सणासुदीच्या काळात छोटे व्यापारी ठरतात सायबर फसवणुकीचे बळी

गेल्या वर्षी ७४% एसएमईजना करावा लागला सायबर हल्ल्याचा सामना


मुंबई: सणासुदीच्या काळात छोट्या व्यवसायांच्या विक्रीत वृद्धी होते, पण सायबर फसवणुकीचा धोका देखील वाढतो. या काळात कर्मचारी कमी असतात आणि ऑर्डर वाढलेल्या असतात. याचा च फायदा स्कॅमर्स घेतात. बनावट पेमेंट्स, फिशिंग लिंक्स आणि अर्जंट डिलिव्हरीचे बहाणे वापरून ते सणासुदीचा फायदा घेत असल्याचे एक्सप्रेस वाहतूक कंपनी फेडएक्सने सांगितले. भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद संघटना आणि डेटा सिक्युरिटी कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या मते गेल्या वर्षी ७४% सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एसएमईज) किमान एका सायबर हल्ल्याचे ब ळी ठरले आहेत.


सणासुदीच्या काळात स्कॅमर्स छोटे व्यवसाय टार्गेट करण्याचे नवनवीन फंडे वापरत असल्याकडे फेडएक्सने लक्ष वेधले. स्कॅमर्स खरेदीदार असल्याचं भासवत बनावट पेमेंट रिसीट पाठवतात. पेमें ट न करता माल मिळवण्याचा ते प्रयत्न करतात. इमेलद्वारे पुरवठादार असल्याचं भासवून बँक खात्याचे तपशील बदलण्यास सांगतात. बनावट डिलिव्हरी मेसेज किंवा कॉल करून सिस्टिममध्ये अ‍ॅ क्सेस मिळवतात. तसेच स्कॅमर्स फसवणूक करणारे क्यूआर कोड्स किंवा ओटीपी प्रॉम्प्ट्सना सणासुदीच्या शुभेच्छांप्रमाणे सादर करतात. मोठ्या कंपन्यांच्या नावाने खोट्या ऑर्डर्ससाठी अर्जंट डि लिव्हरीचा दबाव देखील टाकतात.


या अशा स्कॅमपासून वाचण्यासाठी स्मार्ट बनून 'थांबा, विचार करा, मग कृती करा' हा मार्ग अवलंबण्याचा सल्ला फेडएक्सने दिला आहे. काही गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची गरज त्यांनी अधोरेखि त केली जसे की यूपीआय किंवा बँकेच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे हे खात्री करून मगच माल पाठवा. बँक तपशीलातील कोणताही बदल विश्वासार्ह संपर्काकडून पुष्टी करूनच स्वीकारा.अ नोळखी लिंक्स, क्युअर कोड्स किंवा अर्जंट मेसेजेससारख्या गोष्टी ओळखण्यासाठी कर्मचारी प्रशिक्षित करा. बहुपदरी (मल्टी फॅक्टर) ओळख पडताळणी वापरा आणि मुख्य सिस्टिम्सवरील प्रवे श मर्यादित ठेवा. तसेच शंका वाटणाऱ्या गोष्टी कर्मचाऱ्यांनी नोंदवण्यासाठी एक सिस्टीम तयार करण्याचा सल्ला त्यांनी दिला.सध्याच्या डिजिटल जमान्यात, एक चुकीचे क्लिक, एक घाईत घेतलेला निर्णय. तुमच्या व्यवसायासाठी गंभीर ठरू शकतो. छोट्या व्यवसायांनी आपल्या दैनंदिन कामकाजात सायबर सुरक्षिततेच्या सवयी अंगीकारणं खूप गरजेचं आहे.ग्राहक, महसूल आणि प्रतिष्ठा यांचं रक्षण करण्यासाठी ते आवश्यक आहे.


जर तुम्ही सायबर फसवणुकीचे बळी ठरला असाल किंवा संशय आला असेल तर त्वरित स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये किंवा सायबर क्राइम हेल्पलाईन १९३० वर किंवा सायबरक्राईम.जीओव्ही.इन या पोर्टलवर तक्रार नोंदवा. या सायबर हल्ल्याविरोधी भूमिका घेत फेडएक्सने सायबर जागरूकतेसाठी आणि लघु उद्योगांना सुरक्षितपणे डिजिटल व्यवहार करण्यासाठी मदत करणाऱ्या उपक्रमां ना पाठिंबा दिला आहे .

Comments
Add Comment

गोरेगाव गोकुळधामसह आसपासच्या परिसरात अपुरा पाणी पुरवठा, नागरिकांना टँकरने मागण्याची आली वेळ

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव गोकुळधाम येथील भागांमध्ये मागील काही दिवसांपासून कमी दाबाने होणाऱ्या पाण्याची

व्हीव्हीपॅटवरून रणकंदन! कोण खेळतंय रडीचा डाव?

बॅलेट पेपरची मागणी ते व्हीव्हीपॅटचा हट्ट: 'महाकन्फ्यूज आघाडी' गोंधळलेली मुंबई : महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी

भारत पाकिस्तानचे ज्युनिअर हॉकीपटू आले आमनेसामने आणि घडली 'ही' घटना

मलेशिया : पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी धर्म विचारुन पर्यटकांची हत्या केली. यानंतर आशिया चषक

Gold Silver Rate: सोने, चांदी उच्चाकांच्या उच्चांकावर! सोने प्रति तोळा १२८००० तर चांदी १८९००० पार 'या' कारणामुळे

मोहित सोमण: आज युएस चीनमधील सुरू असलेल्या व्यापार द्वंद्वाचा तणाव जागतिक बाजारपेठेत उमटल्याने आज सोने

Cabinet Decision: मंत्रिमंडळाचे ३ मोठे निर्णय: २,२२८ नवी पदे, ५ लाख रोजगार, ५०० कोटींचा निधी!

हायकोर्टात बंपर भरती; महाराष्ट्र बांबू धोरण २०२५ जाहीर; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संस्थेसाठी ५०० कोटींची

२०२६ मध्ये 'कॅश क्रश'मुळे जगाची अर्थव्यवस्था कोसळणार? 'कॅश क्रश' म्हणजे काय?

बाबा वांगाची भयावह भविष्यवाणी; तिसरे महायुद्ध आणि एलियनच्या संपर्काचीही चर्चा 'बाल्कनच्या नोस्ट्रेडॅमस'च्या