गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न-औषध प्रशासन सज्ज

खाद्य रंगांसह वर्तमानपत्रांचाही वापर न करण्याच्या व्यावसायिकांना सूचना


अलिबाग : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न-औषध प्रशासन सज्ज झाले असून, सणासुदीच्या काळात मिठाई व इतर अन्न पदार्थांच्या सेवनामुळे विषबाधासारखी अप्रिय घटना घडणार नाही, याची दक्षता जिल्ह्यातील मिठाई उत्पादक, विक्रेते व हॉटेल व्यवसायिकांनी घ्यावी. तसेच अन्न पदार्थाच्या दर्जाविषयी ग्राहकांनी १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर कोणत्याही प्रकारची तक्रार करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.


अन्न पदार्थ ग्राहकांना देताना त्याच्या पॅकिंगसाठी वर्तमानपत्राचा वापर करू नये. मिठाई तयार करताना केवळ फूडग्रेड खाद्य रंगाचा अत्यल्प प्रमाणात वापर करावा. सणासुदीच्या कालावधीमध्ये जनतेकडून मिठाई व इतर अन्न पदार्थ जसे खवा, मावा, घी, रवा, मैदा, आटा, खाद्यतेल, वनस्पती इत्यादीची मागणी मोठ्या प्रमाणात केली जाते. त्या आनुषंगाने मिठाई उत्पादक, विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांनी विशेष दक्षता घेण्याच्या सुचनाही या विभागाकडून देण्यात आल्या आहेत.


आस्थापनेचा परिसर हा पर्यावरणीय दृष्टीने, तसेच किटकांपासून संरक्षित व स्वच्छ असावा. कच्चे अन्न पदार्थ परवानाधारक किंवा नोंदणीधारक अन्न व्यावसायिकांकडून खरेदी करण्यात यावेत. आजारी व्यक्तीने अन्न पदार्थ हाताळू नयेत. मिठाई तयार करताना केवळ फुडग्रेड खाद्य रंगाचा अत्यल्प प्रमाणात वापर करावा, अन्न पदार्थ ग्राहकांना देताना, अन्नपदार्थ पॅकिंग करताना वर्तमानपत्राचा वापर करू नये.


बंगाली मिठाई ही २४ तासांच्या आत खाण्याबाबत ग्राहकांना स्पष्ट निर्देश देण्यात यावेत. मिठाई बनविताना, तसेच हाताळणाऱ्या व्यक्तींनी नेहमी डोक्यावर टोपी, मास्क, हातमोजे व स्वच्छ अप्रन वापरावे. मिठाईवर वापरला जाणारा सोनेरी व चांदीचा वर्ख योग्य दर्जाचा व उच्च प्रतीचा असावा. मिठाई हाताळताना हात वारंवार स्वच्छ धुवावे. अन्न व्यावसायिकांनी त्यांच्या आस्थापनेचे पेस्ट कंट्रोल करून घ्यावे व त्याचा अभिलेखा ठेवावा. सणासुदीच्या काळात मिठाई व इतर अन्न पदार्थाच्या सेवनामुळे विषबाधासारखी अप्रिय घटना घडणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असी आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

महाडमध्ये वृद्ध महिलेची हत्या; २४ तासांत गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश

महाड : महाड तालुक्यातील नाते येथे ७५ वर्षीय लीलावती राजाराम बलकवडे यांची शेतातील वाड्यावर हत्या करून सोन्याचे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पेण दौरा रद्द

अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील नगरपालिकांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून, या प्रचाराकडे सर्वच

सांडपाण्यामुळे कुंडलिका नदीचे पाणी प्रदूषित

रोहा : रोहा परिसरातील जीवनरेखा मानली जाणाऱ्या कुंडलिका नदीत धाटाव एमआयडीसी परिसरातून सोडल्या जाणाऱ्या

रेवस - रेड्डी सागरी मार्गावरील आणखी एका पुलाच्या कामाला गती

नव्या रेवदंडा - साळाव पुलासाठी १२५० कोटींचा निधी मंजूर अलिबाग : रेवस-रेड्डी सागरी मार्गावरील आणखी एका पुलाच्या

दहा नगरपालिका हद्दीत मद्यविक्रीला ३ दिवस बंदी

नगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर प्रशासनाचे निर्देश अलिबाग : निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार

नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज

नगराध्यक्ष-नगरसेवक पदांसाठी ६२९ उमेदवार रिंगणात, उद्या संध्याकाळी ५ वाजता प्रचार संपणार अडीच लाख मतदार ठरविणार