Manu Bhaker: ऑलिंपिक पदक विजेती मनू भाकरने व्हायोलिनवर राष्ट्रगीत वाजवून दिली मानवंदना

नवी दिल्ली: ऑलिंपिक पदक विजेती मनू भाकरने व्हायोलिनवर राष्ट्रगीत वाजवून भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला.  या कुशल नेमबाजाने आपल्या इनस्टाग्राम अकाऊंटवरून व्हायोलिनवर राष्ट्रगीत वाजवतानाचा व्हिडिओ शेअर करत, भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनाला मानवंदना दिली. मनू भाकरच्या प्रभावी कारकिर्दीत ऑलिंपिक पदके, जागतिक अजिंक्यपद स्पर्धा जिंकणे आणि राष्ट्रकुल तसेच आशियाई खेळांमधील यश यांचा समावेश आहे.


मनू भाकरने इनस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिने व्हायोलिनवर राष्ट्रगीत वाजवत लोकांना मंत्रमुग्ध केले.





या व्हिडिओबरोबरच तिने हृदयस्पर्शी असे कॅप्शनदेखील दिले आहे. व्हिडिओ शेअर करत तिने लिहिले, "या स्वातंत्र्यदिनी माझ्या हृदयाच्या सर्वात जवळचे गाणे वाजवण्याचा एक प्रयत्न. मी जेव्हा जेव्हा भारताचे प्रतिनिधित्व करते तेव्हा मला व्यासपीठावर उभे राहून हे गीत ऐकायचे असते. साधारणपणे आपण बसून व्हायोलिन वाजवतो. पण राष्ट्रगीत वाजवत असल्यामुळे आम्ही उभे राहिलो. आपल्या देशाची प्रशंसा शब्दांत मांडता येत नाही. जय हिंद!"


गेल्या वर्षी पॅरिस ऑलिंपिकमध्ये, मनू भाकरने महिलांच्या वैयक्तिक १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्यपदक जिंकत, ऑलिंपिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला नेमबाज बनून इतिहास रचला. या कामगिरीनंतर तिने सरबजोत सिंगसोबत १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत आणखी एक कांस्यपदक मिळवले, ज्यामुळे भारताचे ऑलिंपिकमधील पहिलेच नेमबाजीमधील सांघिक पदक ठरले. मात्र, भाकरचे तिसरे ऑलिंपिक पदक थोडक्यात हुकले. ती महिलांच्या २५ मीटर पिस्तूल नेमबाजी स्पर्धेत चौथ्या स्थानावर राहिली, ज्यामुळे ती एकाच ऑलिंपिकमध्ये तीन पदके जिंकणारी पहिली भारतीय बनू शकली असती. २०२१ च्या टोकियो ऑलिंपिकमधील निराशाजनक मोहिमेनंतर पॅरिसमधील तिने हे घवघवीत यश मिळवले आहे.

Comments
Add Comment

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma :घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येणार ? चहल म्हणाला..

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि चहलची पुर्व पत्नी हे ईनफ्लुन्सर धनश्री वर्मा हे दोघेजन पुन्हा

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुटप्पी!

मोहम्मद कैफ याचे संघ व्यवस्थापनावरही गंभीर आरोप नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय

मुंबई इंडिन्सचा गुजरात जायंट्सवर सात बळी राखून विजय

कर्णधार हरमनप्रित कौरची आक्रमक खेळी नवी मुंबई : विजयासाठी १९३ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या मुंबई

शिखर धवनच्या आयुष्यात नवी इनिंग! सोफी शाइनसोबत उरकला साखरपुडा

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवनने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठत

आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानाकडे विराट कोहलीची वाटचाल

वडोदरा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानाला आता धोका

महिला प्रीमियर लीग: हरमनप्रीत-सायव्हरचा झंझावात

मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ५० धावांनी विजय मुंबई : वानखेडे स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या तीसऱ्या