अमरावतीत आईने मुलीला तर आत्याने भाच्याला दिले जीवनदान

अमरावती : संदर्भसेवा रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी) गेल्या दोन दिवसांत दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यात आईने आपल्या मुलीसाठी मूत्रपिंड दान करून तिचे प्राण वाचवले, तर आत्याने भाच्याला जीवनदान दिले. विशेष म्हणजे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या तब्बल ५८ शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत.

आशना तहसीन ही १८ वर्षीय रुग्ण मुलगी. चांदूर बाजार तालुक्यातील देऊरवाडा या लहानशा गावची. गेल्या तीन महिन्यांपासून डायलिसीस सुरू होते, पण त्रास कमी होत नव्हता. मूत्रपिंड प्रत्यारोपण हा यावरील योग्य उपाय असल्याचे डॉक्टरांनी तिच्या कुटुंबीयांना सांगितले. मुलीच्या पुढील भविष्याचा विचार करून आई रुबीना परवीन यांनी आपले एक मूत्रपिंड हे मुलीला देण्याचा निर्णय घेतला. सुपर स्पेशालिटी रुग्णालयात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत ही शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात आली.

दुसऱ्या दिवशी आणखी एक शस्त्रक्रिया पार पडली. बडनेरा येथील ४० वर्षीय मोहम्मद समीर यांच्यावर गेल्या वर्षभरापासून डायलिसीस उपचार सुरू होते. मूत्रपिंड प्रत्यारोपण हाच योग्य उपाय असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याची माहिती मोहम्मद साबीर यांच्या आत्या अब्रार बेगम अब्दूल सादिक (वय ६०) यांना मिळाल्यानंतर त्यांनी आपले एक मूत्रपिंड मोहम्मद समीर यांना देण्याचा निर्णय घेतला.

ही शस्त्रक्रिया देखील विनामूल्य करण्यात आली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे, विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अविनाश चौधरी, डॉ. हितेश गुल्हाने, डॉ. राहुल पाटोडे, डॉ. विक्रम देशमुख, डॉ. प्रतीक चिरडे, डॉ. विशाल बाहेकर, डॉ. रोहित हातगावकर, डॉ. बाळकृष्ण बागवाले, डॉ रमणिका ढोमणे, डॉ. शीतल सोळंके, डॉ. विक्रांत कुळमेथे, डॉ. माधव ढोपरे, डॉ. जयश्री पुसदेकर, डॉ.नाहीद, डॉ. रमणीय, डॉ. उज्वल अभ्यंकर, डॉ. प्रियंका कांबळे, डॉ. श्रद्धा जाधव, शीतल बोंडे, ऋषिकेश धस, डॉ.सोनाली चौधरी, डॉ. पायल रोकडे, डॉ. दिव्यानी मुंदाने यांच्यासह चमूचे सहकार्य लाभले.
Comments
Add Comment

रोहित आर्याने विनापरवानगी शाळांकडून पैसे गोळा केले!

नागपूर : पवई येथे १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याच्या एन्काऊंटर प्रकरणाची चर्चा मंगळवारी विधानसभेत झाली.

'तुकडेबंदी' शिथिल करणारे विधेयक विधानसभेत मंजूर

सातबारावर आता स्वतंत्र नाव लागणार नागपूर : राज्यातील नागरी वस्त्यांमध्ये गुंठेवारी किंवा लहान भूखंडांवर

शरद पवारांच्या पक्षातील सूर्यकांत मोरे विरोधात हक्कभंग

जामखेड : जामखेड नगरपालिका निवडणूक प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सूर्यकांत मोरे

मंत्री नितेश राणे यांचे विधानपरिषदेत आश्वासन; महिलांच्या सुरक्षेसाठी विदेशातून 'हँड ग्लोज' मागवणार

नागपूर: नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मच्छीमार व्यवसायातील महिलांना कोळंबी सोलत असताना होणाऱ्या शारीरिक

गुटखा विक्रेत्यांना 'मकोका' लावणार!- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; गुटखा बंदीसाठी कायद्यात बदल करणार

नागपूर : "गुटखा विक्री करणाऱ्यांवर मकोका लागू करण्याचा प्रस्ताव विधी आणि न्याय विभागाकडे पाठवण्यात आला होता.

विधानपरिषद सभापती-सदस्यांचा अपमान केल्याप्रकरणी सूर्यकांत मोरे हक्कभंगाच्या कचाट्यात

नागपूर: नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या एका पदाधिकाऱ्याने केलेल्या