'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: सेन्सेक्स व निफ्टी फुल तेजीत काय सुरु आहे पडद्यामागील हालचाली जाणून घ्या सविस्तर विश्लेषण

  36

मोहित सोमण: आज अखेरच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात वाढ झाली आहे. बाजाराची सांगता होताना सेन्सेक्स निर्देशांक ३०४.३२ अंकाने उसळत ८०५३९.९१ पातळीवर स्थिरावला आहे. निफ्टी ५० निर्देशांक हा १३१.९५ अंकांनी बंद झाला असून २४६१ ९ .३५ पातळीवर स्थिरावला आहे. सेन्सेक्स व निफ्टीत आज सकाळची वाढ अखेरच्या सत्रात कायम राहण्याचे प्रबळ कारण म्हणजे अमेरिकेसह आशियाई बाजारातील रॅली आहे. सगळीकडे 'फिल गुड' वातावरण कायम राहिल्याने सेंटीमेंट आधारावर गुंतवणूकदा रांनी आज गुंतवणूकीत वाढ केल्याची शक्यता आहे


सेन्सेक्स बँक निर्देशांकात १७६.१० अंकाने व बँक निफ्टीत १३७.७५ अंकाने घसरण झाली आहे ‌ सेन्सेक्स व निफ्टी दोन्ही बँक निर्देशांकात अनुक्रमे ०.२५%,०.२९% वाढ झाल्याने मार्जिंनली मोठी वाढ झाली नसली तरी हीच वाढलेली पातळी बाजारात आधारभूत ठ रली आहे. सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.५६%,०.५८% वाढ झाली आहे. निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.६३%,०.६६% वाढ झाली. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात अखेरच्या सत्रापर्यंत बहुतांश निर्देशांकात वाढच झाली आहे. पीएसयु बँक (०.१४%), मिडस्मॉल आयटी टेलिकॉम (०.२९%), तेल व गॅस (०.०५%) समभागात वगळता इतर क्षेत्रीय निर्देशांकात वाढ झाली. सर्वाधिक वाढ हेल्थकेअर (२.१३%), मिडस्मॉल हेल्थकेअर (१.२६%), मिडिया (०.८८%), खाजगी बँक (०.३१%), फायनांशियल स र्व्हिसेस एक्स बँक (१.१०%), मिडस्मॉल फायनांशियल सर्व्हिसेस (१.३६%) निर्देशांकात वाढ झाली आहे.


याशिवाय ट्रम्प यांच्या ट्रेझरी सचिवाने भारतावर अप्रत्यक्ष टीका करत व्यापारात भारत अविचारी असल्याचा आरोपवजा टोमणा मारला होता. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, कदाचित नरेंद्र मोदी आगामी काळात डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेऊ शकतात. या सह युएस ट्रेझरी सचिव स्कॉट बेंसेंट यांनी म्हटल्याप्रमाणे भारत व युएस यांच्यातील अंतिम बोलणी ऑक्टोबर महिन्यात अपेक्षित आहे. याशिवाय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अलास्का येथे रशियन अध्यक्ष पुतीन यांना भेटणार आहेत व कालच युएसने चीनव रील अतिरिक्त टॅरिफ हटविले असून अंतिम चर्चेसाठी चीनला ९० दिवसांचा कालावधी दिला आहे. विशेषत: अमेरिकेने आपले किरकोळ महागाई आकडेवारी जाहीर केली ज्यामध्ये युएसचा ग्राहक किंमत निर्देशांक (Consumer Price Index) म्हणजेच किरको ळ महागाई केवळ ०.२% वाढल्याने गुंतवणूकदारांच्या सप्टेंबर महिन्यातील युएस फेड व्याज दर कपातीची आशा पल्लवित झाल्या आहेत. खरं तर विश्लेषकांचा मते आणखी महागाई (०.५% किंवा त्याहून अधिक) महागाई अपेक्षित होती परंतु ती तुलनेत कमी प्रमा णात वाढल्याने गुंतवणूकदारांचा अपेक्षा वाढल्याने अमेरिकेतील बाजारात काल अखेरीस विक्रमी वाढ झाली होती. कालही ट्रम्प यांनी युएस फेडरल रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर जेरोमी पॉवेल यांना LawSuit ची धमकी देत लवकरच दरकपातीची मागणी केली होती. डो नाल्ड ट्रम्प यांनी आज पुन्हा एकदा माध्यमासमोर ही मागणी केली. दुसरीकडे अमेरिकेतील गुंतवणूकदारांनी नवीनतम चलनवाढीचा डेटा पचवल्यामुळे आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर शुल्काचा परिणाम विचारात घेतल्याने बुधवारी अमेरिकेच्या ट्रेझरी उत्पन्नात घट झाली. त्यामुळे कितपत दरकपात सप्टेंबर महिन्यात होईल यावर प्रश्नचिन्ह आहे.


