आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना दुःखद बातमी! तुमचा Minimum Balance लक्षणीत पटीत वाढणार?

  70

प्रतिनिधी:आयसीआयसीआय बँकेकडून कमाल बँलन्स गरज (Minimum Balance Requirement) मध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांसाठी दुःखद बातमी असल्याने ग्राहकांना मात्र त्याचा फटका बसणार आहे. सगळ्या प्रकारच्या बचत खात्यासाठी हा नवा नियम लागू होणार आहे. १ ऑगस्टपासून हा नियम कार्यान्वित होणार आहे. शहरी व मे ट्रोपॉलिटन शहरात कमीत कमी ५०००० रूपयांची शिल्लक खातेदारांना ठेवावी लागेल तर निम शहरी भागातील ग्राहकांना २५००० रुपये शिल्लक ठेवावी लागेल. ग्रामीण भागासाठी ही मर्यादा १० ००० रूपयांवर वाढवण्यात आली आहे. यापूर्वी शहरी व मेट्रोपॉलिटन शहरासाठी ही मर्यादा १००००, निम शहरी भागासाठी २५०००, व ग्रामीण भागासाठी २५०० रूपये होती. या निर्णयाचा आर्थिक फटका देशातील बँकेच्या करोडो ग्राहकांना बसणार आहे. विशेषतः निम शहरी व ग्रामीण भागातील खातेदारांना या धोरणाचा अधिक फटका बसण्याची शक्यता आहे. जे ग्राहक रेग्युलेटरी पूर्तता न करता किमान शिल्लक (बँलन्स) ठेवणार नाहीत त्यांना बँक मोठा दंड आकारणार आहे.

ज्यांना इतकी रक्कम जमा ठेवणे शक्य होणार नाही त्यांच्यासाठी निर्णय धक्कादायक ठरू शकतो त्यामुळे सहाजिकच ग्राहकांमध्ये नाखुशी पसरण्याची शक्यता आहे कदाचित काही ग्राहक आप ले खाते देखील बंद करू शकतात. बँकेच्या माहितीनुसार, जो ग्राहक आपले खाते शिल्लक नियमित राखणार नाही त्याला तूटीवर ६% अथवा ५०० रूपये जो कमी आहे तो लागणार आहे. निवृत्ती धारकांना मात्र या निर्णयातून सुट मिळणार आहे.

ज्यांची फँमिली बँकिंग खाती असतील त्यांच्यासाठी आवश्यक त्या तरतूदीचे पालन करावे लागणार आहे. तरच त्यांना या दंडातून मुक्तता मिळेल. एकूण फँमिली बँकेच्या खात्यातील १.५ पटीने आवश्यक तरतूदीची पूर्तता न केल्यास तो दंड पडेल असे बँकेने म्हटले आहे. यावर अनेक ग्राहकांनी नाराजीही व्यक्त केली. या अपडेटवर प्रतिक्रिया देताना, अनेक वापरकर्त्यांनी बँक त्यांच्या संपत्तीच्या आधारे "ग्राहकांना फिल्टर" करत असल्याचा आरोप केला. काहींनी या निर्णयाला "एलिटिस्ट" म्हटले, तर काहींनी भारतीय रिझर्व्ह बँकेला (RBI) हस्तक्षेप करण्याची विनंती केली.

'ही नागरिकांची निव्वळ लूट आहे. @RBI लक्षात घ्या, त्यावर झोपू नका. आयसीआयसीआय जनतेच्या खर्चावर इतक्या मोठ्या रकमेवर व्याज मिळवणार आहे. @ICICIBank ला लाज वाटावी. मी शेअर बाजारातील व्यवहारांसाठी बँक खाते ठेवत होतो पण आता मी माझे बँक खाते बंद करणार आहे आणि माझ्या दुसऱ्या बँकेत जाणार आहे, जिथे ते शून्य आहे,' एका वापरकर्त्याने लिहिले.

'याला सार्वजनिक लूट म्हणतात. गरीब आणि उपेक्षित वर्गातील लोकांना बँकिंग सेवा नाकारणे. @ICICIBank द्वारे असे प्रवेश नियंत्रण निर्माण केल्याबद्दल भारतीय संविधानाच्या कलम १४ अंतर्ग त हे लक्षात घेतले पाहिजे. हे सर्व @RBI च्या नाकाखाली घडत आहे.'अशी टिप्पणी आणखी दुसऱ्या वापरकर्त्याने टिप्पणी केली.
Comments
Add Comment

दहशतवाद जगासाठी मोठा धोका : पंतप्रधान मोदी

बीजिंग : दहशतवादाला जगासाठी मोठा धोका असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ठणकावून सांगितले. चीनमधील

शिक्षकांसाठी टीईटी बंधनकारक!

नवी दिल्ली : शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी)उत्तीर्ण करणे आता शिक्षकांसाठी बंधनकारक आहे, असा मोठा निर्णय सोमवारी

'मुंबईला वेठीस धरू नका, आझाद मैदानव्यतिरिक्त रस्ते मोकळे करा'

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि आंदोलकांनी

कांदा खरेदी करूनही नाफेड' , एनसीसीएफने थकविले बळीराजाचे पैसे

नाशिक : राज्यामध्ये केंद्र सरकारच्या नाफेड आणि एनसीसीएफ या दोन संस्थांनी शेतकऱ्यांच्या कांदा खरेदी करून देखील

महिला वर्ल्ड कप खेळणारे संघ होणार करोडपती

दुबई : भारतात ३० सप्टेंबरपासून महिला वनडे विश्वचषक सुरु होत आहे. आयसीसीने या स्पर्धेसाठी बक्षीस रकमेची घोषणा

जगदीप धनखड यांनी राजीनाम्यानंतर ४० दिवसांनी सोडला सरकारी बंगला, आता कुठे राहणार ?

नवी दिल्ली : भारताचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर ४० दिवसांनी दिल्लीतला सरकारी