कपिल शर्माच्या कॅफेवर महिन्याभरात दुसऱ्यांदा गोळीबार

मुंबई : कॉमेडिअन कपिल शर्माच्या कॅनडातील रेस्टॉरंट कॅप्स कॅफेवर महिन्याभरात दुसऱ्यांदा गोळीबार झाला. काही आठवड्यांपूर्वी झालेल्या गोळीबाराची जबाबदारी खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंह लाडी यानं स्वीकारली होती. आता दुसऱ्यांदा गोळीबार झाला आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीने हा गोळीबार केल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खानसोबत जवळीक असल्यामुळे कपिल शर्माला धमकी देण्यात आल्याची चर्चा आहे. 'जो बॉलवूड अभिनेता सलमान खानसोबत काम करेल, तो संपेल' (जो सलमान के साथ काम करेगा वो मरेगा...) सअशी धमकी लॉरेन्सच्या गुंडांनी दिली आहे. या धमकीची एक ऑडिओ क्लिपही व्हायरल होत आहे.

कपिल शर्माने बॉलिवूड अभिनेता सलमान खानला 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या दुसऱ्या सीजनच्या पहिल्या एपिसोडमध्ये बोलवले होते. यामुळेच बिश्नोई टोळी नाराज झाली आणि त्यांनी कपिलच्या कॅफेवर गोळीबार केला, असे वृत्त आहे.

हॅरी बॉक्सरची व्हायरल ऑडिओ क्लिप

सलमान सोबत जो जो काम करेल, तो तो संपेल... प्रत्येक वेळी सांगत बसणार नाही, जो सलमानसोबत काम करेल, त्याच्यावर गोळी झाडली जाईल... असे हॅरी बॉक्सर म्हणाला. त्याची या वक्तव्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे.

बॉलिवूडमध्ये भीतीचे वातावरण

सलमानसोबत काम केले तर... ही इंडस्ट्रीला मिळालेली धमकी आणि कपिल शर्माच्या कॅफेबाहेर दोन वेळा झालेला गोळीबार यामुळे बॉलिवूडमध्ये भीतीचे वातावरण आहे.

काळवीट शिकार प्रकरण

राजस्थानमध्ये काळवीट शिकार प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई सलमान खानला दोषी समजतो. यामुळे बिश्नोई टोळी सलमानला ठार मारण्याच्या प्रयत्नात आहे. याच कारणामुळे सलमानने खासगी संरक्षण घेतले आहे. शिवाय पोलिसांकडूनही त्याला संरक्षण दिले जात आहे.
Comments
Add Comment

Gold Rate : सोने - चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ होणार!

मुंबई : श्रावण महिना सुरू होताच सोने - चांदी खरेदीदारांची रेलचेल वाढू लागते. येत्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर

Nashik : नाशिक-नांदुरी रस्त्याच्या रुंदीकरण कामाची पाहणी, गुणवत्ता निकषांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश

Nashik : सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या (Simhastha Kumbh Mela 2027) पार्श्वभूमीवर नाशिक–नांदुरी रस्त्याच्या (Nashik-Nanduri road) सुरू असलेल्या

Annasaheb Patil Mahamandal : अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांची तडकाफडकी बदली

- अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या अहवालानंतर मुख्यमंत्र्यांचे आदेश मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास

Abishek Porel : क्रिकेटपटू अभिषेक पोरेल हुगळीत अटक; कथित बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू आणि बंगालचा क्रिकेटपटू अभिषेक पोरेल याला हुगळी येथे एका कथित बलात्कार प्रकरणात

Gadchiroli : गडचिरोली सर्पदंश प्रकरणात संबंधित आश्रम शाळेचा परवाना रद्द

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश; राज्यातील सर्व अनुदानित आश्रमशाळांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी

Maharashtra Rain : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट; पुढील 3 तासांसाठी हवामान विभागाचा इशारा

मुंबई : महाराष्ट्रातील (Maharashtra Rain) काही भागांमध्ये आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, भारतीय हवामान विभागाने