सकाळच्या सत्रापर्यंत सोन्याच्या व कच्च्या तेलाच्या निर्देशांकात घसरण झाली होती. प्रामुख्याने रशिया युएस, युएस चीन यांच्यातील 'टेंशन' कमी झाल्याने दोन्ही कमोडिटीतील स्पॉट बुकिंग मध्ये घसरण झाली परिणामी दरपातळी मर्यादित होती. दुपारपर्यंत सोन्या च्या दरात घसरण होत असताना अखेरच्या सत्रात किचिंत वाढ सोन्यात सुरु झाली आहे. ती प्रामुख्याने पुन्हा एकदा गुंतवणूकीचा पर्याय म्हणून स्पॉट बुकिंगमध्ये सुरू झालेल्या नव्या पोझिशन मध्ये होत आहे. अखेरच्या सत्रापर्यंत ट्रेड बँक ऑप्टिमिझम कायम राहि ल्याने मोठी वाढ अजुन सुरु झालेली नाही. सोन्याच्या जागतिक गोल्ड फ्युचर निर्देशांकात मात्र ०.५१% वाढ झाली आहे.


कच्च्या तेलाच्या निर्देशांकात काल पर्यंत दबाव संपल्याने कच्चे तेल (Crude Oil) सामान्य पातळीवर होते. कालही अखेरच्या सत्रात कच्च्या तेलाच्या निर्देशांकात घसरण झाली होती. आजही संध्याकाळी कच्च्या तेलाच्या WTI Futures निर्देशांकात ०.८२%, Br ent Future निर्देशांकात ०.६४% घसरण झाली होती. कच्च्या तेलाच्या स्पॉट बुकिंग अथवा मागणीत वाढ न झाल्याने व तात्पुरत्या स्थिरतेसह डॉलरमध्ये झालेल्या घसरणीमुळे दुपारपर्यंत कच्चे तेल स्वस्त झाले होते. आज अखेरच्या सत्रापर्यंत युएस बाजारातील न व्या आकडेवारीचा फटका मात्र पुन्हा एकदा रूपयाला बसल्याने डॉलर आज वधारला आहे. आज अखेरच्या सत्रापर्यंत एचडीएफसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, जेएम फायनांशियल सर्व्हिसेस, अपोलो हॉस्पिटल, टाटा मोटर्स, टाटा स्टील , हिंदाल्को इंडस्ट्रीज अशा तुल्य बळ शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे बाजारातील निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाला आहे. याखेरीज मात्र आज मारूती सुझुकी, पीजी इलेक्ट्रोप्लास्ट, सुझलॉन, एमआरएफ, अदानी पॉवर, विप्रो यांसारख्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे निर्देशांक मर्यादित पात ळीवर वाढला आहे.


अखेरच्या सत्रात बाजार बंद होताना आशियाई बाजारात युएस बाजारातील रॅलीचा झालेला फायदा कायम राहिल्याने आज सगळ्याच बाजारात मोठी वाढ झाली आहे. निकेयी २२५ (१.२९%), स्ट्रेट टाईम्स (१.२२%), हेंगसेंग (२.२९%), तैवान वेटेड (०.८७%), सेट कंपोझिट (१.४४%), शांघाई कंपोझिट (०.४८%) या सगळ्याच शेअर बाजारात मोठी वाढ झाली आहे. युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात तिन्ही शेअर बाजारात मोठी रॅली झाली आहे ज्यामध्ये डाऊ जोन्स (०.३८%), एस अँड पी ५०० (१.१३%), नासडाक (१. ३९%) पातळीवर वाढला आहे. आज हेल्थकेअर व वित्तीय बँकिंग शेअर्समध्ये वाढ झाल्याने मिड व स्मॉल शेअरला सपोर्ट लेवल मिळण्यास मदत झाली. अखेरच्या सत्रात बीएसईत ४२४६ समभागापैकी २२३० समभागात वाढ झाली आहे तर १८६४ समभागात घस रण झाली आहे. एनएसईत ३०६१ समभागापैकी (Stocks) १६८५ समभागात वाढ झाली आहे तर १२८७ समभागात घसरण झाली आहे. विशेषतः एनएसईत आज ९९ शेअर अप्पर सर्किटवर कायम राहिले असून ५९ शेअरही लोअर सर्किटवर कायम राहिले आहे त.


अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ एनएमडीसी स्टील (२०.००%), जेएम फायनांशियल सर्व्हिसेस (१५.०१%), एचबीएल इंजिनिअरिंग (१०.३२%), अपोलो हॉस्पिटल (७.०९%), गोदरेज इंडस्ट्रीज (७.२६%), भारत डायनामिक्स (७.०७%), बीएसई (५.३९%), गार्डन री च (५.१६%), एफएसएन ई कॉमर्स (५.८०%), होनसा कंज्यूमर (५.८९%), हिंदाल्को (५.०१%), एंजल वन‌ (४.९८%), मदर्सन (३.४८%), झायडस लाईफ सायन्स (३.४५%), झी एंटरटेनमेंट (३.१६%), वन ९७ (३.१३%), सोलार इंडस्ट्रीज (३.०६%), सिप्ला (२.५९ %), भारत फोर्ज (२.५३%), एमसीएक्स (२.३०%), माझगाव डॉक (२.१६%), हिताची एनर्जी (२.०५%), स्विगी (१.८२%), टीटागढ रेल (१.७६%), लेमन ट्री हॉटेल (१.६४%), ओला इलेक्ट्रिक (१.७१%), सीडीएसएल (१.४८%), ओएनजीसी (१.३४%), ओबेरॉय रिअ ल्टी (०.७९%), एचडीएफसी बँक (०.५३%), टाटा मोटर्स (१.४१%), टाटा स्टील (०.१२%) समभागात झाली आहे.


अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण कोरोमंडलम इंटरनॅशनल (५.८२%), पीजी इलेक्ट्रोप्लास्ट (५.६५%), एसव्हीजेएन (४.६३%), बाटा इंडिया (३.४२%), बजाज हाउसिंग (३.४२%), भारती हेक्साकॉम (३.०६%), रेडिको खैतान (२.४२%), सोनाटा सॉफ्टवेअर (१.६ ५%), एसईएमई सोलार होल्डिंग्स (१.३३%), एमआरएफ (१.२१%), पतांजली फूड (१.२०%), जेएसडब्लू होल्डिंग्स (१.२०%), गोदरेज अँग्रोवेट (१.१६%), बँक ऑफ महाराष्ट्र (१.११%), अदानी पोर्ट (०.८२%), न्यूजेन सॉफ्टवेअर (०.८२%), अदानी ग्रीन (०.७३%), वरूण बेवरेज (०.६१%), बँक ऑफ बडोदा (०.५२%), अदानी एंटरप्राईजेस (०.३५%), कोफोर्ज (०.२३%), आयसीआयसीआय बँक (०.०८%), मारूती सुझुकी (०.०५%) समभागात झाली आहे.


अखेरच्या सत्रावर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले की,' भारतीय शेअर बाजारांमध्ये व्यापक आशावाद दिसून आला कारण सीपीआयने आठ वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले, ज्यामुळे ऑ टो आणि धातूंच्या नेतृत्वाखालील विवेकाधीन खर्चात पुनरुज्जीवन होण्याची आशा वाढली. मिडकॅप्सने चांगली कामगिरी केली, जी गुंतवणूकदारांच्या मजबूत इच्छा दर्शवते. जागतिक स्तरावर, चीनच्या टॅरिफ डेडलाइनच्या विस्तारामुळे आणि तेलाच्या किमती कमी केल्यामुळे भावना सुधारल्या. ट्रम्पच्या व्यापारी भूमिकेबद्दल अनिश्चितता आणि जागतिक जोखमी असूनही, टॅरिफ अपडेट्सच्या आधारावर जोखीम ते किरकोळ डाउनग्रेडसह भारताची वाढ-महागाईची गतिशीलता आर्थिक वर्ष २६ साठी अनुकूल राहिली आहे. टॅ रिफ अपडेट्सच्या आधारावर जोखीम ते किरकोळ डाउनग्रेडसह भारत १५ ऑगस्ट रोजी ट्रम्प-पुतिन भेटीची उत्सुकता पाहत आहे.'


