नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) नववीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेची पद्धत बदलण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. यानुसार, यापुढे नववीच्या परीक्षा 'ओपन बुक' पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. या पद्धतीत विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान आपली पाठ्यपुस्तके, नोट्स आणि संदर्भग्रंथ सोबत ठेवण्याची परवानगी असेल.
सीबीएसईचा उद्देश केवळ पाठांतरावर आधारित परीक्षा न घेता, विद्यार्थ्यांच्या संकल्पना समजून घेण्याची व त्यांचा वापर करण्याची क्षमता तपासणे हा आहे. मंडळाने स्पष्ट केले की, परीक्षेचा ताण कमी करून संकल्पनांच्या स्पष्टीकरणावर अधिक भर दिला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे विषयांवरील आकलन वाढेल आणि शिक्षण पद्धतीत सकारात्मक बदल घडेल.