पोकोचा एम ७ प्लस 5जी भारतात १३ ऑगस्टला होणार लाँच

  21

मुंबई : पोकोकडून एम 7 प्लस 5जी भारतात लॉन्च होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 13 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता सादर केला जाणार आहे. हा डिव्हाइस कंपनीच्या एम 7 5जी सिरीजमधील नवीन सदस्य असून, सध्या उपलब्ध असलेल्या पोको एम 7 5जी आणि एम 7 प्रो 5जी मॉडेल्ससोबत बाजारात उपलब्ध होईल.


लॉन्चपूर्वी पोकोने या हँडसेटच्या काही महत्वाच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली आहे. पोको एम 7 प्लस 5जीमध्ये 7,000mAh सिलिकॉन-कार्बन बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीच्या मते, 7,000mAh बॅटरी असलेल्या सेगमेंटमधील हा सर्वात पातळ स्मार्टफोनपैकी एक असेल.


फोनमध्ये रिव्हर्स चार्जिंगची सुविधाही असेल, ज्याद्वारे वापरकर्ते इतर अँड्रॉईड आणि आयओएस स्मार्टफोन्स तसेच IoT डिव्हाइसेस चार्ज करू शकतील.


किंमत व अपेक्षित स्पेसिफिकेशन्स


अधिकृत किंमत अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र, कंपनीने या फोनची तुलना 15,000 रु च्या आतल्या स्मार्टफोन्सशी केली आहे, त्यामुळे किंमत याच रेंजमध्ये असण्याची शक्यता आहे. फोन फ्लिपकार्ट वर विक्रीसाठी उपलब्ध होईल, यासाठी विशेष मायक्रोसाइटही लाईव्ह करण्यात आली आहे.


अपेक्षित स्पेसिफिकेशन्सनुसार, पोको एम 7 प्लस 5जी मध्ये 6.9-इंच डिस्प्ले आणि 144Hz रिफ्रेश रेट असणार आहे. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 6s Gen 3 चिपसेट असण्याची शक्यता आहे. कॅमेरासाठी, मागील बाजूस 50MP प्रायमरी सेंसरसह ड्युअल कॅमेरा सेटअप आणि पुढे 8MP फ्रंट कॅमेरा दिला जाईल.


बॅटरी परफॉर्मन्सबाबत, लीक झालेल्या माहितीनुसार, हा फोन एका चार्जवर 12 तास नेव्हिगेशन, 24 तास व्हिडिओ प्लेबॅक, 27 तास सोशल मीडिया वापर आणि 144 तास ऑफलाइन म्युझिक प्लेबॅक देऊ शकतो. पोको एम 7 प्लस 5जी चे संपूर्ण स्पेसिफिकेशन्स आणि किंमत 13 ऑगस्टच्या लॉन्च इव्हेंटमध्ये जाहीर करण्यात येतील.

Comments
Add Comment

शिवसेना महिला शाखाप्रमुखाला उबाठाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण, उपसभापती नीलम गोऱ्हेंकडून घटनेची दखल, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

मुंबई: वरळीतील शिवसेना शाखा क्र. १९८ च्या महिला शाखाप्रमुख पूजा बरिया यांना काल उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांकडून

मुंबईतील सण उत्सवांसाठी मुंबई पोलीस सज्ज : सणासुदीत कडेकोट बंदोबस्त

मुंबई : मुंबईमध्ये सण, उत्सवांचा हंगाम सुरु झाला आहे . या पार्श्वभूमीवर मुंबईतील पोलीस यंत्रणा बंदोबस्तासाठी आणि

एअर इंडिया एक्सप्रेसची ‘फ्रीडम सेल’ घोषणा

मुंबई : भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एअर इंडिया एक्सप्रेसने “फ्रीडम सेल”ची घोषणा करत प्रवाशांना

कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन दोन दिवस बंद

कोल्हापूर : कोल्हापुरच्या देवी अंबाबाईचे दर्शन दोन दिवस बंद राहणार आहे. सोमवार आणि मंगळवार हे दोन दिवस मूर्तीवर

लाडक्या बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या आणि आता अपात्र जाहीर झालेल्या २६ लाख जणींची चौकशी होणार

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत वर्षभरापासून एक कोटी पेक्षा जास्त

सोमवारपासून अतिमुसळधार

मुंबई : पुढील आठवड्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. १२ ऑगस्टला कमी दाबाचा पट्टा