आजच्या बाजारातील निफ्टीवर विश्लेषण करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक रूपक डे म्हणाले आहेत की,' सुरुवातीला अनिश्चिततेच्या काही तासांनंतर, निफ्टी दिवसभर मजबूत राहिला, अनेक दिवसांच्या उच्चांकावर बंद झाला आणि टॅरिफशी संबंधित चिंतांमुळे सुधारित भावना दर्शवितो. दैनिक आरएसआयने (Relative Strength Index RSI) अलीकडेच सकारात्मक क्रॉसओवरमध्ये प्रवेश केला आहे आणि अनेक दिवसांच्या अनिश्चिततेनंतर ही गती कायम ठेवली आहे. भावनांमध्ये सुधारणा होण्याची चिन्हे दिसत असल्याने, निफ्टी २४७०० पातळीच्या प्रतिकाराच्यावर (Resistance) जाण्याची शक्यता वाढली आहे. या पातळीपेक्षा एक निर्णायक पाऊल टाकल्यास अल्पावधीत २५२०० पातळीच्या दिशेने वाढ होऊ शकते. खालच्या बाजूला, स मर्थन (Down turn Support) २४३३७ पातळीवर आहे, ज्याच्या खाली गतिशीलता पुन्हा एकदा मंदीच्या बाजूने वळेल.'


आजच्या बाजारातील सोन्याच्या हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'यूएस सीपीआय डेटा कमी झाल्यामुळे एमसीएक्सवर सोन्याचा भाव सकारात्मक झाला, तो ३५० रुपयां नी वाढून १००५०० रुपयांवर बंद झाला, ज्यामुळे अमेरिकेत येणाऱ्या दर कपातीची भावना वाढली. कॉमेक्स सोन्याचा भाव १८ डॉलरने वाढून ३३६५ डॉलरवर पोहोचला तर मजबूत रुपयामुळे देशांतर्गत किमतींमध्ये आणखी वाढ झाली. महागाईच्या मंद वाचनामुळे फेडच्या अधिक कमकुवत भूमिकेची अपेक्षा वाढली आहे, ज्यामुळे जवळच्या काळात सोन्याला आधार मिळाला आहे. सोन्याची श्रेणी ९९५०० ते १०२००० दरम्यान दिसून येते.'


आजच्या बाजारातील रूपयावर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,' १५ ऑगस्ट रोजी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन भेटणार असल्याने रशिया-युक्रेन संघर्षात सं भाव्य सकारात्मक घडामोडींबद्दल आशावाद निर्माण झाल्याने रुपया ८७.५१ वर मजबूत झाला, जो ०.२३ पैशांनी वाढला. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमधील मऊ सीपीआय (Soft CPI) डेटामुळेही भावनेला चालना मिळाली. रुपया ८७.२५-८८.०० च्या श्रे णीत व्यापार करण्याची अपेक्षा आहे.'


आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्व्हिसेसचे हेड ऑफ रिसर्च सिद्धार्थ खेमका म्हणाले आहेत की,'जुलैमध्ये भारताचा किरकोळ महागाई दर ८ वर्षांच्या नीचांकी १.५५%(जून २५ मध्ये २.१०%) वर घसरल्याने निफ्टी १३२ अंकांनी वाढून २४,६१९ (+०.५%) वर बंद झाला, ज्यामुळे देशांतर्गत भावना सुधारल्या, जरी जागतिक भू-राजकीय वातावरण अजूनही कृतींनी भरलेले असले तरी..आशावादात भर घालत बातम्यांमधील वृत्तानुसार भारतीय पंतप्रधान पु ढील महिन्यात संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला उपस्थित राहण्यासाठी अमेरिकेला भेट देऊ शकतात, ज्यामुळे दोन्ही देशांमधील वाढत्या व्यापार तणावादरम्यान द्विपक्षीय चर्चेची आशा निर्माण झाली आहे. राजनैतिक आघाडीवर, भारताचे परराष्ट्र मंत्री २१ ऑगस्ट रोजी रशियाला भेटण्यासाठी एससीओ बैठकीच्या बाजूला त्यांच्या समकक्षांना भेटणार आहेत.१५ ऑगस्ट रोजी अलास्का येथे होणाऱ्या रशिया-अमेरिका अध्यक्षीय बैठकीच्या काही दिवसांनंतर. या चर्चेतून कोणताही निष्कर्ष निघाल्यास रशियाच्या तेल आयातीवर भारता वर लादलेले दुय्यम शुल्क काढून टाकण्याची आशा निर्माण होऊ शकते.


