जखमी गोविंदांसाठी सिव्हिल रुग्णालयात विशेष कक्ष

ठाणे : दहीहंडीचा सण मोठ्या जल्लोषात साजार होत असला तरी उंच थरावरून पडून अनेक गोविंदांचे बळी जातात. सणाला गालबोट लागणाऱ्या या घटनांची गांभीर्याने दखल घेत जखमी गोविंदासाठी सिव्हिल रुग्णालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आले आहे.


काही दहीहंडीचा जल्लोष, थरांचा थरार, आणि होणारे विविध कार्यक्रम ठाणे शहर उत्सवाच्या रंगात असतात. या आनंदोत्सवात कोणताही गोविंदा जखमी होऊ नये, कोणाचाही जीव धोक्यात येऊ नये, यासाठी आरोग्य यंत्रणेने सर्वतोपरी तयारी केली आहे.


यंदा ठाणे सिव्हील रुग्णालयात जखमी गोविंदांसाठी २० बेडचा विशेष कक्ष उभारण्यात आला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कक्षात सर्व आवश्यक सुविधा, औषधे आणि प्रशिक्षित वैद्यकीय पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. कोणताही गोविंदा अपघातग्रस्त झाल्यास तातडीने उपचार मिळावेत, हा यामागचा मुख्य हेतू आहे.


दहीहंडी उत्सवात अनेक गोविंदा पथकांनी उंच थर रचण्याची तयारी केली आहे. थर चढताना एकमेकांना हात देणारे, खांद्यावर उचलून घेणारे आणि पडल्यास पकडून सावरणारे हात हीच खरी गोविंदा परंपरेची ओळख आहे. मात्र एखाद्या घटनेत गोविंदा पडून जखमी होण्याची शक्यता असते. अशावेळी सिव्हिल रुग्णालयाची विशेष कक्ष मदतगार ठरू शकतो.'


दहीहंडी हा केवळ शक्ती, कौशल्य आणि मैत्रीचा सण नाही, तर काळजी, जिव्हाळा आणि सुरक्षिततेची भावना जपण्याचं प्रतीक आहे. या उत्सवात प्रत्येक गोविंदाची सुरक्षा तितकीच महत्वाची आहे. त्यामुळे दही हंडीचे मनोरा लावताना कोणी गोविंदा जखमी झालाच तर त्याच्यासाठी सिव्हिल रुग्णालय विशेष कक्ष तैनात आहे.

Comments
Add Comment

‘दशावतार’ची छप्पर फाड कमाई !

मुंबई : सुबोध खानोलकर दिग्दर्शित 'दशावतार' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात उत्तम कामे केली. या चित्रपटाने सहाव्या

कपिल शोच्या ग्रँड फिनालेत अक्षय कुमारचा जलवा !

मुंबई : ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’च्या तिसऱ्या सीझनचा समारोप अतिशय धमाल आणि भावनिक क्षणांनी झाला . या भागाचे

या ५ तेलांचा उपयोग ठरेल केसांसाठी वरदान !

केसांची काळजी घेणे हे अनेकांसाठी खूप महत्वाचे असते. प्रत्येक वेळी नवीन काहीतरी ट्राय करण्याची इच्छा असते, पण

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 'जॉली एलएलबी ३' च्या निर्मात्याला दिलासा !

मुंबई : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'जॉली एलएलबी ३' या चित्रपटाविरोधात दाखल

पीएम मोदी बायोपिकची घोषणा

साऊथ स्टार उन्नी मुकुंदन होणार 'पंतप्रधान' मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित आणखी एक बायोपिक

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र