पीएनबीने घेतला मोठा निर्णय कोट्यावधीचा एनपीए बँक ARC ला विकणार !

  26

प्रतिनिधी: पीएनबी (Punjab National Bank) बँकेचा संचालक मंडळाने आपल्या निष्क्रिय एनपीए (Non Performing Assets NPA) विकण्याचा निर्णय घेतला आहे. ५००० कोटींचा एनपीए असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीला (Asset Reconstruction Comp any ARC) विकणार आहे. उपलब्ध माहितीनुसार, जवळपास बँक १०० एनपीए खाती कंपनीला विकणार आहेत. बँकेचा एकूण व्यवसाय (Total Buisness) मागील वर्षाच्या तिमाहीतील तुलनेत ११.६% वाढत २८.१९ कोटींवर पोहोचला होता.तर बँकेच्या या तिमा हीत निव्वळ नफ्यात (Net Profit) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ४९% घसरण झाल्याने निव्वळ नफा १६७५ कोटींवर पोहोचला जो मागील वर्षाच्या तिमाहीत ३२५१ कोटी रुपये होता. तर बँकेच्या ऑपरेटिंग नफ्यातही ७०८१ कोटींवर वाढ झाली होती.

बँकेच्या स्थूल एनपीएत (Gross Non Performing Assets NPA) मध्ये बँकेन चांगली कामगिरी बजावली होती. मागील वर्षाच्या तिमाहीतील ४.९८% तुलनेत या तिमाहीत ३.७८% वर एनपीए पोहोचला होता. तर निव्वळ एनपीएत (Net NPA) मध्ये मात्र मागील वर्षाच्या तिमाहीतील ०.३८% वरून या तिमाहीत ०.६०% वाढ झाली होती. या एनपीए विकण्याच्या निर्णयावर बँकेचे कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक चंद्रा म्हणाले की,'आम्ही १०० हून अधिक खाती ओळखली आहेत.पुस्तकांचा आकार (B ook Size) सुमारे ४०००-५००० कोटी रुपये असेल. तेच (एआरसींना विक्रीसाठी) थकबाकी पुस्तक आहे,आम्हाला किमान ४०-५० टक्के वसुली होण्याची अपेक्षा आहे.त्या मार्गानेही या आर्थिक वर्षात चांगली वसुली होईल अशी आमची अपेक्षा आहे असे काही खा ते असू शकते जिथे १०० टक्के वसुली देखील होणार आहे कारण आता तुमच्याकडे चांगली सुरक्षा आहे, परंतु काही प्रकरणांमध्ये ते कमी असू शकते आम्हाला सरासरी वसुली किमान ४०-५० टक्के असावी अशी अपेक्षा आहे.'

याशिवाय प्रसारमाध्यमांशी आणखी बोलताना ' चालू आर्थिक वर्षात आमचे २९.५६ लाख कोटी रुपयांचे उद्दिष्ट आहे. आम्ही आमच्या उद्दिष्टापेक्षा चांगले काम करू शकतो आणि पुढच्या वर्षी मार्चपर्यंत ३० लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो, परंतु मी हे देखील सांगतो की आम्ही याची खूप काळजी घेत आहोत की आम्ही कोणतीही शीर्ष रेषा बांधणार आहोत, ती माझ्या बँकेला नफा वाढवणारी असावी. ठेवी जमा करणे असो किंवा कॉर्पोरेट कर्ज बुक असो, बँकेच्या नफ्यात सर्वकाही भर घालायला हवी. म्हणूनच आता मो ठ्या प्रमाणात ठेवी कमी झाल्या आहेत आणि कॉर्पोरेट ठेवी मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत' असे ते म्हणाले आहेत.
Comments
Add Comment

Pune Accident: श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी कुंडेश्वरच्या दर्शनाला जाणारी पिकअप दरीत कोसळली, ६ महिलांचा मृत्यू, अनेक जखमी

खेड: पुण्यातील खेड तालुक्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली. कुंडेश्वर येथे श्रावणी सोमवारनिमित्त महिला

Navi Mumbai : नेरुळमधील सुश्रूषा हॉस्पिटलला शॉर्टसर्किटमुळे आग; रुग्णांची तातडीने सुरक्षित सुटका

नवी मुंबई : नेरुळमधील प्रमुख हृदयविकार उपचार केंद्र असलेल्या सुश्रूषा हॉस्पिटलमध्ये सोमवारी सकाळी

Donald Trump : "ट्रम्पचा टॅरिफ बॉम्ब! अमेरिकन अर्थव्यवस्थेला थेट फटका" ट्रम्पच्या निर्णयाने कंपन्यांची घबराट

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतातून आयात होणाऱ्या काही वस्तूंवर

भारत २०२८-२९ पर्यंत ५०००० कोटींची संरक्षणात निर्यात करणार! 'ही' माहिती समोर

प्रतिनिधी: नुकत्याच झालेल्या पत्रकारांशी संवादात डीआरडीओचे (DRDO) अध्यक्ष समीर विरुद्ध कामत यांनी म्हटले आहे की,

श्रीराम लाईफ इन्शुरन्सचा तिमाही निकाल जाहीर

नव्या प्रिमियम व्यवसायात YoY २१% वाढ प्रतिनिधी: देशातील महत्वाचा एनबीएफसी (Non Banking Financial Institution) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या

HG Infra Engineering कंपनीचा शेअर १४% उसळला 'या' कारणामुळे

प्रतिनिधी:एचजी इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आज जबरदस्त उसळी घेतली आहे. कंपनीचा समभाग (Share)