ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी रोहित शर्माचा माजी प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्यासोबत सराव

मुंबई : भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने माजी सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्यासोबत सराव सत्रात भाग घेतला. हिटमॅनने त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून हा फोटो शेअर केला. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया कपनंतर भारतीय संघ ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. या काळात दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाईल. त्याआधी एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहितने सराव सुरू केला आहे.


रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-२० आंतरराष्ट्रीय आणि कसोटी स्वरूपातून निवृत्ती घेतली आहे आणि आता या दोन्ही फलंदाजांच्या एकदिवसीय भविष्याबद्दल अनेक चर्चा भारतीय क्रिकेटमध्ये रंगत आहे. पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळ या दोघांच्या बाबतीत कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी घाई करण्याच्या मनस्थितीत नाही. भारतीय क्रिकेटमध्ये अशी चर्चा आहे की, ऑक्टोबर २०२७ मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत रोहित ४० वर्षांचा असेल आणि कोहली ३९ वर्षांचा असेल. अशा परिस्थितीत, हे दोन्ही दिग्गज तोपर्यंत संघात टिकू शकतील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जर रोहित आणि कोहलीच्या मनात काही असेल तर ते इंग्लंडविरुद्धच्या कसोटी दौऱ्यापूर्वी जसे बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले होते तसे ते आपल्या भविष्याबबात चर्चा करतील. भारतीय संघाच्या दृष्टिकोनातून पुढची मोठी स्पर्धा फेब्रुवारीमध्ये होणारा टी-२० विश्वचषक आणि त्यासंबंधीची तयारी आहे. सध्या आशिया कप टी-२० स्पर्धेसाठी सर्वोत्तम संघ पाठवण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.


विराट कोहली आता लंडनमध्ये राहतो आणि अलीकडेच त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये तो इनडोअर नेट सेशनमध्ये सराव करताना दिसला. यावरून असे दिसून येते की त्याने सराव सुरू केला आहे. रोहित शर्मा आयपीएलनंतर सुट्टीसाठी इंग्लंडमध्ये होता. पण आता तो मुंबईत परतला आहे आणि सराव सुरू केला आहे.

Comments
Add Comment

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना

रायपूरमध्ये होणार भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना

रायपूर: दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा रांचीतील पहिला सामना जिंकून भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेची दमदार सुरुवात