उत्तरकाशीत ढगफुटी, पूर, भूस्खलन; महाराष्ट्रातील एक महिला पर्यटक अद्याप बेपत्ता

  63

उत्तरकाशी : उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली आणि हर्षिल परिसरात ढगफुटीनंतर मुसळधार पाऊस पडला आणि पूर आला. अनेक ठिकाणी भूस्खलन झाले. जमीन खचल्यामुळे ठिकठिकाणी नागरिकांची कोंडी झाली होती. संकटात सापडलेल्या स्थानिकांना आणि पर्यटकांना तातडीने मदतकार्य करुन वाचवण्यात आले. संकटात सापडलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना आता सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. या पर्यटकांना जॉली ग्रँड विमानतळ आणि मताली कॅम्प येथे आणण्यात आले असून ते सुखरूप आहेत. पण एक महिला पर्यटक कृतिका जैन अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. सुरक्षित ठिकाणी पोहोचलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांपैकी बहुतांश पर्यटक राज्यात परतत आहेत. काही पर्यटक त्यांच्या पुढील यात्रांसाठी रवाना झाले आहेत. ही माहिती महाराष्ट्राचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाराज हे उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात धराली येथे घडलेल्या घटनेनंतर तातडीने राज्यातील पर्यटकांच्या मदत व बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचले होते. राज्य शासनाने उत्तरकाशीत राज्यातले पर्ययटक संकटात सापडल्याचे कळताच विशेष नियंत्रण कक्ष सुरू केला होता. या कक्षाद्वारे नातलग, पर्यटक आणि सरकारी यंत्रणा यांच्यात समन्वय निर्माण करण्यात आला. राज्यातील पर्यटक नागरिकांना आवश्यक मदत पोहचवून ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यास प्राधान्य देण्यात आले, असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

उत्तराखंड सरकार, स्थानिक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि महाराष्ट्रातील प्रशासन यांनी संयुक्तपणे काम केले. आपापसांत समन्वय राखला. पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले. जे पर्यटक राज्यात परतणार आहेत त्यांची राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या समन्वयातून परतीची व्यवस्था करण्यात येत आहे. यामुळे उत्तरकाशी येथे अडकलेल्या पर्यटक नागरिकांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

Comments
Add Comment

"वचन पूर्ण केलं" GST कर रचनेच्या बदलावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली: वाढणाऱ्या महागाईचा फटका प्रत्येक देशवासीयांना बसत आहे. त्यात सणासुदीच्या काळांत वाढणारे कर

'या' अल्पसंख्यांकांना पासपोर्टशिवाय भारतात राहण्याची मुभा

नवी दिल्ली : पाकिस्तान, अफगानिस्तान आणि बांगलादेश येथून भारतात आलेल्या हिंदू, शीख, ख्रिस्ती, बौद्ध, जैन आणि पारशी

चेक बाउन्स प्रकरणातील दोषीला तुरुंगवास टाळता येणार

नवी दिल्ली : चेक बाउन्सच्या (चेक वटणं) गुन्ह्यात दोषी ठरलेल्या व्यक्तीला सुनावण्यात आलेली तुरुंगवासाची शिक्षा

नेपाळ, भूतानमधील नागरिकांना व्हिसा-पासपोर्टची गरज नाही!

नवी दिल्ली : नेपाळ आणि भूतानमधील नागरिकांना रस्ते किंवा हवाई मार्गाने भारतात प्रवेश करताना पासपोर्ट किंवा

विक्रमादित्य वैदिक घड्याळाचे उज्जैनमध्ये अनावरण

उज्जैन : बहुचर्चित विक्रमादित्य वैदिक घड्याळ आणि मोबाइल ॲपचे अनावरण मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव

भारतासोबत सेमीकंडक्टरचे भविष्य घडवण्यास जग तयार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : जगाची शक्ती सेमीकंडक्टर चिप्समध्ये एकवटली;पूर्वी तेलाच्या विहिरीद्वारे भविष्य ठरायचे, एक दिवस जग