ICC महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ : मुंबईत क्रिकेट स्टार्सचा मेळावा, ट्रॉफी टूरला जल्लोषात सुरुवात

  36

मुंबई : मुंबईत आज ‘ICC महिला क्रिकेट विश्वचषक २०२५’ च्या ‘५० दिवस बाकी’ कार्यक्रमाला क्रिकेट जगतातील दिग्गजांची हजेरी लागली. माजी भारतीय कर्णधार मिताली राज आणि माजी भारतीय फलंदाज युवराज सिंग यांच्यासह हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांसारख्या महिला क्रिकेटपटूंनी पॅनेल चर्चेत सहभाग घेतला. या कार्यक्रमात ‘ICC Women’s Cricket World Cup २०२५’ च्या ट्रॉफी टूरलाही औपचारिक सुरुवात करण्यात आली.


कार्यक्रमाचे उद्घाटन ICC चे अध्यक्ष जय शाह यांनी केले. त्यांच्या हस्ते पॅनेल चर्चेचे आयोजन झाले, ज्यामध्ये महिला क्रिकेटच्या वाढीसंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाली. ICC चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजोग गुप्ता हेही या कार्यक्रमात उपस्थित होते जय शाह म्हणाले, “ICC महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ भारतात परत येत आहे, आणि हा महिला क्रिकेटसाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. हा स्पर्धेचा दर्जा जागतिक पातळीवर आणखी उंचावेल. महिला क्रिकेटच्या वाढीसाठी आम्ही नवनवीन कल्पनांना प्रोत्साहन देत आहोत. अशा चर्चांमुळे आमचा सामूहिक दृष्टिकोन आकार घेतो आणि खेळाच्या प्रगतीसाठी दिशा मिळते.”



ते पुढे म्हणाले, “फक्त ५० दिवस उरले असताना स्पर्धेची तयारी जोमात सुरू आहे आणि उत्साहही शिगेला पोहोचला आहे. भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या या स्पर्धेत सर्व संघांना माझ्या शुभेच्छा. मला खात्री आहे की सर्व खेळाडूंना हा अनुभव अविस्मरणीय ठरेल.”



या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका हे आठ संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धा ‘राउंड-रॉबिन’ पद्धतीने खेळवली जाईल. महिला क्रिकेटमधील ही पहिली मोठी जागतिक स्पर्धा आहे जी २०१६ नंतर उपखंडात होणार आहे. याआधी भारताने महिला विश्वचषकाचे आयोजन १९७८, १९९७ आणि २०१३ मध्ये केले होते.



स्पर्धेच्या प्रचारासाठी आयोजित ‘ट्रॉफी टूर’ सर्व यजमान शहरांमध्ये तसेच दिल्ली आणि मुंबईत फिरणार आहे. मार्गातील प्रसिद्ध स्थळांवर थांबत ही ट्रॉफी चाहत्यांसाठी खुली राहील. चाहत्यांना @icctrophytour या इन्स्टाग्राम चॅनेलद्वारे टूरचे थेट अपडेट मिळणार आहेत. ट्रॉफी टूर दरम्यान प्रत्येक यजमान शहरातील शाळांना भेट दिली जाईल. ‘स्कूल लेगसी प्रोग्राम’ अंतर्गत BCCI आणि ICC मिळून निवडक शाळांतील विद्यार्थ्यांना सामन्यांना उपस्थित राहण्याची संधी देणार आहेत. ही मोहीम आणि कार्यक्रमामुळे महिला क्रिकेटचा उत्साह आणखी वाढणार असून, येत्या ५० दिवसांत स्पर्धेची रंगत अधिक चढणार आहे.

Comments
Add Comment

ओप्पोने के13 टर्बो सीरिजमध्ये दोन नवे गेमिंग स्मार्टफोन केले लॉन्च

मुंबई : ओप्पोने आपल्या गेमिंग केंद्रित के13 टर्बो मालिकेत दोन नवे स्मार्टफोन के13 टर्बो प्रो

अंगारकी संकष्टी चतुर्थीसाठी मेट्रोची सेवा वाढवली!

मुंबई : १२ ऑगस्ट रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी

खेकडे पकडायला गेले आणि बुडून मेले

कांदिवलीतील तलावात खेकडे पकडताना पिता-पुत्राचा बुडून मृत्यू मुंबई : कांदिवली पूर्व येथे एका तलावात खेकडे

राज्यातील मत्स्योत्पादन वाढीसाठी विभागातील सर्वांनी प्रयत्न करावेत : मंत्री नितेश राणे

मुंबई : राज्यात मत्स्योत्पादन वाढीसाठी मोठ्या संधी आहेत. यंदाच्या हंगामामध्ये राज्यात ४७ टक्के मत्स्योत्पादन

School Van: विद्यार्थी स्कुल व्हॅनला राज्य शासनाकडून ग्रीन सिग्नल, पालकांना दिलासा

विद्यार्थी सुरक्षित वाहतूकीसह बेरोजगारांना रोजगाराची ही संधी मुंबई: शालेय बसचे वाढीव मासिक दर परवडत नसल्याने

अमेरिकेने मत्स्य उत्पादनांवर शुल्क वाढवले, आता पुढे काय? मंत्री नितेश राणे यांनी दिली 'ही' योजना

मुंबई : मत्स्य व बंदरे विकास मंत्री, नितेश राणे यांनी महाराष्ट्राच्या मत्स्यव्यवसाय क्षेत्रासाठी एक सकारात्मक