JSW Cement कंपनीच्या शेअरला लिस्टिंग मध्ये अपयश केवळ १% प्रिमियर रेट हा शेअर घ्याव्या का जाणून घ्या!

  31

प्रतिनिधी:आज अखेर जेएसडब्लू सिमेंट (JSW Cement) आयपीओ बाजारात सूचीबद्ध झाला आहे.जेएम समुहाचा पाठिंबा असलेल्या सिमेंट आयपीओची लोकांनी औत्सुक्याने वाट पाहिली होती मात्र कंपनीच्या आयपीओला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.कं पनीचा शेअर आज अखेर शेअर बाजारात 'सूचीबद्ध ' (Listed) झाला आहे. मूळ आयपीओतील प्राईज बँडपेक्षा केवळ ४% प्रिमियम दराने शेअरची किंमत सुरु आहे. उपलब्ध माहितीनुसार, दुपारी १.४४ वाजता केवळ मूळ किंमतीपेक्षा १.०३% वाढला आहे. ज्या मध्ये कंपनीचा शेअर १४८.५० रूपयांवर ट्रेड होत आहे. कंपनीचा ३६०० कोटींचा आयपीओ (IPO) ७ ते ११ ऑगस्ट कालावधीत बाजारात दाखल झाला होता. कंपनीने प्राईज बँड (Price Band) १४७ रूपये प्रति शेअरवर निश्चित केला होता. कंपनीने सुमारे १०.८ ८ कोटी शेअर्सचा फ्रेश इशू बाजारात आणला होता तर १०८० रूपये अँकर गुंतवणूकदाराकडून उभारले होते. मात्र ११ ऑगस्टपर्यंत आयपीओला ८.२२ वेळा सबस्क्रिप्शन मिळाले होते. किरकोळ गुंतवणूकदारांकडून (Retail Investors) कडून १.९१ वेळा,पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसकडून (Qualified Institutional Buyers QIB) यांच्याकडून १६.७१ वेळा, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (Non Institutional Investors NII) ११.६० वेळा सबस्क्रिप्शन मिळाले होते.

ही लिस्टिंग बहुतेकदा ग्रे मार्केटच्या अंदाजांशी सुसंगत आहे जिथे शेअर्स सुमारे ३% प्रीमियमवर व्यवहार करत होते. ग्रे मार्केट ही एक अनधिकृत परिसंस्था आहे जिथे ऑफर सबस्क्रिप्शनसाठी उघडण्यापूर्वीच शेअर्सचा व्यापार सुरू होतो आणि लिस्टिंग दिवसाप र्यंत व्यापार सुरू राहतो.आयपीओला शेवटच्या टप्प्यात १२.७५ लाखांहून अधिक अर्ज आले होते. जेएसडब्ल्यू सिमेंटला त्याचा नफा टिकवून ठेवता आला नाही आणि सध्या तो कमी व्यवहार करत आहे. तज्ञांना मात्र दीर्घकालीन वाढीसाठी हा स्टॉक चांगला वाटला आहे. माहितीनुसार, भारतातील GGBS चा सर्वात मोठा उत्पादक आणि या व्यवसायाचा विस्तार करण्याचा सिद्ध ट्रॅक रेकॉर्ड आहे.२००६ मध्ये स्थापन झालेली जेएसडब्ल्यू सिमेंट लिमिटेड ही भारतातील ग्रीन सिमेंटची उत्पादक कंपनी आहे. जेएसडब्ल्यू ग्रुपचा भा ग म्हणून, कंपनी सिमेंट उद्योगात शाश्वतता आणि नाविन्यपूर्णतेसाठी ओळखली जाते.

