वडील आणि मुलामधील नात्याचं एक अजब रसायन मांडणारे 'दशावतार'मधील 'आवशीचो घो' गाणं प्रदर्शित

  36

Movie Song Release: टीजर आणि पोस्टरमुळे प्रदर्शनापूर्वीच सर्वत्र चर्चेत असलेला आणि प्रेक्षकांच्या प्रचंड उत्सुकतेचा विषय ठरलेला ‘दशावतार’ या मराठी चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. दिलीप प्रभावळकर आणि सिद्धार्थ मेनन यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं 'आवशीचो घो' हे गाणं, वडील आणि मुलामधील नात्याचं एक अजब रसायन दाखवणारं आहे. अनेकांना शिवी वाटणारा हा शब्द खरंतर कोकणात लाडाने वापरला जातो. मालवणी भाषेत आईला प्रेमाने आवशी आणि नवऱ्याला घो असं म्हणतात. म्हणूनच आईच्या नवऱ्याला म्हणजेच वडीलांना प्रेमाने ‘आवशीचो घो’ म्हणायची पद्धत आहे. दशावतार चित्रपटातलं हे गाणं सुद्धा बाप आणि मुलाच्या अनोख्या नात्याबद्दल आहे. येत्या १२ सप्टेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे.


हे गाणं वर वर पाहता मिश्किल किंवा गंमतीशीर वाटत असलं तरी ते गाणं बाप - मुलाच्या नात्याचं सारच मांडतं. विशेष म्हणजे यात कधी कधी मुलगा वडिलांची जबाबदारी घेणारा ‘वडील’ बनतो आणि वडील त्याचे ‘मूल‘ होतात. बाप मुलाच्या नात्याचं हळूवारपण उलगडणारं हे गाणं गुरु ठाकूरच्या समृद्ध लेखणीतून उतरलं असून, संगीत दिग्दर्शक ए व्ही प्रफुल्लचंद्र यांनी संगीतबद्ध केलं आहे. तर ओंकारस्वरुप याने ते गायलं आहे.


या गीताबद्दल गीतकार गुरु ठाकूर म्हणतात की, ‘’बाप आणि मुलगा यांच्यातील मैत्रीचं नातं मिश्किल आणि खट्याळ अंदाजात सादर करणारं गाणं आजवर कधीच झालं नव्हतं. ‘आवशीचो घो’ या गाण्यामुळे ते लिहिण्याची संधी मला मिळाली. मालवणी बोलीतील शब्दांचा गोडवा, ए. व्ही. यांच्या संगीताची जादू आणि पडद्यावर दिलीपजी आणि सिद्धार्थ यांचा अफलातून परफॉर्मन्स यांनी या गाण्याला वेगळं परिमाण दिलं आहे.’’


झी स्टुडिओज प्रस्तुत, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित या भव्य चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांची मांदियाळी आहे. दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिनय बेर्डे यांचा अप्रतिम अभिनय या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.


चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक सुबोध खानोलकर म्हणतात, '' आवशीचो घो’ हे गाणं वडील-मुलामधील नात्याची वीण अत्यंत लोभसपणे अधोरेखित करतं. हे गाणं प्रत्येकाला आपल्या वडिलांच्या जवळ नेणारं, आणि हसताहसताही प्रत्येकाच्या मनाला भिडणारं असं हे गाणं आहे. वडील मुलाच्या नात्यातील प्रेम, ताण, समज-गैरसमज आणि काळानुसार बदलणारी जबाबदारी हे सगळं या एका गाण्यातून सहजतेने दाखवणं हे मोठं आव्हान होतं. परंतु गुरु ठाकूर, ए व्ही प्रफुल्लचंद्र आणि गायक ओंकार स्वरूप या सगळ्या टीमने ते उत्तमरित्या पार पाडलं. पडद्यावरही ते नातं सिद्धार्थ मेनन आणि दिलीप प्रभावळकर यांच्या केमिस्ट्रीतून कमाल उतरलंय!''


Comments
Add Comment

अरण्य' चित्रपटात उलगडणार जंगल, भावना आणि संघर्षाची कहाणी, लक्षवेधी मोशन पोस्टर प्रदर्शित

मुंबई : एस एस स्टुडिओ निर्मित 'अरण्य' या आगामी मराठी चित्रपटाचे लक्षवेधी मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. हे

Kaun Banega Crorepati 17: तुम्हाला बदलायचे आहे का तुमचे नशीब? तर जाणून घ्या कधी पासून सुरू होत आहे KBC

मुंबई: प्रसिद्ध क्विझ शो कौन बनेगा करोडपती आपल्या नव्या हंगामासह परतत आहे आणि सोबतच अनेक

अभिनेता सुयश टिळकच्या गाडीचा अपघात ; पोस्ट शेअर करत दिली माहिती

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सुयश टिळक हा 'का रे दुरावा' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या सुयशने

पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या अधिकाऱ्याच्या पत्नीला हिंदी बिग बॉसची ऑफर!

हिमांशी नरवाल बिग बॉस शो मध्ये दिसणार का? सध्या बिगबॉसच्या आगामी १९ व्या सिझनची सर्वत्र चर्चा आहे. या सिझनमध्ये

बायकोचा आत्मा नवऱ्याच्या शरीरात? ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ची भन्नाट कल्पना आता सिनेमागृहात!

मुंबई : प्रेम, भूत आणि हास्याचा भन्नाट मेळ घालणारा आगामी मराठी चित्रपट ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ सध्या चर्चेचा

अभिनेत्री प्रिया बापट करणार हॉरर जॉनरमध्ये पदार्पण : दिसणार नव्या भूमिकेत

मुंबई : अभिनेत्री प्रिया बापट जिने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे . आपल्या