याव्यतिरिक्त, जुलैमध्ये अमेरिकेतील किरकोळ महागाई २.८% च्या अंदाजापेक्षा २.७% वर आली होती, जी अपेक्षेपेक्षा कमी होती, त्यामुळे सप्टेंबर २०२५ मध्ये फेडकडून दर कपातीची शक्यता वाढली. व्यापक बाजारपेठेत खरेदीचा उत्साह दिसून आला,निफ्टी मि डकॅप१०० आणि स्मॉलकॅप१०० मध्ये प्रत्येकी ०.६% वाढ झाली. आरोग्यसेवा (+२.१%) आणि फार्मा (+१.७%) निर्देशांकांनी क्षेत्रीय नफ्याचे नेतृत्व केले, ज्यांना अपोलो हॉस्पिटल्स आणि अल्केम लॅब्स सारख्या कंपन्यांकडून मिळालेल्या चांगल्या कमाईमुळे पाठिंबा मिळाला.अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने भारतातून पीव्ही सेल/मॉड्यूल आयातीवर अँटी-डंपिंग आणि काउंटरव्हेलिंग ड्युटी चौकशी सुरू केल्यानंतर सौर सेल/मॉड्यूल उत्पादक कंपन्यांच्या शेअर्सवर दबाव होता, ज्यामुळे निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता होती. मंगळवारी एफआयआय निव्वळ विक्रेते राहिले आणि त्यांनी ३४०० कोटी रुपयांचे इक्विटीज ऑफलोड केले.


देशांतर्गत मॅक्रो आघाडीवर, ऑगस्ट २०२५ च्या सुरुवातीला अखिल भारतीय संचयी पाऊस त्याच्या दीर्घकालीन सरासरी (एलपीए)पेक्षा २% जास्त आहे. जुलैच्या दुसऱ्या सहामाहीपासून, पाऊस एलपीए (LPA) पेक्षा किंचित कमी होऊन ०.५% वर आला, ज्यामुळे एकूण मासिक सरासरी कमी झाली. या मध्यम असूनही, जून-जुलै २५ मान्सून अनुकूल राहतो, ज्यामुळे किरकोळ महागाई कमी होऊन उर्वरित हंगामात ग्रामीण भागातील संभाव्यता आणि ग्राहकांच्या मागणीला आधार मिळतो.एकूणच, आम्हाला अपेक्षा आहे की बाजार श्रेणीबद्ध राहील आणि शुक्रवारी होणाऱ्या यूएस-रशिया शांतता चर्चेच्या निकालांबाबत सावधगिरी बाळगल्यामुळे देशांतर्गत-मुखी विषय अनुकूल राहतील.'


यामुळे आजच्या बाजारातील स्थिती पाहता ही रॅली उद्याही टिकून राहिल का? हा यक्षप्रश्न आहे मात्र आगामी तिमाही निकालासह क्षेत्रीय विशेष निर्देशांकातील कामगिरी उद्या प्रभावी ठरू शकते.

Comments
Add Comment

Arjun Tendulkar: सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनचा सानियासोबत साखरपुडा संपन्न, पाहा कोण आहे अर्जुनची होणारी पत्नी

मुंबई: भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या घरी अतिशय आनंदाचं वातावरण आहे. त्याचा मुलगा, अष्टपैलू

लालबागचा राजा मंडळाकडून अग्निशमन दल घेते दिवसाला सव्वा लाख भाडे

भाडे कमी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून सार्वजनिक

'ऑपरेशन सिंदूर'मध्ये एफ-१६ विमान पाडल्याच्या दाव्यावर अमेरिकेचे मौन

वॉशिंग्टन: भारत आणि पाकिस्तान यांच्यात ७ ते १० मे दरम्यान झालेल्या 'ऑपरेशन सिंदूर' या ८८ तासांच्या संघर्षात

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, डॉक्टरचा जागीच मृत्यू!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या एका दुःखद अपघातात ३२ वर्षीय डॉक्टर प्रियांका अहिर यांचा मृत्यू झाला. ही

Stray Dog Shelter : कुत्र्यांमुळे मृत्यू झालेल्यांना परत आणणार आहात का? सुप्रीम कोर्टाने प्राणीप्रेमींना धरले फैलावर; काय आहेत कोर्टाचे कडक आदेश?

नवी दिल्ली : मुंबईत कबुतरखान्यावरून सुरू असलेला वाद थंड पडलेला नाही, तसेच दुसरीकडे दिल्ली-एनसीआरमध्ये भटक्या

मुंबई गणेशोत्सवासाठी सज्ज, चौपाटीवर विसर्जनाची तयारी!

मुंबई : गणेश चतुर्थीच्या आगमनामुळे मुंबईत जोरदार तयारी सुरू झाली आहे, विशेषतः गिरगाव चौपाटीवर, जे विसर्जनाचे एक