मोहित सोमण: जागतिक पातळीवरील घटणारी अस्थिरता, वाढणारा आत्मविश्वास, तसेच सीपीआय आकडेवारी सकारात्मक आल्यामुळे व प्रामुख्याने युएसमध्ये फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होईल अशी आशा निर्माण झाल्याने गुंतवणूकदारांचा बाजाराती ल विश्वास वाढल्याचा परिणाम म्हणून आज क्रिप्टोकरन्सी प्रचंड मोठी वाढ झाली आहे. बीटकॉइन (Bitcoin) मध्ये आज नवा उच्चांक प्रस्थापित झाला आहे. गेल्या चोवीस तासांत क्रिप्टोतील बीटकॉइनमध्ये १.५७% म्हणजेच जवळपास २% वाढ झाल्याने एका बीट कॉइनचे दर १२१७५६.७४ डॉलरवर पोहोचले आहेत. १२४१२८ डॉलरचा नव्या उच्चांकावर आज बीटकॉइन पोहोचला होता. त्यामुळे बीटकॉइनचे बाजारी भांडवल २.४५७ ट्रिलियन डॉलरवर पोहोचले आहे. गेल्या २४ तासात बीटकॉइनमध्ये ३.५८% उच्चांकाने वाढ झाली होती.
अल्फाबेटला मागे टाकत जगातील पाचव्या क्रमांकाची अल्फाबेटला मागे टाकत जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी मालमत्ता बनली आहे, फक्त सोने, ॲपल, मायक्रोसॉफ्ट आणि सौदी अरामकोनंतर आता बीटकॉइनचा नंबर लागतो. तज्ञांच्या मते, 'या वा ढीमुळे व्यापारी पुढील क्रिप्टोच्या स्फोटासाठी शोधत आहेत, कारण भांडवल बाजारात फिरू लागते.' मुख्यतः अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर जेरोम पॉवेल यांच्या नेतृत्वाखालील यूएस फेडरल रिझर्व्हकडून दर कपातीची अपेक्षा आणि अनेक घटकांमुळे या प्र मुख क्रिप्टोकरन्सीच्या किमतीत वाढ झाली आहे. गुरुवारी सकाळी १०:५० वाजता इथरियमची किंमत मागील दिवसाच्या तुलनेत १.९३ टक्क्यांनी वाढली आहे जी मागील दिवसाच्या तुलनेत $४,७४५.७३ इतकी होती, जी आदल्या दिवशी ४,७८९० डॉलरचा उच्चांका वरून थोडीशी कमी झाली. डॉलर-समर्थित (Dollar Supported) क्रिप्टोकरन्सीजमधील स्टेबलकॉइन्समध्ये -USDT टेथर (Tether) ०.०२ टक्क्यांनी वाढून १ डॉलर इतकी झाली आहे.दर कपातीची अपेक्षा ही नवीनतम ट्रिगर असू शकते,परंतु कायदेविषयक आ णि धोरणात्मक दबावाच्या स्वरूपात ट्रम्प प्रशासनाकडून व्यापक पाठिंबा देखील क्रिप्टोकरन्सीच्या तेजीला चालना देत आहे असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेमर यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत असे म्हटले हो ते की,' फेडने आतापर्यंत दर कमी करायला हवे होते आणि सप्टेंबरच्या बैठकीत त्यांना ५० बेसिस पॉइंट्स (बीपीएस) दर कपातीची अपेक्षा आहे.' ज्याचा फायदा क्रिप्टोग्राफीत होत आहे.
ट्रम्प यांच्या क्रिप्टोग्राफीतील निर्णयाचा बाजारात फायदा !
डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या क्रिप्टोग्राफीतील उदारीकरणामुळे (Liberlisation) धोरणात्मक निर्णयामुळे संस्थात्मक खरेदीला चालना मिळाली आहे.ट्रम्प प्रशासनाने ७ ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशात क्रिप्टोकरन्सीमध्ये ४०१ हजार डॉलर्स गुंतवणुकीसाठी दरवाजे उ घडले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केलेल्या '४०१ (K) गुंतवणूकदारांसाठी पर्यायी मालमत्तेचे लोकशाहीकरण प्रवेश' अशा शीर्षकाच्या कार्यकारी आदेशात असे म्हटले आहे की त्यांचे ' प्रशासन अमेरिकन कामगारांच्या सेवानिवृत्ती खात्यांना प्रति ष्ठित,आरामदायी निवृत्ती सुरक्षित करण्यासाठी आवश्यक असलेले स्पर्धात्मक परतावा (Competitive Return) आणि मालमत्ता विविधीकरण (Diversification) मिळविण्यापासून रोखणारे नियामक ओझे आणि खटल्यांचा धोका कमी करेल.'
मसुद्यातील नमूद केलेल्या माहितीनुसार,ऑर्डर अंतर्गत पर्यायी मालमत्तांची व्याख्या इक्विटी, कर्ज आणि सार्वजनिक एक्सचेंजवर व्यवहार न होणारी इतर आर्थिक साधने म्हणून केली जाते. या आदेशात अमेरिकेच्या कामगार सचिवांना ४०१(K) गुंतवणुकींबाबतच्या नियमांवरील मार्गदर्शनाचा पुनर्विचार (Rethink) करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. इन्व्हेस्टमेंट कंपनी इन्स्टिट्यूटच्या मते, सध्या ४०१(के) अंतर्गत म्युच्युअल फंडांमध्ये मोठ्या प्रमाणात मालमत्ता आहेत. ही एक गुंतवणूक तरतूद आहे जी अमेरिकन नागरिकां ना त्यांच्या पेमेंटचा काही भाग कापून निवृत्ती बचतीसाठी सरकारने परवानगी दिलेल्या मालमत्तेत गुंतवणूक करण्याची परवानगी देते. स्टेबलकॉइन नियमनासाठी जीनियस कायदा तसेच क्रिप्टो आणि ब्लॉकचेन ट्रेडिंगसाठी मार्गदर्शक तत्त्वे सुलभ करण्याच्या अमेरि कन बाजार नियामक एसईसीच्या (Securities Exchange Commission) योजना मंजूर झाल्यानंतर ट्रम्प प्रशासन क्रिप्टो अनुकूल राहण्याचे वचन पूर्ण करण्यासाठी दिलेल्या नव्या आदेशामुळे संस्थात्मक गुंतवणुकीत (Institutional Investment) मध्ये वाढ झाली आहे.
