IAS Transferred: राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच राज्यातील सात बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच राज्यातील सात बड्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. आज सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला.


त्यानुसार डॉ. अशोक करंजकर (IAS: 2009) यांची उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ, मुंबईचे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर डॉ. संजय कोलते (IAS 2010) जिल्हाधिकारी, भंडारा यांची शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर सुशील खोडवेकर (IAS: 2011) यांची मुंबईचे सदस्य सचिव, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ मुंबई यांना विकास आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर सावन कुमार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार यांची जिल्हाधिकारी, भंडारा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


नमन गोयल (IAS 2022) प्रकल्प अधिकारी, ITDP, भामरागड आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, अटापली उपविभाग, गडचिरोली यांना मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर गडचिरोलीचे देसाईगंज उपविभाग, सहाय्यक जिल्हाधिकारी असलेले डॉ.जी.व्ही.एस. पवनदत्त (IAS 2023) यांची सहायक जिल्हाधिकारी, इगतपुरी उपविभाग, नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीमती लघिमा तिवारी (IAS 2023) सहायक जिल्हाधिकारी, बल्लारपूर उपविभाग, चंद्रपूर यांची सहायक जिल्हाधिकारी, गोंडपिंपरी उपविभाग, चंद्रपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांचीही ३० जुलै रोजी बदली करण्यात आली. विकास खारगे यांच्याकडे महसूल मंत्रालयाचे अप्पर मुख्य सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली. तर ज्येष्ठ आयएएस अधिकारी अनिल डिग्गीकर यांची पुन्हा बदली करून त्यांना अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या अपर मुख्य सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली.

Comments
Add Comment

घरबसल्या मिळणार रस्‍ते सिमेंट काँक्रिटीकरण कामांची सविस्तर माहिती

नागरिकांसाठी https://roads.mcgm.gov.in/publicdashboard/ या विशेष लिंकवर रस्‍ते कामांची माहिती उपलब्‍ध मुंबई : ‘खड्डेमुक्त मुंबई’ या

‘नमो शेतकरी योजने’चा सातवा हप्ता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित

मुंबई : "शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान किसान योजने’चा सातवा

व्हॉट्सअ‍ॅप वेब बिघडला! – स्क्रोल न झाल्याने वापरकर्ते हैराण

मुंबई : सोशल मीडिया वापरकर्त्यांनी व्हॉट्सअ‍ॅप वेब पेजच्या एका नवीन समस्येची तक्रार केली आहे , जिथे ते त्यांच्या

गणेशोत्सवानंतर पावसाची विश्रांती, पण या दिवसापासून जोर वाढणार

मुंबई : गणेशोत्सवानंतर पावसाने विश्रांती घेतली आहे. पण ही विश्रांती काही दिवसांपुरतीच मर्यादीत आहे. पावसाचा जोर

Lalbaugcha Raja Visarjan 2025 : लालबागचा राजा मंडळाची पहिली मोठी अ‍ॅक्शन; कोळी बांधवाला थेट कोर्टात खेचणार, नेमकं प्रकरण काय?

मुंबई : दरवर्षीप्रमाणे या वर्षीही लालबागचा राजा गणेशोत्सव संपल्यानंतर गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आला.

लालबागचा राजा नव्हे... देणगीच्या बाबतीत 'हा' गणपती मुंबईत आघाडीवर, ५ दिवसांत मिळाली १५ कोटींची देणगी

मुंबई: दरवर्षी, मुंबईतील किंग सर्कलमधील गौड सारस्वत ब्राह्मणांच्या (जीएसबी) गणपती मंडळात पाच दिवस गणेशोत्सव