Gold Rate Today: सोन्यात सलग चौथ्यांदा घसरण कायम

मोहित सोमण: आज भारतीय सोन्याच्या दरात सलग चौथ्यांदा किरकोळ घसरण झाली आहे. युएस बाजारातील स्थिरता, आशियाई शेअर बाजारातील वाढ या एकत्रित कारणांमुळे जागतिक पातळीवरील सोन्यातही घसरण झाली होती. मात्र रूपयांच्या किरकोळ घसरणीने अपेक्षित घसरण संध्याकाळपर्यंत होऊ शकली नाही. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ५ रूपयाने, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ५ रूपये व १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ४ रुपयांनी घसरण झा ली आहे. त्यामुळे सोन्याचे आजचे दर अनुक्रमे २४ कॅरेटसाठी १०१३५ रूपये,२२ कॅरेटसाठी ९२९० रूपये,१८ कॅरेटसाठी ७६०१ रूपये पातळीवर पोहोचले आहेत. संकेतस्थळावरील माहितीनुसारच, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ५० रुपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ५० रूपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ४० रूपयांनी घसरण झाल्याने प्रति तोळा दर अनुक्रमे २४ कॅरेटसाठी १०१३५० रुपये, २२ कॅरेटसाठी ९२९०० रूपये, १८ कॅरेटसाठी ७६०१० रूपये पातळीवर पोहोचले आहेत.


आज सोन्याच्या जागतिक निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.३७% वाढ झाली आहे. ही वाढ प्रामुख्याने दुपारनंतर वाढलेल्या स्पॉट बुकिंगमुळे सुरू झाल्याचे आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. अखेरच्या सत्रात सोन्यातील गुंतवणूकीत वाढ झाल्याने ही पातळी वाढली जी कालपर्यंत घसरली होती.जागतिक मानक असलेल्या युएस गोल्ड स्पॉट निर्देशांकात ०.३६% वाढ झाली असल्याने प्रति डॉलर सोने पातळी ३२६०.९९ औंसवर गेली आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) यामध्ये सोन्याच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.२२% वाढ झाली आहे. त्यामुळे एमसीएक्स दरपातळी १००३७५.०० रुपयांवर पोहोचली आहे.


संकेतस्थळावरील माहितीनुसार, भारतात मुंबईसह प्रमुख शहरातील सोन्याची प्रति ग्रॅम सरासरी दरपातळी २४ कॅरेट सोन्यासाठी १०१३५ रूपये, २२ कॅरेट सोन्यासाठी ९२९० रूपये, १८ कॅरेट सोन्यासाठी ७६७५ रूपयांवर पोहोचली आहे. रूपया घसरला असला तरी आज युएस बाजारातील घसरलेल्या किरकोळ महागाई (Retail Inflation) सीपीआय (ग्राहक किंमत निर्देशांक CPI) आकडेवारीचा फायदाही भारतीय बाजारात मिळाला ज्यामुळे सोन्याचे दर किरकोळ पातळीवर घसरले आहेत.


आजच्या बाजारातील सोन्याच्या हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'यूएस सीपीआय डेटा कमी झाल्यामुळे एमसीएक्सवर सोन्याचा भाव सकारात्मक झाला, तो ३५० रुपयांनी वाढून १००५०० रुपयांवर बंद झाला, ज्यामुळे अमेरिकेत येणाऱ्या दर कपातीची भावना वाढली. कॉमेक्स सोन्याचा भाव १८ डॉलरने वाढून ३३६५ डॉलरवर पोहोचला, तर मजबूत रुपयामुळे देशांतर्गत किमतींमध्ये आणखी वाढ झाली. महागाईच्या मंद वाचनामुळे फेडच्या अधिक कमकुवत भूमिकेची अपेक्षा वाढली आहे, ज्यामुळे जवळच्या काळात सोन्याला आधार मिळाला आहे. सोन्याची श्रेणी ९९,५०० ते १,०२,००० दरम्यान दिसून येते.'


