Dadar Kabutar Khana : जैन लोकांनी आंदोलन केलं ते चाललं, आम्हाला मात्र ताब्यात घेतलं, हा दुजाभाव का?

मराठा एकीकरण समितीचा सवाल


मुंबई : दादर कबुतरखाना परिसरात घडलेल्या ६ ऑगस्टच्या घटनेचा मुद्दा पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी यावर पोलिस प्रशासन आणि सरकारला सरळ प्रश्न विचारले आहेत. समितीच्या मते, त्या दिवशी जैन समाजाच्या काही लोकांनी आंदोलन करताना पोलिसांशी वाद घातला, चाकू-सुऱ्यांच्या मदतीने कबुतरखान्यावरील ताडपत्री फाडून काढली. इतकंच नव्हे, तर काहींनी उघडपणे शस्त्र उचलण्याची भाषा केली. तरीही पोलिसांनी त्या घटनेत सामील असलेल्या एकाही जैन धर्मीयावर गुन्हा दाखल केला नाही. समितीच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, आज मराठी माणूस शांततेत, कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन करत असताना त्याला अटक करण्यात येत आहे. “शस्त्रं काढण्याची धमकी देऊनही जर कोणावर कारवाई होत नसेल, तर ही न्यायव्यवस्थेतील दुटप्पी वागणूक नाही का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.


याच पार्श्वभूमीवर समितीचे पदाधिकारी गोवर्धन देशमुख यांनी संताप व्यक्त करत म्हटलं, “एरवी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणत्याही विषयावर बोलतात, मग यावर का मौन बाळगतात? ६ ऑगस्टला तुम्ही कुठे होतात? त्या दिवशी पोलिसांनी आम्हाला नाही, तर जैन समाजाच्या आक्रमक आंदोलकांना रोखायला हवं होतं. पण त्याऐवजी आज मराठी माणसालाच पकडलं जातंय. पोलिसांनी मला मारहाण केली, माझं रक्त काढलं म्हणजे मराठी माणसाचंच रक्त सांडलं.”



आणीबाणीचा काळ आणू नका


मराठी एकीकरण समितीने पूर्वनियोजितप्रमाणे आज आंदोलन करण्याची घोषणा केली होती, मात्र पोलिसांनी यासाठी परवानगी नाकारली होती. त्याचबरोबर काल रात्रीच समितीच्या कार्यकर्त्यांना नोटीस पाठवून कारवाईचा इशाराही दिला होता. तरीदेखील, आज सकाळी सुमारे ११ वाजता समितीचे अनेक कार्यकर्ते दादर कबुतरखान्याजवळ दाखल झाले. यामध्ये समितीचे पदाधिकारी गोवर्धन देशमुख स्वतः उपस्थित होते. देशमुख यांनी पोलिसांना भेटून निवेदन देण्याची मागणी केली. मात्र, त्यांनी परिसरात पाऊल टाकताच पोलिसांची एक तुकडी त्यांच्या भोवती गोळा झाली. काही मिनिटांतच त्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या वेळी देशमुख यांनी, “आम्ही फक्त पोलिसांना सहकार्याची अपेक्षा करतो. आंदोलनावर बंदी घालून आणीबाणीचा काळ आणू नका,” असे वक्तव्य केले. मात्र, त्यांच्या अटकेच्या हालचालींमुळे मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. परिस्थिती तणावपूर्ण होत असतानाच अखेर पोलिसांनी गोवर्धन देशमुख यांना पकडून थेट गाडीत बसवले. या कारवाईनंतर समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली.



तर मग मराठी माणसांना तोच न्याय का मिळत नाही?


आज सकाळपासूनच दादर कबुतरखान्याच्या परिसरात पोलीस सतर्क मोडमध्ये होते. अतिरिक्त कुमक मागवून कडेकोट बंदोबस्त उभारण्यात आला होता, तर परिसरातील अनेक दुकानं बंद ठेवण्यात आली. यावेळी मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते ठिकाणी पोहोचताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्यांना गाड्यांमध्ये कोंबण्यास सुरुवात केली. पदाधिकारी गोवर्धन देशमुख यांना तर अवघ्या काही मिनिटांतच पोलिसांनी पकडून थेट गाडीत बसवले आणि पोलीस ठाण्यात रवाना केले. या जलद कारवाईमुळे कार्यकर्त्यांचा रोष अधिक वाढला. विशेष म्हणजे, कार्यकर्त्यांकडून असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे की, ६ ऑगस्टला जैनधर्मीयांना कोणत्याही अडथळ्याविना आंदोलन करण्याची मुभा देण्यात आली, तर मग मराठी माणसांना तोच न्याय का मिळत नाही?

Comments
Add Comment

३,१९० कोटींचे मालक अमिताभ बच्चन; पण संपत्तीचा वारस कोण? कोणाला किती मिळणार?

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन हे केवळ अभिनयाचेच नव्हे तर प्रचंड संपत्तीचेही बादशाह आहेत.

मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी, एकाला केले अटक

मुंबई : आज सर्वत्र अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi 2025) ची धामधूम असताना, मुंबई वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकावर

लालबागचा राजाच्या मिरवणुकीपूर्वी दुर्दैवी घटना, मुख्य प्रवेशद्वारावर २ वर्षीय चिमुकलीचा अपघाती मृत्यू

मुंबई: गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या जल्लोषानंतर आज राज्यभरात बाप्पाला निरोप दिला जात आहे. सकाळपासूनच

म्हाडाच्या १४९ अनिवासी गाळे विक्रीसाठीच्या ई-लिलावासाठी मुदतवाढ

१६ सप्टेंबरपर्यंत करता येणार अर्ज मुंबई : मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा विभागीय घटक)

Mega Block News: रविवारी माटुंगा - मुलुंड अप व डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक

मुंबई:  मध्य रेल्वे, मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी उपनगरी विभागांवर रविवार, ०७.०९.२०२५

अरुण गवळीमुळे बदलणार दक्षिण मुंबईतील राजकीय समीकरणे!

मुंबई : एकवेळ मुंबईच्या गुन्हेगारी विश्वातले मोठ नाव असलेला गँगस्टर अरुण गवळी बुधवारी दगडी चाळीतील त्याच्या घरी