्वारे, बोनस शेअर्स जारी करण्यासाठी शेअर प्रीमियम खात्याचा वापर मंजूर केला आहे आणि लागू कायद्यांचे पालन करण्याच्या अधीन, अधिकृत शेअर भांडवलात वाढ करण्याबाबतच्या कलमाच्या संदर्भात बँकेच्या मेमोरँडम ऑफ असोसिएशनमध्ये (MOA) सुधारणा कराव्या लागतील.' १३ ऑगस्टला एचडीएफसी बँकेने जाहीर केले की रिझर्व्ह बँकेने १:१ च्या प्रमाणात बोनस शेअर्स जारी करण्यासाठी शेअर प्रीमियम खात्याचा वापर करण्यास तसेच अधिकृत शेअर भांडवल वाढवण्यासाठी दुरुस्ती करण्यास मान्यता दिली आहे. हा निर्णय १९ जुलै २०२५ रोजी बोर्डाच्या मंजुरीनंतर घेण्यात आला होता. या निर्णयासाठी पो स्टल मतपत्रिकेद्वारे भागभांडवल सदस्यांच्या मंजुरीच्या अधीन राहून बँकेने निर्णय घेतला. या निर्णयामुळे शेअरहोल्डर मूल्य वाढेल आणि बँकेची भांडवली रचना मजबूत होईल अशी अपेक्षा आहे.
देशभरात एचडीएफसी बँकेच्या ९००० पेक्षा अधिक शाखा आहेत तर २०००० पेक्षाही अधिक एटीएम मशीन आहेत. यापूर्वी एचडीएफसी लिमिटेडबरोबर बँकेचे विलिनीकरण (Merger) झाले होते. तसेच बँकेच्या कक्षा रुंदावत असताना बँकेच्या समुहात एचडीए फसी लाईफ, एचडीएफसी इरगो, एचडीएफसी एएमसी, एचडीबी फायनांशियल सर्व्हिसेस, एचडीएफसी सिक्युरिटीज इत्यादी भरणा आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, बँकेने फक्त स्टॉक स्प्लिट केले आहेत पहिल्यांदा २०११ मध्ये, जेव्हा एक १० शेअर प्रत्येकी २ च्या पाच शेअर्समध्ये विभागला गेला आणि पुन्हा २०१९ मध्ये, जेव्हा प्रत्येक ₹२ शेअर प्रत्येकी १ च्या दोन शेअर्समध्ये विभागला गेला.
एचडीएफसी बँक लाभांश (Dividend)
बोनस इश्यूसह, एचडीएफसी बँकेने २०२५-२६ आर्थिक वर्षासाठी फूलली पेडअप शेअरसाठी १ रूपये प्रत्येक इक्विटी शेअरसाठी ५ चा विशेष अंतरिम लाभांश (Special Interim Dividend) जाहीर केला होता. बँकेने विशेष अंतरिम लाभांशासाठी २५ जुलै ता रीख रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केली आहे आणि ती ११ ऑगस्ट २०२५ रोजी दिली जाईल. लाभांशांच्या बाबतीत, एचडीएफसी बँकेने सातत्यपूर्ण पेमेंट रेकॉर्ड राखला आहे. गेल्या महिन्यातच, त्यांनी प्रति शेअर २२ रूपयांचा अंतिम लाभांश वितरित केला होता.