नवी दिल्ली: भारताला स्वातंत्र्य मिळून आज ७९ वर्षे झाली आहेत. १५ ऑगस्ट १९४७ला ब्रिटीश शासनातून भारताला स्वांतंत्र्य मिळाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लाल किल्ल्याच्या प्राचीर येथून सलग १२व्या वर्षी देशाला संबोधित करतील. सकाळी ७.३० वाजता पंतप्रधान ध्वजारोहण करतील आणि त्यानंतर भाषणाला सुरूवात करतील. नरेंद्र मोदींच्या नावावर लाल किल्ल्यावरून सर्वात मोठे भाषण देण्याचा रेकॉर्ड आहे. २०२४मध्ये त्यांनी ९८ मिनिटांपर्यंत भाषण केले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी आपल्या भाषणादरम्यान, ऑपरेशन सिंदूर, राष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास आणि आपल्या कार्यकाळातील कल्याणकारी योजनांबाबत विस्ताराने सांगतील.
स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ला आणि आजूबाजूच्या परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. एकूण ११ हजार सुरक्षारक्षक तसेच ३००० ट्रॅफिक पोलीस तैनात आहेत. उंच इमारतींवर स्नायपर्स ठेवण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
पंतप्रधान मोदींनी दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी एक्सवर लिहिले की आजचा दिवस देशासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आपले स्वातंत्र्यवीर सेनानी यांनी दिलेले बलिदान आणि त्यांच्या कष्टामुळेच आपण स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करतो. आपण केवळ इतिहासच लक्षात ठेवला नाही पाहिजे तर आपला देश एक विकसित आणि सशक्त राष्ट्र कसे बनेल याचाही विचार केला पाहिजे.