Trump-Putin Alaska Meet: ट्रम्प अलास्काला रवाना, पुतिन यांना लवकरच भेटणार, पण भेटीपूर्वीच दिली धमकी! म्हणाले...

  41

"जर चर्चा अयशस्वी झाली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील"

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एअर फोर्स वनने वॉशिंग्टनहून अलास्काला रवाना झाले आहेत. जिथे ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना भेटतील. अमेरिका आणि रशिया या दोन्ही महशक्ती असलेल्या देशाचे राष्ट्राध्यक्ष एकमेकांना भेटणार असल्याकारणांमुळे, या भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या भेटीत काय चर्चा होणार आणि काय निर्णय घेतले जाणार याकडे साऱ्यांच्या नजरा रोखल्या असतानाच, ट्रम्प यांनी या भेटीपूर्वीच एक विचित्र प्रतिक्रिया दिली आहे.  जी अनेक देशांना गोंधळात टाकणारी आहे. 

भेटीपूर्वी काय म्हणाले ट्रम्प?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एअर फोर्स वनने वॉशिंग्टनहून अलास्काला रवाना झाले आहेत. तत्पूर्वी त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर 'हाय स्टेक्स' असे लिहिले. ट्रम्प अलास्का येथे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना भेटतील. दोन्ही नेत्यांमधील बैठक आज रात्री १२.३० वाजता होणार आहे. अलास्काला रवाना होण्यापूर्वी ट्रम्प म्हणाले की त्यांना (पुतिन) ट्रम्पच्या अर्थव्यवस्थेत रस आहे. त्यांनी पुढे सांगितले की जर आपण प्रगती केली तर मी त्याबद्दल बोलेन. तसेच त्यांनी हे देखील स्पष्ट केले की जोपर्यंत रशिया-युक्रेन युद्ध थांबत नाही तोपर्यंत कोणताही व्यापार होणार नाही.

वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील भेटीदरम्यान युक्रेनमध्ये युद्धबंदी करारावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. या संभाषणाबद्दल आशा व्यक्त करताना ट्रम्प म्हणाले की,या चर्चेतून नक्कीच काही तरी निकाल येईल.

पुतिन यांच्यासोबतच्या बैठकीच्या संभाव्य निकालांबद्दल बोलताना ट्रम्प यांनी इशारा दिला आहे की, जर ही चर्चा अयशस्वी ठरली तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. ट्रम्प यांच्यासोबत या बैठकीत परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो, अर्थमंत्री स्कॉट बेसंट, वाणिज्य मंत्री हॉवर्ड लुटनिक, सीआयए संचालक जॉन रॅटक्लिफ आणि इतर वरिष्ठ सहाय्यक असतील.

सीएनएनच्या वृत्तानुसार, ट्रम्प अलास्काला रवाना झाले असताना, पुतिन सध्या रशियाच्या सुदूर पूर्वेकडील प्रदेशात आहेत आणि तेथून ते अलास्काला रवाना होतील. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांच्या मते, पुतिन सध्या रशियाच्या सुदूर पूर्वेकडील मगदान येथे आहेत, जिथे त्यांनी स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यासोबतच ते एका स्थानिक औद्योगिक कारखान्याला भेट देणार आहेत.

आता युद्ध संपवण्याची वेळ आली आहे: झेलेन्स्की

ट्रम्प आणि पुतिन यांच्या भेटीपूर्वी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांचे विधानही समोर आले आहे. झेलेन्स्की म्हणाले की आता युद्ध संपवण्याची वेळ आली आहे. त्यांनी आशा व्यक्त केली की रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील महत्त्वाची बैठक न्यायी शांततेचा मार्ग मोकळा करेल. झेलेन्स्की यांनी या बैठकीचे वर्णन युक्रेन, अमेरिका आणि रशियाच्या नेत्यांमधील अर्थपूर्ण त्रिपक्षीय चर्चेची संधी म्हणून केले आणि सांगितले की या प्रकरणात त्यांना अमेरिकेकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

Comments
Add Comment

Pakistan Cloudburst : पाकिस्तानमध्ये प्रलय! ढगफुटी आणि पुरानं ४१ बळी, ५०० पर्यटक बेपत्ता

पाकव्याप्त काश्मीरमध्ये सहा जणांचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त मुजफ्फराबाद : पाकिस्तानातील अनेक भागांवर मुसळधार

व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामवर रशियाची बंदी

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांचे आदेश मॉस्को : गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी रशियन अधिकाऱ्यांनी

अंतराळवीर शुभांशू शुक्ला मायदेशी परतल्यावर घेणार पंतप्रधान मोदींची भेट

वॉशिंग्टन : अंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (आयएसएस) मध्ये जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर कॅप्टन शुभांशु शुक्ला हे

अमेरिकेत आणखी एका हिंदू मंदिरावर हल्ला

वॉशिंग्टन : अमेरिकेतील एका हिंदू मंदिरावर पुन्हा एकदा वांशिक द्वेषाच्या पार्श्वभूमीवर हल्ला करण्यात आला आहे. ही

पाकिस्तानात स्वातंत्र्यदिनादरम्यान गोळीबार, ३ जणांचा मृत्यू आणि ६०हून अधिक जखमी

इस्लामाबाद: पाकिस्तान आज म्हणजेच १४ ऑगस्टला आपला ७९वा स्वातंत्रदिन साजरा करत आहे. या खास क्षणाला कराची शहरातील

'ऑपरेशन सिंदूर'मध्ये एफ-१६ विमान पाडल्याच्या दाव्यावर अमेरिकेचे मौन

वॉशिंग्टन: भारत आणि पाकिस्तान यांच्यात ७ ते १० मे दरम्यान झालेल्या 'ऑपरेशन सिंदूर' या ८८ तासांच्या संघर्षात