अकरावीच्या ओपन टू ऑल फेरीला मुदतवाढ

मुंबई : अकरावी अर्थात FYJC प्रवेशाच्या चार नियमित फेऱ्यांची प्रक्रिया झाली आहे. आता अकरावीच्या ओपन टू ऑल फेरीची प्रक्रिया सुरू आहे. या फेरीला सोमवार ११ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याआधी या फेरीची मुदत ८ ऑगस्ट पर्यंतच होती. मात्र राज्य सरकारने नारळीपौर्णिमा व रक्षाबंधनाच्या सुटीचा विचार करुन अकरावीच्या ओपन टू ऑल फेरीला सोमवार ११ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिली.

ओपन टू ऑल या फेरीमध्ये प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना सोमवार ११ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रवेश घेता येईल. या फेरीसाठी प्राधन्यक्रम अंतिम केलेल्या ३ लाख ८१ हजार ४२० विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ४८ हजार ७८४ विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राधन्यक्रमानुसार कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जागा उपलब्ध केल्या आहेत. ८ ऑगस्टपर्यंत या फेरीअंतर्गत ३ लाख १५ हजार ३११ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. यातील नियमित फेरीमध्ये ३ लाख १० हजार ७०८ इतके प्रवेश झाले आहेत. तसेच कोटामध्ये ४ लाख ६०३ इतके प्रवेश झाले आहेत. ज्यांची प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, अशा प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांकडे सोमवार ११ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वेळ आहे.
Comments
Add Comment

महायुतीच्या आमदारांना सामाजिक न्याय मंत्र्यांकडून प्रत्येकी २ कोटींचा विकासनिधी वाटप

मुंबई : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रथमच निवडून आलेल्या

अल्पवयीन मुलींना दारू पाजल्याचा आरोप, अंधेरीतील 'हॉप्स किचन अँड बार'वर गुन्हा दाखल

मुंबई: अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला परिसरातील 'हॉप्स किचन अँड बार' या पबच्या व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध

मुलुंड पश्चिम येथील पक्षीगृह बांधण्याच्या निविदेला प्रतिसाद मिळेना...

मुंबई (खास प्रतिनिधी) : नाहूर, मुलुंड पश्चिम येथे मुंबई महापालिकेच्या वतीने पक्षीगृह उभारण्यात येणार असून या

दिवाळीनिमित्त मुंबई विमानतळावर रोषणाईची अनोखी सजावट

मुंबई: दिवाळीच्या पूर्वसंध्येला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आकर्षक पद्धतीने उजळून

राज्यातील ४७ महसूल अधिकाऱ्यांना बढती

मुंबई : दिवाळीच्या पर्वावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील ४७ महसूल

जगातील टॉप १० सर्वात श्रीमंत व्यक्तींची नावे तुम्हाला माहिती आहेत का? या यादीत भारत पिछाडीवर

मुंबई : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये अनेक उद्योगपतींनी नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करत त्यांच्या