Q1 Ashok Leyland Results: तिमाही निकाल जाहीर कंपनीच्या नफ्यात जबरदस्त वाढ

प्रतिनिधी: हिंदुजा समुहाची प्रसिद्ध वाहन कंपनी अशोक लेलँड लिमिटेड (Ashok Leyland Ltd) कंपनीने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) निव्वळ नफा ५९४ कोटी रूपये झाला आहे. मागच्या वर्षी तिमाही तील ५२५ कोटींच्या तुलनेत १३% वाढ झाल्याने नफा या तिमाहीत ५९४ कोटींवर पोहोचला आहे. कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात (Consolidated Net Profit) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर २०% वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तिमाहीत ५५१ कोटींच्या तु लनेत वाढ होत या तिमाहीत २०% वाढत ६५८ कोटींवर निव्वळ नफा पोहोचला आहे. कंपनीच्या महसूलात (Revenue) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर १.४०% वाढ झाली असल्याचे कंपनीने घोषित केले.मागील वर्षाच्या तिमाहीतील ८५६१ कोटींच्या तुलनेत या ति माहीत ११८५७ कोटीवर महसूल गेला आहे. कंपनीच्या व्हेईकल वोल्युम (Vechile Volume) मध्ये ४४२३८ पर्यंत रेकॉर्ड ब्रेक वाढ झाल्याचे कंपनीने निकाला दरम्यान म्हटले आहे. कंपनीच्या ईबीटा (करपूर्व कमाईत EBITDA) इयर ऑन इयर बेसिसवर ११% वा ढली आहे. मागील वर्षाच्या तिमाहीतील ९११ कोटींच्या तुलनेत ती वाढत या तिमाहीत ९७० कोटींवर गेली आहे.


निकालावर भाष्य करताना अशोक लेलँडचे अध्यक्ष धीरज हिंदुजा म्हणाले, 'अशोक लेलँडने कठोर कास्ट व्यवस्थापन राखून प्रभावी बाजारपेठ अंमलबजावणीद्वारे अपेक्षेपेक्षा जास्त चांगली क्विक लीटर कामगिरी केली आहे. आमची इलेक्ट्रिक मोबिलिटी उपकंपनी (Subsidary) स्विच मोबिलिटी, चांगली लोकप्रियता मिळवत आहे आणि सकारात्मक बीटा (EBITDA) प्राप्त केली आहे. आम्ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आणि संरक्षण व्यवसायात आमचे प्रयत्न दुप्पट करत आहोत. आमच्या उत्पादन श्रेष्ठत्वाला आणि मजबूत ग्रा हक अभिमुखतेला बळकटी देत, आम्ही आमच्या उद्योगात महत्त्वाची भूमिका बजावण्यावर आमचे लक्ष केंद्रित करत आहोत.'


तिमाहीतील निकालावर व्यक्त होताना अशोक लेलँडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ शेनू अग्रवाल म्हणाले, 'बाजारपेठेतील वाटा आणि ऑपरेटिंग मार्जिनमध्ये एकाच वेळी वाढ झाल्याचे आम्हाला कळवताना आनंद होत आहे.यामुळे उत्कृष्ट उत्पादने आ णि सर्वोत्तम दर्जाच्या ग्राहक सेवेद्वारे नफा वाढविण्यासाठी आमची रणनीती अधिक मजबूत होते. आमच्या नॉन-सीव्ही पोर्टफोलिओच्या वाढीवर आमचे लक्ष आम्हाला सलग अनेक तिमाहीत विक्रमी कामगिरी करण्यास मदत करत आहे. भविष्यातील तयार तंत्रज्ञा नासाठी आमची वचनबद्धता वाढवत मध्यम कालावधीत मध्यम-किशोरवयीन EBITDA मार्जिन साध्य करणे हे आमचे प्राधान्य आहे.'


कंपनीच्या कॅश तरलतेतही वाढ झाली असल्याचे कंपनीने म्हटले आहे. आकडेवारीनुसार हा आकडा पहिल्या तिमाहीत ८२१ कोटींवर गेला आहे. कंपनीने तिमाही निकाल जाहीर करताना एक्सचेंज फायलिंग (Exchange Filling) मधील माहितीनुसार, अशोक ले लँड एमएचसीव्ही ट्रकच्या संख्येत (डिफेन्स वगळता) २% वाढ झाली आहे, ज्यामुळे वार्षिक बाजार हिस्सा २८.९% वरून ३०.७% पर्यंत वाढला आहे. एमएचसीव्ही (MHCV) बस टीआयव्ही (ईव्ही वगळता) ५% वाढली आहे. अशोक लेलँडने एमएचसीव्ही बसम ध्ये देशांतर्गत बाजारपेठेतील आघाडीचे स्थान कायम ठेवले आहे. एलसीव्ही देशांतर्गत तिमाहीत १५५६६ युनिट्सचे प्रमाण या तिमाहीत आतापर्यंतचे सर्वाधिक आहे. पहिल्या तिमाहीत निर्यातीचे प्रमाण २९% वाढून ३०११ युनिट्सवर पोहोचले आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात गणेश विसर्जन उत्साहात

मुंबई : गिरगाव चौपाटीवर गणेश मूर्तींच्या विसर्जन मिरवणुका वाजत गाजत आणि गणपती बाप्पाच्या जयघोषात सुरू आहेत.

बेकायदेशीर कत्तलीसाठी नेलेला जनावरांचा कंटेनर परभणीत जप्त, चालक ताब्यात

परभणी : पथरी-माजलगाव रस्त्यावरील पोखर्णी फाटा परिसरात बेकायदेशीर कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा एक कंटेनर सतर्क

गणेशोत्सवाला गालबोट - पुण्यात गणेश कोमकरच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या

पुणे : ऐन गणेश विसर्जनाच्या तयारीत असतानाच पुण्यामध्ये सणाला गालबोट लागले. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या

पेट्रोल पंपाच्या कंपाऊंडची संरक्षण भिंत कोसळल्याने गणेशोत्सवात सीएनजीचा पुरवठा बंद; वाहनचालकांची धावपळ

मंडणगड: गणेशोत्सवादरम्यान मंडणगडमधील एकमेव सीएनजी पंप बंद झाल्याने स्थानिक वाहनचालक आणि गणेशभक्तांची मोठी

Anant Chaturdashi 2025: मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बाप्पाला भावपूर्ण निरोप

मुंबई: अनंत चतुर्थीनिमित्त (Anant Chaturdashi 2025) मुंबईसह अनेक ठिकाणी गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून

अरे बापरे! तब्बल १२ हजार कोटींची ड्रग्ज फॅक्टरी उद्ध्वस्त! मीरा-भाईंदर पोलिसांची कमाल!

मीरा-भाईंदर: मीरा रोडमधील एमडी ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत असताना