कंपनीने देशभरात सात प्लांट चालवले, ज्यात एक इंटिग्रेटेड युनिट, एक क्लिंकर युनिट आणि आंध्र प्रदेश (नांद्याळ प्लांट), कर्नाटक (विजयनगर प्लांट), तामिळनाडू (सालेम प्लांट), महाराष्ट्र (डोळवी प्लांट), पश्चिम बंगाल (सालबोनी प्लांट) आणि ओडिशा (जाज पूर प्लांट आणि बहुसंख्य मालकीच्या शिवा सिमेंट लिमिटेड क्लिंकर युनिट) येथे स्थित पाच ग्राइंडिंग युनिट्सचा समावेश आहे. ३१ मार्च २०२५ पर्यंत, जेएसडब्ल्यू सिमेंट लिमिटेडची स्थापित ग्राइंडिंग क्षमता २०.६० एमएमटीपीए होती, ज्यामध्ये दक्षिण भागात ११. ०० एमएमटीपीए, पश्चिम भागात ४.५० एमएमटीपीए आणि भारताच्या पूर्व भागात ५.१० एमएमटीपीएचा समावेश होता.कच्च्या मालाच्या स्रोतांशी आणि प्रमुख वापर बाजारपेठांशी चांगले जोडलेले असलेले धोरणात्मकदृष्ट्या स्थित कारखाने असे तज्ञांचे म्हणणे आ हे.

जेएसडब्लू सिमेंट शेअर खरेदी करावा का? तज्ञांचा मते या कंपनीच्या शेअरम़धील आव्हाने-

तज्ञांच्या मते, जागतिक आर्थिक घडामोडींमध्ये सामान्य मंदी सुरु आहे याशिवाय प्रमुख कच्च्या मालासाठी जेएसडब्ल्यू स्टील ग्रुपवर अवलंबून राहण, वनस्पतींच्या वापराची पातळी राखण्यात किंवा वाढविण्यात अपयशी ठरण्याचा धोका, व्यवसाय हंगामी आणि च क्रीय मागणी चढउतारांना सामोरे जाणे,विनिमय दर चढउतारांचा धोक आणि वाढलेली स्पर्धा ही सगळी प्रमुख आव्हाने कंपनीच्या शेअर्समध्ये आहेत असे असले तरी ते तज्ञांच्या मते या शेअर्समध्ये दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.
Comments
Add Comment

इम्तियाज जलील यांच्या घरी होणार मटण-चिकन पार्टी, थेट मुख्यमंत्र्यांना पार्टीचं निमंत्रण

१५ ऑगस्ट रोजी, कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय अनेक महापालिकांनी घेतला . या निर्णयावरून,

आताची सर्वात मोठी बातमी: स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भारत अर्थव्यवस्थेत जागतिक किर्तीला S&P Global कडून भारताला BBB क्रेडिट रेटिंग!

मोहित सोमण: आताची सर्वात मोठी बातमी पुढे आली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भारतासाठी अभिमानाची बाब

रायगड : आदिती तटकरेंना ध्वजारोहणाचा मान, रायगडमध्ये पुन्हा पालकमंत्रीपदावरून वाद

महायुतीचं सरकार आल्यापासून रायगडच्या पालकमंत्री पदावरुन असलेला वाद राज्याला सर्वश्रुत आहे.रायगडच्या

V Movies and TV: नवी दिल्लीतील स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण आता वी मूव्हीज अँड टीव्हीवर

स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावरील ध्वजारोहण आणि इतर समारंभाचे थेट प्रक्षेपण वी युजर्सना

पोको एम७ प्‍लस ५जी भारतात लाँच

मुंबई: भारतातील बहुप्रतिक्षित पोको कंपनीच्या पोको एम७ प्‍लस ५जी फोन (Variant) भारतात दाखल झाला आहे.या आघाडीच्‍या

'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण :स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला शेअर बाजारात वाढ ! सेन्सेक्स व निफ्टी उसळण्यामागे 'हे' आहे आजचे सविस्तर विश्लेषण वाचा एका क्लिकवर!

मोहित सोमण:उद्या स्वातंत्र्य दिना निमित्त व बाजारातील तिमाहीतील निकालावर सकारात्मकता गुंतवणूकदारांना