आजच्या सोन्याच्या हालचालीवर विश्लेषण करताना मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्व्हिसेसचे मेटल विश्लेषक मानव मोदी म्हणाले आहेत की,'सप्टेंबर २५ मध्ये व्याजदर कपातीची शक्यता वाढल्याने डॉलर कमकुवत झाल्याने देशांतर्गत बाजारा त सोन्याचा भाव १ लाख रुपयांच्या आसपास आहे. तथापि, अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धामुळे वाढ नियंत्रणात राहिली. यूएस सीपीआय हेडलाइन तसेच मासिक आकडेवारी अपेक्षेपेक्षा ०.१% कमी नोंदवली गेली, जी मागील महिन्याच्या अनुषंगाने आहे. कोअर सीपीआय डेटा मागील महिन्यापेक्षा ०.२% जास्त नोंदवला गेला आहे जो अन्न आणि ऊर्जा परिवर्तनशीलतेच्या किमतींवर संभाव्य टॅरिफ परिणाम दर्शवितो. सीएमई फेड वॉच टूल अहवाल दर्शवितो की बाजारातील सहभागी सप्टेंबरच्या बैठकीत दर कपाती साठी ८५% संभाव्यतेमध्ये किंमत ठरवत आहेत.


दरम्यान, कॅन्सस सिटी फेडचे अध्यक्ष श्मिड म्हणाले की यूएस सेंट्रल बँकेने चलनवाढीवरील टॅरिफच्या म्यूट इफेक्टला व्याजदर कमी करण्याची संधी म्हणून घेऊ नये, तर चलनविषयक धोरण "योग्यरित्या कॅलिब्रेट केले आहे" याचे संकेत म्हणून घ्यावे. अमेरिका आणि चीनने व्यापार युद्धात आणखी ९० दिवस वाढ करण्यास सहमती दर्शविली. राष्ट्राध्यक्ष ट्रम्पने चीनला १५% शुल्क देऊन एनव्हीडियाचे दरवाजे चीनसाठी उघडले. तथापि, चिनी नेत्याने त्यांच्या कंपन्यांना Nvidia कडून चिप्स घेऊ नये असे सांगितले आहे. आता लक्ष यूएस PPI, रिटेल विक्री आणि IIP डेटावर केंद्रित आहे.'

Comments
Add Comment

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आता दहा पदरी! 'एमएसआरडीसी' लवकरच राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवणार

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाचे आठऐवजी दहा पदरीकरण

छट पूजेसाठी मुंबई महापालिका यंत्रणा सज्ज; मंत्री लोढा यांच्यासह भाजप नेते घेणार तयारीचा आढावा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगर परिसरात मोठ्या संख्येने उत्तर भारतीय लोक राहतात. त्यामुळे येत्या २७ आणि २८ ऑक्टोबरला

अक्सा बीचवर १३ वर्षांचा मुलगा बुडाला

मुंबई: दिवाळीच्या दिवशीच मुंबईतील मालाड येथील अक्सा बीचवर एक हृदयद्रावक घटना घडली. मयंक ढोलिया (१३) नावाचा मुलगा

भयंकर धक्कादायक! दिवाळीत 'कार्बाइड गन'मुळे १४ मुलांना कायमचे अंधत्व; १२५ हून अधिक जखमी!

भोपाळ : दरवर्षी दिवाळीला फटाक्यांचे वेगवेगळे ट्रेंड समोर येत असातात, यामध्ये चकरीपासून ते रॉकेटपर्यंत वेगवेगळे

सैन्यासाठी ७९,००० कोटींचे मोठे निर्णय!

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने आज भारतीय

देशभरात मतदार यादी बनवण्याचे मोठे काम सुरू!

पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, पुडुचेरी, तामिळनाडूत सर्वप्रथम एसआयआर प्रक्रिया नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने देशभरातील