युक्रेनची पुन्हा फाळणी होऊ देणार नाही: झेलेंस्की ठाम

काही प्रदेशांच्या अदलाबदलीची ट्रम्प यांची वादग्रस्त भूमिका


कीव्ह : रशियाशी सुरू असलेल्या युद्धात युक्रेनचा भाग कोणत्याही परिस्थितीत गमावू देणार नाही, असा स्पष्ट संदेश युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की यांनी दिला. 'रशियासोबतची ही लढाई केवळ जमिनीसाठी नाही, तर न्यायासाठी आहे. आम्हाला दुसरा फाळणीचा धोका मान्य नाही. जिथे दुसरी फाळणी होईल, तिथे तिसरीही होईल. म्हणूनच आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत.' असे त्यांनी एक्स पोस्टमधून स्पष्ट केले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची १५ ऑगस्टला अलास्कामध्ये भेट होणार आहे. या बैठकीत युक्रेन युद्ध संपवण्यासाठी उपाययोजना आणि संभाव्य करारांवर चर्चा होणार आहे. पूर्वी ट्रम्प यांनी सांगितले होते की, "युद्ध संपवण्यासाठी काही प्रदेशांची अदलाबदल होणे आवश्यक आहे. ‘यावर तीव्र प्रतिक्रिया देत झेलेंस्की यांनी पुन्हा स्पष्ट केले की, जमीन देऊन शांती मिळवण्याची भूमिका आम्ही स्वीकारणार नाही.’

व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कैरोलिन लेविट यांनी प्रसिद्धीपत्रकातून आधी सांगितले की, ट्रम्प पुतिन आणि झेलेंस्की यांच्यात त्रैपक्षीय चर्चा घेण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे, रशियाने ट्रम्पसोबत बैठक घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असेही त्यांनी सांगितले. याआधी ट्रम्प आणि झेलेंस्की यांची शेवटची भेट २६ एप्रिल रोजी वेटिकनमध्ये पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारावेळी झाली होती. ट्रम्पचे विशेष दूत स्टीव विटकॉफ यांनी नुकतीच मॉस्कोमध्ये पुतिन यांची भेट घेतली. क्रेमलिनचे सल्लागार युरी उशाकोव यांनी सांगितले की, युक्रेन मुद्द्यावर विस्तृत चर्चा झाली.
Comments
Add Comment

इराणचा कुवेतच्या बुबियान बेटावरील अमेरिकेच्या नौसैनिकांवर हल्ला

बुबियान बेट : इराणने कुवेतच्या बुबियान बेटावरील अमेरिकेच्या नौसैनिकांवर हल्ला केला. यात मोठ्या प्रमाणात

नेपाळमध्ये सत्तांतरानंतर नवा संदेश; बालेन शाह- मोदी संवादातून संबंध दृढ होण्याचे संकेत

काठमांडू : नेपाळच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीनंतर नव्या नेतृत्वाचा उदय झाला आहे. बालेन शाह यांनी

Nepal News : नेपाळमध्ये राजकीय भूकंप! नवनिर्वाचित पंतप्रधान बालेन शाह यांच्या कारवाईत माजी पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना अटक

नेपाळमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली असून माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना पोलिसांनी अटक केली आहे. भक्तपूरमधील

Iran-US-Israel War : इराणने केले अमेरिका-इस्रायलवर गंभीर आरोप

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी शुक्रवारी (२७ मार्च) अमेरिका आणि इस्रायलवर तीव्र टीका केली. संयुक्त

Pakistan embassy in Tehran : तेहरानमधील पाकिस्तानी दूतावासाजवळ धमाके; परिसरात भीतीचे वातावरण

तेहरान मधील पाकिस्तानी दूतावास आणि राजदूताच्या निवासस्थानाजवळ शक्तिशाली बॉम्बस्फोट झाल्याची धक्कादायक घटना

Iran-US-Israel War : अमेरिका बॅकफूटवर ? राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामात पुन्हा वाढ

- डोनाल्ड ट्रम्प यांनी युध्दविरामची मुदत थेट ६ एप्रिलपर्यंत वाढवली अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या