मुंबईत सगळीकडे पाणीच पाणी, किंग्ज सर्कल, अंधेरी, दादर तुंबलं, पोलिसांचा अलर्ट

मुंबईत सकाळपासून मुसळधार पावसाळा सुरुवात झाली असून मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आलं आहे. एकीकडे मुंबईसह राज्यभरात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे पावसाने देखील चांगलाच जोर धरला आहे. मुसळधार पावसामुळे प्रशासन सज्ज झालं आहे. भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा अलर्ट देण्यात आला असून रात्रभर सुरू असलेला पाऊस अजूनही सुरू असून पावसाचा जोर वाढल्याचे चित्र आहे.

यामुळे आता नागरिकांना पोलिसांकडून अत्यंत मोठा इशारा देण्यात आला आहे.सध्या मुंबईमध्ये सुरू असलेला पाऊस व हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याच्या अनुषंगाने नागरिकांनी अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर जाणे टाळावे. तसेच समुद्रकिनारी व सखल भागात जाणे टाळा, असा थेट इशाना मुंबई पोलिसांकडून देण्यात आलाय.या पार्श्वभूमीवर, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहआयुक्त, उपायुक्त, सर्व प्रशासकीय विभागाचे (वॉर्ड) सहायक आयुक्त, तसेच संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी त्यांच्या संबंधित कार्यालयात तत्काळ हजर राहून समन्वय साधावा.

कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास 100 / 112 / 103 डायल करा, असे मुंबई पोलिसांकडून जारी करण्यात आलं. मुंबईतील पावसाचा परिणाम मुंबई लोकलवर झाल्याचे बघायला मिळतंय.पावसाचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झालाय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या गाड्या 15 मिनिट उशिराने धावत आहेत.

किंग सर्कल परिसरात पाणी असून अनेक वाहने यामुळे रस्त्यावरच बंद पडली आहेत. हार्बर मार्गावरील रेल्वे ट्रॅकवर देखील पाणी साचले आहे. काल रात्रभर पडलेल्या पावसामुळे मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचले असल्याचे चित्र सध्या बघायला मिळतंय.चेंबूर ते कुर्ला दरम्यान च्या रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे ट्रेन थांबत थांबत जात आहेत. हार्बर मार्गावरील वाहतूक ही 15 मिनिटाने उशिरा ने सुरू आहे.सायन स्थानकातील रेल्वे रुळालगत पाणी साचल्याने घाटकोपरच्या पुढे रेल्वे वाहतूक संतगतीने सुरू आहे.

हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक सध्या संथ गतीने सुरू आहे. चुनाभट्टी रेल्वे स्थानकामधील रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याच दृश्य पाहायला मिळत आहे. पुढील 24 तास पावसाची अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी, एकाला केले अटक

मुंबई : आज सर्वत्र अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi 2025) ची धामधूम असताना, मुंबई वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकावर

लालबागचा राजाच्या मिरवणुकीपूर्वी दुर्दैवी घटना, मुख्य प्रवेशद्वारावर २ वर्षीय चिमुकलीचा अपघाती मृत्यू

मुंबई: गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या जल्लोषानंतर आज राज्यभरात बाप्पाला निरोप दिला जात आहे. सकाळपासूनच

म्हाडाच्या १४९ अनिवासी गाळे विक्रीसाठीच्या ई-लिलावासाठी मुदतवाढ

१६ सप्टेंबरपर्यंत करता येणार अर्ज मुंबई : मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा विभागीय घटक)

Mega Block News: रविवारी माटुंगा - मुलुंड अप व डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक

मुंबई:  मध्य रेल्वे, मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी उपनगरी विभागांवर रविवार, ०७.०९.२०२५

अरुण गवळीमुळे बदलणार दक्षिण मुंबईतील राजकीय समीकरणे!

मुंबई : एकवेळ मुंबईच्या गुन्हेगारी विश्वातले मोठ नाव असलेला गँगस्टर अरुण गवळी बुधवारी दगडी चाळीतील त्याच्या घरी

‘त्या’जाहिरातीनंतर वाद; यामागे 'गजवा-ए-हिंद' : भाजपचा आरोप

हलाल लाइफस्टाइल टाऊनशिपची जाहिरात विकासकाने हटवली नेरळ : नेरळ येथे एका गृहनिर्माण प्रकल्पाच्या जाहिरातीत हलाल