केएसआर बंगळुरू ते बेळगाव वंदे भारत एक्स्प्रेस बंगळुरू, धारवाड, हुबळी, हावेरी, दावणगेरे, तुमकूर, यशवंतपूर आणि बेळगाव येथे थांबणार आहे. तर श्री माता वैष्णोदेवी कटरा ते अमृतसर वंदे भारत एक्स्प्रेस कटरा, जम्मू तावी, पठाणकोट केंट, जालंधर सिटी, बियास आणि अमृतसर येथे थांबणार आहे. नागपूर (अजनी) ते पुणे वंदे भारत एक्स्प्रेस ही वंदे भारत मार्गातील ८८१ किलोमीटरची सर्वात लांब ट्रेन आहे. वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड, पुणे ही या गाडीच्या मार्गावरील महत्त्वाची स्थानके आहेत.
या वंदे भारत गाड्या आठवड्यातून ६ दिवस धावतील, त्यामध्ये ७ चेअर कार + १ एक्झिक्युटिव्ह चेअर कारसह एकूण ५९० जागा असतील. या गाड्यांसाठी इकॉनॉमी श्रेणीच्या तिकिटांची सुरुवात १५०० रुपयांपासून होईल. महत्त्वाचे म्हणजे या गाड्यांचा सरासरी वेग ताशी ७३ किमी असेल.
बंगळुरू येलो मेट्रो लाईनवर १६ स्थानके
बंगळुरू येलो मेट्रो लाईन ही १९.१५ किमी लांबीची आहे. यात १६ स्थानके आहेत. आरव्ही रोड, रागी गुड्डा, जयदेवा हॉस्पिटल, बीटीएम लेआउट, सेंट्रल सिल्क बोर्ड, बोम्मना हल्ली, होंगरा सँड्रा, कुडलू गेट, सिंगा सँड्रा, होसा रोड, बेरेटा अग्रहारा, इलेक्ट्रॉनिक सिटी, इन्फोसिस फाउंडेशन कोनाप्पाना अग्रहारा, हुस्कुर रोड, हेब्बा गोडी आणि बोम्मासंद्रा येथे मेट्रो थांबणार आहे.
नागपूर (अजनी) ते पुणे वंदे भारत एक्स्प्रेसची वैशिष्ट्ये
नागपूर (अजनी) ते पुणे वंदे भारत एक्स्प्रेस ही सेमी-हायस्पीड एसी चेअर कार सेवा आहे. नवीन वंदे भारत एक्सप्रेस अजनी (नागपूर) येथून सकाळी ९.५० वाजता सुटेल आणि रात्री ९.५० वाजता पुण्याला पोहोचेल. आठवड्यातून सहा दिवस ही सेवा सुरू राहील. सोमवारी नागपूरहून ट्रेन चालणार नाही. पुण्याहून ही ट्रेन सकाळी ६.२५ वाजता सुटून, संध्याकाळी ६.२५ वाजता अजनीला पोहोचेल. नागपूर (अजनी) ते पुणे वंदे भारत एक्स्प्रेस ही वंदे भारत मार्गातील ८८१ किलोमीटरची सर्वात लांब ट्रेन आहे. वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड, पुणे ही या गाडीच्या मार्गावरील महत्त्वाची स्थानके आहेत. या गाडीचे एसी चेअर कारचे भाडे १५०० रुपयांपासून सुरू होईल तर एसी एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे भाडे ३५०० रुपयांपासून सुरू होईल. या गाडीची सेवा १४ ऑगस्टपासून नियमित सुरू होईल.