स्मार्ट मीटरची जबरदस्ती झाल्यास गुन्हे

  45

कर्जत : कर्जत तालुक्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असतो. या समस्येबाबत शनिवारी ‘कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समिती’च्या वतीने महावितरणला निवेदन देण्यात आले. यामध्ये मागील वर्षी केलेल्या आंदोलनातील काही मागण्या अद्याप पूर्ण न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच यावेळी वीज ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर जबरदस्तीने बसवण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित ठेकेदार व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा संघर्ष समितीच्या वतीने ॲड. कैलास मोरे यांनी दिला आहे.

तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात वारंवार वीज खंडित होत असून, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, हॉटेल व्यवसायिक, ऑनलाइन काम करणारे युवक, उद्योजक, फार्म हाऊस व्यावसायिक इत्यादींचे मोठे नुकसान होत आहे. विजेवरील उपकरणे खराब होत असून आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात
होत आहे.

त्यामुळे गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळ तसेच घरोघरी सर्वाधिक वीज लागते, त्यामुळे गणेशोत्सवापूर्वीच विजेची कामे तत्काळ पूर्ण करावीत, तसेच या काळात २४ तास अखंड वीज पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी संघर्ष समितीकडून करण्यात आली.
Comments
Add Comment

थेरोंडा-पालव साकव अखेर कोसळला

प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षितपणामुळे ग्रामस्थ आगीत अलिबाग  : अलिबाग तालुक्यातील थेरोंडा-पालव या दोन

अलिबाग-विरार कॉरिडॉरचे २२ टक्के भूसंपादन

प्रकल्पासाठी ५९३ हेक्टर जमिनीची आवश्यकता शेतकऱ्यांना आतापर्यंत साडेतीन हजार कोटींचे वाटप अलिबाग : शासनाकडे

रायगड जिल्हा परिषदेच्या सात मतदारसंघांमध्ये वाढ

जिल्हा परिषद मतदारसंघाचे ६६ गट; पंचायत समित्यांचे १३२ गण अलिबाग : रायगड जिल्ह्यात रायगड जिल्हा परिषदेच्या सात

खारेपाट भागाला आजही गढूळ पाणीपुरवठा

साथीचे आजार पसरण्याची भीती पेण : पेण तालुक्याच्या खारेपाटातील अनेक गावांना, वाड्यांना नेहमीच पाणीटंचाईचा व

जिल्ह्यातील १ हजार १७२ शेतकरी विमा भरपाईच्या प्रतीक्षेत

बँक खात्याला आधार लिंक नसल्याचा शेतकऱ्यांना फटका अलिबाग : शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या उभारी देण्यासाठी

जिल्ह्याच्या मत्स्यव्यवसाय विकास विभागात मनुष्यबळाचा अभाव

कोट्यवधींचे परकीय चलन मिळवून देणाऱ्या मत्स्यविभागाकडे सरकारचे दुर्लक्ष अलिबाग : अलिबाग जवळच्या समुद्रात