बिटकॉइन आणि लेयर १ ब्लॉकचेन क्रिप्टोमधील गुंतवणुकीत वाढ

  21

CoinDCX कंपनीच्या आर्थिक अहवालातील माहिती

गुंतवणूकदारांचे सरासरी वय ३१ महिलांचा वाटा १५ टक्के

मुंबई: भारतातील सर्वात मोठ्या क्रिप्टो एक्सजेंचपैकी एक असलेल्या कॉइनडीसीएक्सने अर्धवार्षिक (Half Quarter) अहवाल घोषित केला. त्या अहवालातील माहितीनुसार, कॉइनडीसीएक्सने यावर्षीच्या पहिल्या सहा महिन्यांत २३४९७.३५ कोटी रुपये एवढं स्पॉ ट ट्रेडिंग व्हॉल्युम नोंदवल गेले आहे, जे गतवर्षीच्या समान कालावधीच्या तुलनेत ३७% अधिक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या व्हॉल्युमपैकी ७०% पेक्षा अधिक बिटकॉइन आणि लेयर १ ब्लॉकचेन क्रिप्टोमध्ये गुंतवणूक झाली. या अहवालातील माहितीनुसार, झालेल्या वाढीमुळे वायफळ (अतिरिक्त) ट्रेडिंगपासून वास्तविक इन्फ्रास्ट्रक्चरवर केंद्रित विश्वासाकडे झालेला बदल अधोरेखित होत आहे.प्रत्येक गुंतवणूकदाराकडे सरासरी ४ टोकन्स असतात. त्यावरून पोर्टफोलिओच्या वैविध्यांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येतं.

जागतिक डिजिटल असेट्स इकोसिस्टिममसाठी अगदी निर्णायक प्रसंगी हा अहवाल सादर करण्यात आला आहे असे कंपनीने अहवाल सादर करताना म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा निवड झाल्यानंतर स्ट्रॅटजिक बिटकॉइन रिझर्व आ णि जिनियस अक्ट सारख्या धोरणांद्वारे प्रो क्रिप्टो वातावरणाची निर्मिती होत आहे. युरोपियन संघाने एमआयसीए फ्रेमवर्कची अंमलबजावणी केली आहे. तर हाँगकाँगने आशिया खंडातील सर्वात प्रगत स्टेबलकॉइन परवानासंबंधीची प्रणाली लागू केली आहे. जागति क पातळीवरील या घडामोडींचा परिणाम भारतातही दिसून आला. कॉइनडीसीएक्सच्या ट्रेडिंग मूल्यात वाढ आणि यात गुंतवणूकदारांचा वाढीव आत्मविश्वासदेखील अधोरेखित झाला. आकडेवारीनुसार, गुंतवणूकदारांचा जनसांख्यिकीय बदल देखील उल्लेखनीय आहे. गुंतवणुकीचे सरासरी वय आता ३१ वर्षं, महिलांचा वाटा १५%, आणि फरीदाबाद, नाशिकसारखी टियर २ शहरे नव्या क्रिप्टो हब्स म्हणून पुढे येत आहेत.कॉइनडीसीएक्सचे नोंदणीकृत वापरकर्ते आता १.९ कोटींवर पोहोचले असून गतवर्षीच्या तुलनेत यात १८ .७५% वाढ झाली आहे.

