Sholay turns 50 : ‘शोले’ चित्रपटाचं सुवर्णमहोत्सवी वर्ष! अमिताभ–धर्मेंद्र–हेमा–संजय यांची मैत्री सांगणारे ९ खास फोटो पहा

शोलेच्या शूटिंगदरम्यानचा एक कॅन्डिड क्षण म्हणजे धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी अमिताभ बच्चन यांनी काढलेल्या छायाचित्रासाठी दिलेली पोझ.



‘शोले’चे चित्रीकरण कर्नाटकमधील रामनगरच्या खडकाळ भागात झाले होते. या ठिकाणी धर्मेंद्र आणि अमिताभ यांचा एक शॉट देतानाचा क्षण टिपण्यात आला होता.



‘शोले’च्या सुरुवातीला दाखवलेल्या आयकॉनिक जेल सीनदरम्यान धर्मेंद्र आणि अमिताभ यांच्यातला एक खास कॅन्डिड क्षण.



धर्मेंद्र आणि अमिताभ यांनी या चित्रपटात वीरू आणि जय ही पात्रं साकारली होती. त्यांची मैत्री इतकी दृढ दाखवण्यात आली की आजही बॉलिवूडमधील मैत्रीवर आधारित चित्रपटांसाठी तीच आदर्श मानली जाते.


या छायाचित्रात अमिताभ आणि धर्मेंद्र आर. डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या आयकॉनिक ‘ये दोस्ती’ या गाण्याच्या चित्रीकरणापूर्वी तयारी करताना दिसत आहेत.




गब्बर सिंहची भूमिका साकारणाऱ्या अमजद खानने, आपले कट्टर शत्रू ठाकूर बलदेवसिंह (संजय कुमार) यांच्यासोबत तसेच जय-वीरू (अमिताभ आणि धर्मेंद्र) यांच्यासोबत आनंदाने फोटोसाठी पोझ दिली आहे.



जया बच्चन यांनी ठाकूरांच्या सुनेची व विधवा असलेल्या राधाची भूमिका साकारली होती, ज्यांच्यावर चित्रपटात जयाचे मन जडते.



तब्बल ५० वर्षांपूर्वी झळकलेल्या 'शोले' या चित्रपटातील हे गाजलेले संवाद... 'कितने आदमी थे?', 'जो डर गया, समझो मर गया', 'ये हाथ हमको दे दे ठाकुर', 'बसंती, इन कुत्तों के सामने मत नाचना', 'हम अंग्रेंजों के जमाने के जेलर है'...



भारतीय चित्रपटसृष्टीत क्रांती घडवून आणणारा “शोले” आज ५० वर्षांचा झाला आहे. कथानक, व्यक्तिरेखा, संवाद आणि संगीत यामुळे काळाच्या पलिकडे जाऊन लोकप्रिय ठरलेल्या या सिनेमाच्या प्रवासाचा उत्सव आज संपूर्ण देशात उत्साहाने साजरा केला जात आहे.

Comments
Add Comment

सलमान खानचा ‘बॅटल ऑफ गलवान’ — जिद्द आणि शौर्याची अढळ कहाणी

सलमान खानच्या ‘बॅटल ऑफ गलवान’ — हिम्मत आणि वीरतेने सजलेली गौरवाची कहाणी, टीझर झाला रिलीज आपल्या वाढदिवसाच्या

वर्षा उसगावकर पुन्हा छोट्या पडद्यावर; दिसणार 'या' लोकप्रिय मालिकेत

मराठी सिनेविश्वातील एव्हर ग्रीन अभिनेत्री वर्षा उसगांवकर आता स्टार प्रवाहवरच्या मालिकेत दिसणार आहेत. वर्षा

धुरंधरलाही या चित्रपटाने टाकलं मागे, पहिल्याच आठवड्यात कमवले १०० कोटी

भारतात पहिल्यांदाच या चित्रपटाने अवघ्या एका आठवड्यात रचला इतिहास सध्या सगळीकडेच धुरंधर हा चित्रपट फेमस झाला

Shilpa Shetty...शिल्पा शेट्टी प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय, AI मॉर्फ कंटेंटवर बंदी

मुंबई : आजकाल सोशल मीडियाचा गैरवापर सर्रासपणे केला जातो. मागील काही दिवसात अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे देखील

भाईजानचे साठीत पदार्पण! वाढदिवसानिमित्त वांद्रे-वरळी सिलिंक खास रोषणाई

मुंबई: बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानने साठीमध्ये पदार्पण केले आहे. सलमान आज त्याचा ६० वा वाढदिवस साजरा करणार

शॉर्टमध्ये सांगितलेली बेकेट थिअरी

भालचंद्र कुबल, पाचवा वेद हल्ली अँटीसिपेटेड कथानकांचा एवढा कंटाळा आलाय ना की समजा नाटक बघताना तुमच्या बाजूच्या