कालकाजी परिसरातील दुर्घटनेत जखमी झालेले दोघे हे नात्याने वडील आणि मुलगी आहेत. दुर्घटना कालकाजी ए ब्लॉक हंसराज सेठी मार्गावर झाली. झाड कोसळल्यामुळे एका दुचाकीवर बसलेले दोघे जखमी झाले. तसेच आसपासच्या काही वाहनांचेही नुकसान झाले. झाडाचे लाकूड वजनदार असल्यामुळे पडलेले झाड हटवणे आणि नुकसान झालेल्या वाहनांतील नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढणे हेच आव्हान होते. पोलीस आणि स्थानिकांनी संयुक्तपणे मदतकार्य करुन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.