देवी अंबाबाईच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया केली जाणार आहे. या प्रक्रियेसाठी सोमवार ११ आणि मंगळवार १२ ऑगस्ट रोजी कोल्हापुरच्या देवी अंबाबाईचे दर्शन बंद असेल. या कालावधीत भाविकांनी पितळी उंबऱ्याच्या बाहेरून श्रीकलश व श्रींच्या उत्सवमूर्तीचे दर्शन घेऊन, देवस्थान व्यवस्थापन समितीला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कोल्हापुरच्या देवी अंबाबाईचे दर्शन बुधवार १३ ऑगस्ट २०२५ पासून पुन्हा सुरू होणार आहे.
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडून परवानगी घेतल्यानंतरच देवी अंबाबाईच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया करण्याचा निर्णय झाला आहे. मूर्ती दीर्घकाळ सुस्थितीत ठेवण्याच्या उद्देशानेच संवर्धन प्रक्रिया केली जाणार आहे.मूर्ती संवर्धनासाठी गाभाऱ्यामध्ये फक्त तज्ज्ञांनाच प्रवेश दिला जाईल. श्रावणी सोमवार आणि मंगळवार या दोन्ही दिवशी भाविकांनी पितळी उंबऱ्याच्या बाहेरून श्रीकलश व श्रींच्या उत्सवमूर्तीचे दर्शन घेऊन देवस्थान व्यवस्थापन समितीला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.