भारतात किरकोळ महागाई २०१७ नंतर रेकॉर्डब्रेक घसरण ! स्वस्ताईचा महापूर?

प्रतिनिधी: भारताची अर्थव्यवस्था सुस्थितीत असल्याचा आणखी एक पुरावा पुढे आला आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने नुकतीच सीपीआय आकडेवारी जाहीर केली आहे. ग्राहक महागाई निर्देशांकात (Consumer Price Index CPI) यामध्ये गेल्या आठ महिन्यातील सर्वाधिक घसरण झाली आहे. त्यामुळे हा दर जुलै २०१७ नंतर सर्वात निचांकी पातळीवर पोहोचला असल्याने किरकोळ महागाईत ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. यामुळे किरकोळ महागाई (Retail Inflation) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) १.५५% घसरण झाली आहे असे मंत्रालयाने जाहीर केले.


आकडेवारीनुसार, जून महिन्यापासून ५५ बेसिस पूर्णांकाने किरकोळ महागाईत घसरण झाली. ज्यामुळे हेडलाईन इन्फ्लेशन (महागाई) मध्ये घसरण झाली आहे. ग्राहक अन्न किंमत निर्देशांक (Consumer Price Food Index CPFI) यामध्ये जून महिन्यातील १. ०१% तुलनेत जुलैमध्ये १.७६% घसरण झाल्याचे आकडेवारीत म्हटले आहे.त्यामुळे विशेषतः अन्नाच्या किंमतीत लक्षणीय घसरण झाली असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. जानेवारी २०१९ पासून घसरलेली ही सर्वोत्तम पातळी आहे. प्रामुख्याने डाळी,कडधान्ये, अंडी, साखर, भाज्या यांच्या किंमतीत घसरण झाल्याने एकूण निर्देशांकात घसरण झाली. शहरी भागातील किरकोळ महागाईतील हेडलाईन इन्फ्लेशन मध्ये जून महिन्यातील २.५६% वरून जुलै महिन्यात २.०५% घसरण झाली. ग्रामीण भागात हेडलाईन इन्फ्लेश नमध्ये जून महिन्यातील १.७२% वरून जुलै महिन्यात १.१८% वर घसरण झाली. शहरी भागातील अन्न महागाईत जून महिन्यातील १.९०% वरून जुलै महिन्यात १.१७% घसरण झाली आहे. तर ग्रामीण भागातील अन्न महागाईत जून महिन्यातील ०.८७% वरून जुलै महिन्यात १.७४% घसरण झाली.


विशेषतः सर्वाधिक घसरण वाहतूक दळणवळण व संवाद क्षेत्रात झाल्याचे आकडेवारीत नमूद केले गेले. या क्षेत्रातील महागाईत जून महिन्यातील ३.९०% वरून घसरण होत २.१२% घसरण जुलैत झाली. याशिवाय घरगुती महागाईत (Housing Inflation) मध्ये जून महिन्यातील ३.१८ वरून जुलै महिन्यात ३.१७% वर घसरण झाली. शैक्षणिक महागाईत (Housing Inflation) जून महिन्यातील ४.३७% तुलनेत घसरण होत जुलै महिन्यात ४.००% घसरण झाली. केवळ आरोग्य महागाईत (Health Inflation) ४.३८% व रुन जुलै महिन्यात ४.५७% वाढ झाली आहे. महागाईत झालेल्या घसरणीने ग्राहकांना अनिश्चिततेच्या कालावधीत मोठा दिलासा मिळाला आहे. आधीच टॅरिफ वाढीमुळे भारतीय बाजारपेठेवर परिणाम झाला असताना महागाईत झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांच्या खिशालाही दिलासा मिळाला आहे. हेडलाईन इन्फ्लेशन मध्ये झालेल्या घसरणीचा फायदा सरकारी नियोजन कार्यक्रमाच्या धोरणावर (Policy Making) वर होऊ शकतो ज्यामध्ये अर्थव्यवस्थेलाही अतिरिक्त चालना मिळणे अपेक्षित आहे.

Comments
Add Comment

पालघर नगरपरिषद निवडणुकीत आघाडीत बिघाडी !

महायुतीमध्येही पडली उभी फूट पालघर (प्रतिनिधी) : पालघर जिल्ह्यात होणाऱ्या तीन नगरपरिषदेसह एका नगरपंचायत

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेस ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ

मुंबई - मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील महिलांची ई-केवायसी प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू असताना, अलिकडे

कुठे काका विरुद्ध पुतण्या, तर कुठे दादा, भावजयी रणांगणात

नगर परिषद निवडणुकीत ‘घर घर की कहानी’ गाजणार मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर

अनगरमध्ये भाजपचा एकहाती विजय! १७ पैकी १७ उमेदवार बिनविरोध निवडून

अनगर : मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीमध्ये स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. भाजपने सर्व

भारत-चीन संबंधांमध्ये सकारात्मक बदल; लष्करप्रमुखांनी दिली महत्वाची माहिती

नवी दिल्ली : भारत-चीन सीमावर्ती तणावाबाबत गेले काही महिने सकारात्मक घडामोडी घडत असल्याचे लष्करप्रमुख जनरल

'भाजप काँग्रेसचा सर्वाधिक आमदारांचा विक्रम मोडणार'

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर, देशभरात भाजपच्या आमदारांची संख्या वाढली आहे.