या अहवालावर आपले मत नोंदवताना, कॉइनडीसीएक्सचे सह-संस्थापक सुमित गुप्ता म्हणाले आहेत की,'क्रिप्टो ही आजच्या काळातली सर्वात डायनॅमिक अ‍ॅसेट क्लास आहे. २०२५ च्या पहिल्या सहा महिन्यांत कॉईनडीसीएक्सवर मजबूत ट्रेडिंग पाहायला मिळा लं आणि आता पुढील सहा महिन्यांमध्ये मध्ये हा वेग आणखी वाढतोय. फक्त जुलैच्या पहिल्या दोन आठवड्यांतच १९२ दशलक्ष युएसडी ट्रेडिंग व्हॉल्युम नोंदलं गेलं, जे जूनच्या तुलनेत ४०% अधिक आहे. बिटकॉइनचं ट्रेडिंग ८०% ने वाढलं, जे बीटीसीने ११६००० यु एसडीचा टप्पा गाठल्यामुळे झालं आहे. 'या सर्वांमध्ये अधिक आशादायक गोष्ट म्हणजे आमच्या गुंतवणूकदारांचं बदलतं प्रोफाइल. वापरकर्त्यांचं सरासरी वय आता ३० वर्षं असून २५-३५ वयोगटातील सहभाग वाढतोय, आणि टियर २ व टियर३ शहरांमधूनही क्रि प्टोला स्वीकारलं जात आहे. महिलांचा सहभाग आता १३-१४% पर्यंत पोहोचला आहे, आणि वर्षागणिक वाढतोय. या बदलांमुळे आमचा विश्वास बळकट होतोय की, क्रिप्टो आता अधिक सर्वसमावेशक, मुख्य प्रवाहातलं आणि दीर्घकालीन बनत आहे.'असे सुमित गु प्ता यांनी सांगितलं.

याशिवाय कंपनीने दावा केला आहे की,'कॉइनडीसीएक्सने यावर्षी भारत-केंद्रित धोरणाला गती दिली. या कालावधीत कंपनीने भारतातील सर्वात मोठी क्रिप्टो शिक्षण मोहीम अपसर्जच्या माध्यमातून सुरू केलीज्यामुळे २.७ लाखांहून अधिक यूझर्स सशक्त झाले.प्रो ट्रेडर स्टॅक मध्ये अपग्रेड्स केले. यामध्ये ट्रेडेट्रॉन-संचालित अल्गो ट्रेडिंग आणि मार्केटविंडचे स्ट्रॅटजी सिग्नल्स यांचा समावेश आहे. तसेच दर महिन्याला पारदर्शकता अहवाल जाहीर केले, ज्यात प्लॅटफॉर्मची स्थिती, यूझर्सचं संरक्षण आणि टीडीएस कँपेलन्सचं विवर ण देण्यात आलं.'
Comments
Add Comment

रायगड : आदिती तटकरेंना ध्वजारोहणाचा मान, रायगडमध्ये पुन्हा पालकमंत्रीपदावरून वाद

महायुतीचं सरकार आल्यापासून रायगडच्या पालकमंत्री पदावरुन असलेला वाद राज्याला सर्वश्रुत आहे.रायगडच्या

V Movies and TV: नवी दिल्लीतील स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण आता वी मूव्हीज अँड टीव्हीवर

स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावरील ध्वजारोहण आणि इतर समारंभाचे थेट प्रक्षेपण वी युजर्सना

पोको एम७ प्‍लस ५जी भारतात लाँच

मुंबई: भारतातील बहुप्रतिक्षित पोको कंपनीच्या पोको एम७ प्‍लस ५जी फोन (Variant) भारतात दाखल झाला आहे.या आघाडीच्‍या

'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण :स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला शेअर बाजारात वाढ ! सेन्सेक्स व निफ्टी उसळण्यामागे 'हे' आहे आजचे सविस्तर विश्लेषण वाचा एका क्लिकवर!

मोहित सोमण:उद्या स्वातंत्र्य दिना निमित्त व बाजारातील तिमाहीतील निकालावर सकारात्मकता गुंतवणूकदारांना

SIR प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : बिहारमधील SIR प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी करत दिग्गज वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद

स्वातंत्र्य दिनानिमित्त १०९० जणांना शौर्य/सेवा पदके जाहीर, महाराष्ट्राचे मानकरी येथे पहा...

महाराष्ट्रातल्या ०७ पोलिसांना शौर्य पदक, ०३ पोलिसांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक ३९ पोलिसांना