Gold Rate Today: सोन्याच्या दर मोठ्या प्रमाणात घसरले 'या' कारणांमुळे

  72

प्रतिनिधी: आज अखेर दबाव घटल्याने सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. जागतिक पातळीवर दबाव ट्रम्प आणि पुतीन यांच्या भेटीचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिल्यानंतर सोन्याच्या दरात आज घस रण झाली आहे. विशेषतः मागणीत घट झाल्याने तसेच रशिया अमेरिका समझोता होईल या आशावादी विचाराचा बाजारात सकारात्मक परिणाम झाला ज्याचा सर्वाधिक फायदा सोने व कच्च्या ते लात (Crude Oil) मध्ये झाला आहे. ज्यामुळे आज दिवसभरात दोन्ही कमोडिटी बाजारातील स्पॉट मागणीतही घसरण झाली. अमेरिकेतील बाजारानेही काल उसळी घेतल्याने आगामी महागाई आकडेवारीवर गुंतवणूकदार सकारात्मक आहेत.

'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, सोन्याच्या २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात तब्बल ७६ रूपये घसरण झाली आहे. २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ७० रूपयांनी व १८ कॅरेट सो न्याच्या प्रति ग्रॅम दरात ५७ रूपयांनी घसरण झाली. ज्यामुळे प्रति ग्रॅम दर अनुक्रमे २४ कॅरेटसाठी १०२२८ रूपये, २२ कॅरेटसाठी ९३७५ रूपये, १८ कॅरेटसाठी ७६८१ रूपयांवर पोहोचला आहे. सं केतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ७६० रूपयांनी, व २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ७०० रूपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ५७० रूपयांनी घसरण झाली. त्यामुळे एकूणच तोळ्याचे दर अनुक्रमे २४ कॅरेटसाठी १०२२८० रूपये, २१ कॅरेटसाठी ९३७५० रूपये, १८ कॅरेटसाठी ७६७१० रूपयांवर गेले आहेत.

जागतिक सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत २.२०% घसरण झाली आहे. तर जागतिक मानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युएस गोल्ड स्पॉट दरात १.२०% घसरण झाल्याने सं ध्याकाळपर्यंत सोन्याचे दर प्रति डॉलर ३३५८.५८ औंसवर गेले आहेत. मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे सरासरी दर प्रति ग्रॅम २४ कॅरेटसाठी १०२२८ रूपये, २२ कॅरेटसाठी ९३७५ रूपये, १८ कॅरेटसाठी ७६७१ रूपये आहे.

भारतातील कमोडिटी बाजारातील एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) मध्ये सोन्याचे दर संध्याकाळपर्यंत १.२०% घसरून १००५७९ पातळीवर गेले आहेत. आज सोन्याच्या दरा त भारतीय सराफा बाजारात चांगली घसरण झाली. सलग दुसऱ्यांदा ही घसरण झाली आहे. बाजारातील मागणीत घट झाल्यासह भारतातील सोन्याच्या ट्रेडिंगमध्ये झालेल्या घसरणीचा फटका दरा त प्रतिबिंबित होतो. आगामी काळात युएसची नवीन महागाई आकडेवारी अपेक्षित आहे. तसेच चीन युएस बोलणी, युएस रशिया बोलणी यामुळे लोकांनी सकारात्मकतेत सोन्यातील गुंतवणूक क मी केल्याने ही घसरण झाली.
Comments
Add Comment

मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा लवकरच सुरू होणार; खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नांना यश

केंद्रीय नागरी विमान वाहतुक मंत्री राममोहन नायडू यांनी दिले आश्वासन नवी दिल्ली : गणेशोत्सवासाठी कोकणात

लोकसभेत सुधारित आयकर विधेयक सादर

देशाच्या करप्रणालीत अद्ययावत, सुलभता येणार नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत नवीन

मुंबईत कबुतरांना खायला घालण्यावर बंदी कायम, सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप करण्यास नकार

नवी दिल्ली: मुंबईतील कबुतरखान्यांवरील बंदीविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप

मोठी बातमी: अर्थमंत्र्यांनी फेरबदलासह मांडलेले नवे इन्कम टॅक्स कायदा लोकसभेत मंजूर विरोधक भडकले 'या' कारणामुळे!

प्रतिनिधी: लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पुन्हा नव्याने इन्कम टॅक्स बिल संसदेत सादर केले आहे.

अंगारकी संकष्टी चतुर्थीसाठी मेट्रोची सेवा वाढवली!

मुंबई : १२ ऑगस्ट रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी

खेकडे पकडायला गेले आणि बुडून मेले

कांदिवलीतील तलावात खेकडे पकडताना पिता-पुत्राचा बुडून मृत्यू मुंबई : कांदिवली पूर्व येथे एका तलावात खेकडे