याविषयी भाष्य करताना तज्ञ सायकॅमोर यांनी सोशल मिडियावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे ज्यामध्ये ते म्हणतात, ' बिटकॉइनची रॅली संस्थात्मक प्रवाह आणि मॅक्रो टेलविंड्सद्वारे चालत आहे. मायक्रोस्ट्रॅटेजी आणि ब्लॉक इंक. सारख्या कॉर्पोरेट ट्रेझरी बिट कॉइन खरेदी करत आहेत,' असे सायकॅमोर यांनी बेसेंटच्या दर कपातीच्या आवाहनाचा आणि ट्रम्पच्या 'अलीकडेच स्वाक्षरी केलेल्या कार्यकारी आदेशाचा हवाला देत, ज्यामध्ये क्रिप्टोकरन्सीसह पर्यायी मालमत्ता, ४०१(के) निवृत्ती निधीमध्ये समाविष्ट करण्याची पर वानगी आहे' असा हवाला दिला.
BTC (Bitcoin) आणि ETH (ETher) मध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे का?
सायकॅमोरच्या मते, जर १२५००० डॉलरपेक्षा जास्त घसरण झाली तर बिटकॉइन १५०००० डॉलरचा टप्पा ओलांडू शकेल. लैम ध्ये ४८ टक्क्यांनी वाढल्यानंतर ऑगस्टमध्ये आतापर्यंत २७ टक्क्यांनी वाढलेला इथरियम ५५०० डॉलर्सपर्यंत आणखी एक उच्चांक गठ ण्याची शक्यता आहे,'असे त्यांनी सांगितले. क्रिप्टोग्राफीतील अस्थिरताही मोठ्या प्रमाणात असू शकते याविषयी तज्ञांनी बोलताना म्हटले आहे की,'बिटकॉइन विक्रमी उच्चांकावर असल्याने आणि अनेक ऑल्टकॉइन्समध्ये स्फोटक गती दिसून येत असल्याने,ऑगस्ट चा उर्वरित भाग अविश्वसनीय संधी देऊ शकतो जरी बाजार नवीन क्षेत्राची चाचणी घेत असताना व्यापाऱ्यांनी जोरदार चढउतारांसाठी (Volatility) तयार असले पाहिजे.' क्रिप्टोत बीटकॉइनशिवाय, गेल्या २४ तासात XRP (१.२७%), Dogecoin (२.९६%), Sui (० .०४%), Ethena (०.०५%) अपवाद वगळता इतर क्रिप्टोग्राफीत मोठी वाढ झाली आहे. सर्वाधिक वाढ Solana (१.८७%), Cardano (१३.४९%), Hyperliquid (४.२३%), TRON (३.०८%),UNUS SED LEO (०.२८%) करन्सीत वाढ झाली आहे.
डॉलर समर्थित (Dollar Supported) क्रिप्टोकरन्सीजमधील स्टेबलकॉइन्समध्ये -USDT टेथर (Tether) ०.०२ टक्क्यांनी वाढून १ डॉलर इतकी झाली आहे.दर कपातीची अपेक्षा ही नवीनतम ट्रिगर असू शकते, परंतु कायदेविषयक आणि धोरणात्मक दबावाच्या स्वरूपात ट्रम्प प्रशासनाकडून व्यापक पाठिंबा देखील क्रिप्टोकरन्सीच्या तेजीला चालना देत आहे, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेमर यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत असे म्हटले होते की,' फेडने आतापर्यंत दर कमी करायला हवे होते आणि सप्टेंबरच्या बैठकीत त्यांना ५० बेसिस पॉइंट्स (बीपीएस) दर कपातीची अपेक्षा आहे.' ज्याचा फायदा क्रिप्टोग्राफीत होत आहे. क्रिप्टोग्राफीतील अस्थिरताही मोठ्या प्रमाणात असू शकते याविषयी तज्ञांनी बोलताना म्हटले आहे की, बिटकॉइन विक्रमी उच्चांकावर असल्याने आणि अनेक ऑल्टकॉइन्समध्ये स्फोटक गती दिसून येत असल्याने, ऑगस्टचा उर्वरित भाग अविश्वसनीय संधी देऊ शकतो - जरी बाजार नवीन क्षेत्राची चाचणी घेत असताना व्यापाऱ्यांनी जोरदार चढउतारांसाठी (Volatil ity) तयार असले पाहिजे.'
क्रिप्टोत बीटकॉइनशिवाय, गेल्या २४ तासात XRP (१.२७%), Dogecoin (२.९६%), Sui (०.०४%), Ethena (०.०५%) अपवाद वगळता इतर क्रिप्टोग्राफीत मोठी वाढ झाली आहे. सर्वाधिक वाढ Solana (१.८७%), Cardano (१३.४९%), Hyperliquid (४.२३ %), TRON (३.०८%),UNUS SED LEO (०.२८%) करन्सीत वाढ झाली आहे.