रहस्यमय ‘घबाडकुंड’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, भव्य-दिव्य सेटवर होणार चित्रीकरण

मुंबई: प्रत्येकालाच आयुष्यात एकदा तरी 'घबाड' मिळावं आणि रातोरात श्रीमंत व्हावं असं वाटतं. अशाच एका घबाडाच्या शोधावर आधारित ‘घबाडकुंड’ हा आगामी मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दिग्दर्शक प्रीतम एस.के. पाटील आणि निर्माते रसिक कदम यांच्या या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाने प्रदर्शनाआधीच चर्चेत येण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी पुण्याजवळील खेड-शिवापूर येथे एक भव्यदिव्य आणि नेत्रदीपक सेट उभारण्यात आला आहे.


‘अल्याड पल्याड’ या यशस्वी चित्रपटानंतर प्रीतम पाटील पुन्हा एकदा सस्पेन्स थ्रिलर घेऊन येत आहेत. ‘घबाडकुंड’ या चित्रपटाचे शीर्षकच खूप लक्षवेधी आहे. घबाड म्हणजे अचानक मिळणारी धनप्राप्ती आणि कुंड म्हणजे विहीर किंवा खोलगट जागा. या दोन्हीचा मेळ घालून या चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे. भव्य सेटवर गूढ दृश्यांचे चित्रीकरण.


मराठी चित्रपटसृष्टीत प्रथमच इतका भव्य सेट तयार करण्यात आला आहे. सुमारे १० ते १२ हजार स्क्वेअर फूट जागेवर हा सेट उभारला आहे. यामध्ये पाण्याची कुंड, खोल विहिरी, पुरातन मंदिरे आणि गुहांचे बांधकाम करण्यात आले आहे. या सेटवर अनेक गूढ आणि रहस्यमय दृश्यांचे चित्रीकरण होणार आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना ‘लार्जर दॅन लाईफ’ अनुभव मिळेल.


स्टारकास्ट आणि टीम
चित्रपटात कलाकारांची मोठी फौज आहे. यात देवदत्त नागे, कुशल बद्रिके, संदीप पाठक, शशांक शेंडे, प्राजक्ता हनमघर, स्मिता पायगुडे-अंजुटे, वैष्णवी कल्याणकर आणि इतर कलाकार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रीतम एस.के. पाटील यांनी केले आहे, तर रसिक कदम आणि स्मिता पायगुडे-अंजुटे यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे.


‘घबाडकुंड’ हा चित्रपट रहस्य, थरार, विनोद आणि नात्यांची गुंतागुंत अशा अनेक गोष्टींनी परिपूर्ण असणार आहे. हा चित्रपट मराठीसोबतच हिंदी आणि तेलगू या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला हा बिगबजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्याची शक्यता आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीतही भव्य कॅनव्हास दाखवण्याचा प्रयत्न असल्याचे दिग्दर्शक प्रीतम पाटील यांनी सांगितले.

Comments
Add Comment

दिशा पटानीच्या घरावर गोळीबार!

प्रेमानंद महाराजांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली केला गोळीबार बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीशी संबंधित एक

TMKOC : ४५०० भागांचा टप्पा गाठत ‘तारक मेहता’ने रचला नवा विक्रम

मुंबई : टीव्ही मनोरंजनाच्या विश्वात लोकप्रिय मालिकांचा उल्लेख झाला, तर ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचं

‘तू माझा किनारा’ – क्रिस्टस स्टीफन यांची मराठी चित्रपटसृष्टीत भावनिक सुरुवात!

मुंबई : चित्रपट निर्माते क्रिस्टस स्टीफन हे आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असून, त्यांचा पहिला मराठी

अभिनेत्री करिश्माने मारली चालत्या लोकलमधून उडी

मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा शर्मा हिचा मुंबईतील चर्चगेट येथे अत्यंत गंभीर अपघात झाला. करिश्मा स्वतःने

चिंतामणीचे सेवेकरी पांडुरंग मोरेंवर आला म्युझिक व्हिडीओ

मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव देशभरातल्या भाविकांसाठी चर्चेचा विषय असतो. हा गणेशोत्सव उत्साहात साजरा

Shahid Kapoorला हा नाश्ता इतका आवडतो की सातही दिवस तो खाऊ शकतो, मीरा राजपूतने केला खुलासा

मुंबई: बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत दोघेही त्यांच्या फिटनेसबद्दल आणि डाएटबद्दल खूप