प्रसिद्ध मराठी कलाकार किशोर कदम यांचे मुंबईतलं घर धोक्यात! मुख्यमंत्र्यांना केले मदतीचे आवाहन, नेमकं प्रकरण काय?

कमिटी, पीएमसी आणि बिल्डर यांनी संगनमताने घोटाळा घडवल्याचा केला आरोप 


मुंबई: कवी सौमित्र म्हणून प्रसिद्ध असलेले मराठी अभिनेते किशोर कदम (Kishor Kadam) यांच्याविषयी एक मोठी बातमी समोर येत आहे. त्यांचे अंधेरी चकाला येथील घर धोक्यात आल्याची चर्चा आहे. यासंदर्भात किशोर कदम यांनी संबंधित बिल्डर आणि अधिकाऱ्यांची तक्रार करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत, मदतीची मागणी केली आहे.


किशोर कदम यांनी अंधेरी पूर्व येथील चाकाला परिसरातील हवा महाल सोसायटीच्या रिडेव्हलपमेंट प्रक्रियेत गंभीर अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. सोसायटीच्या रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली पीएमसी (प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी) आणि बिल्डर यांनी संगनमताने सोसायटीच्या २३ सभासदांची घरे धोक्यात आणली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह सर्वसामान्य जनतेला मदतीचे आवाहन केले आहे.


त्यांनी सोशल मिडियावर या संदर्भात एक पोस्ट देखील शेअर केली आहे. ज्यात त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे.



बहुसंख्य सभासदांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन कमिटी, पीएमसी आणि बिल्डर यांनी संगनमताने हा घोटाळा घडवल्याचा आरोप सौमित्र यांनी या पत्राद्वारे केला आहे. सरकारच्या बहुसंख्येच्या कायद्यामुळे चौकस सभासदांचा आवाज दडपला जात असून, सामान्य माणसाला वर्षानुवर्षे बिल्डर आणि पीएमसीच्या आर्थिक ताकदीविरुद्ध लढावे लागत आहे. अशा अनेक प्रलंबित केसेस मुंबईत असल्याचे त्यांनी यात नमूद केले आहे.  हे सामान्य माणसाच्या अधिकाऱ्याचे उल्लंघन असल्याचे मत मांडताना, किशोर कदम यांनी या गंभीर समस्येकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अशी कळकळीची विनंती केली आहे. त्यांनी आपले घर आणि इतर सभासदांचे हक्क वाचवण्यासाठी सर्व रसिक जनतेला आणि नेत्यांना पाठिंब्याचे आवाहन केले आहे.


Comments
Add Comment

मुंबई पालिकेच्या दत्तक वस्ती योजनेतील गैरव्यवहाराचे ऑडिट होणार

नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची विधानसभेत घोषणा मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी

आता आधार कार्डची झेरॉक्स बंद!

फक्त डिजिटल पडताळणीसाठी अनिवार्य मुंबई : सरकारने आधार कार्ड संदर्भात मोठा निर्णय घेतला असून लवकरच नवीन नियम

फिल्म बनवण्याच्या नावाखाली डॉक्टरची कोट्यवधींची फसवणूक

दिग्दर्शक विक्रम भट्ट यांना अटक मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्यावर उदयपूरमधील एका डॉक्टरकडून

नगरविकाससोबतची कांजूरमार्ग कचराभूमी बैठक निष्फळ

११ डिसेंबरच्या न्यायलयीन सुनावणीकडे लक्ष मुंबई : कांजूरमार्ग कचराभूमीसंदर्भात उच्च न्यायालयाच्या

खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्ट्या, दैनंदिन कामाचे तासही वाढणार

मुंबई : महाराष्ट्रातील खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महायुतीने दिलासा दिला आहे. महायुती

मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी पावसाळा संपल्यापासूनच करणार सुरुवात

कचरा आणि माती स्वच्छ करण्यासाठी रस्त्यावर एक दिवस आड वाहने उभी करण्यास परवानगी नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त डॉ