नांदेड : मुखेड तालुक्यातील बिल्लाळी गावात एका पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने एका म्हशीचा मृत्यू झाला. ही घटना अत्यंत गंभीर असून, मृत्यूपूर्वी या म्हशीचे दूध गावातील अनेक ठिकाणी वितरित झाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेमुळे घाबरलेल्या १८२ गावकऱ्यांनी रेबीजची लस घेतली आहे.
मुंबई : विंचू चावलेल्या एका तीन वर्षांच्या मुलाचा जीव, एका दुर्मीळ इंजेक्शनमुळे वाचला आहे. सोमवारी रात्री ८ च्या सुमारास वैतरणामध्ये आपल्या घरात ...
काय आहे प्रकरण?
बिल्लाळी गावातील रहिवासी किशन दशरथ इंगळे यांच्या म्हशीला काही दिवसांपूर्वी एका पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला होता. कुत्र्याच्या चाव्याची लक्षणे उशिरा लक्षात आल्यामुळे वेळेत उपचार होऊ शकले नाहीत आणि ५ ऑगस्ट रोजी म्हैस दगावली. म्हशीच्या मृत्यूआधी तिचे दूध गावात वाटले गेले होते. या दुधाचा वापर चहा आणि इतर खाद्यपदार्थांमध्ये झाल्यामुळे, सुमारे १८० लोकांनी ते प्यायले असा अंदाज आहे. त्यामुळे रेबीजची भीती पसरली.
या घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाने तातडीने गावात पथक पाठवले. रेबीजच्या संशयामुळे आणि भीतीपोटी गावकरी मोठ्या संख्येने लस घेण्यासाठी पुढे आले. येवती येथील ९८, राजुरा येथील २५, बाराळी येथील १९ आणि देगलूर येथील १० जणांसह एकूण १८२ लोकांना रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. या प्रकरणात आरोग्य पथक गावातच तळ ठोकून आहे. डॉ. प्रणिता गव्हाणे यांनी सांगितले की, म्हशीला रेबीज झाला असल्याच्या भीतीने लोकांनी लस घेतली.
रेबीजबद्दल जागरूकता आवश्यक
रेबीज हा अत्यंत घातक आजार असून, भारतात दरवर्षी हजारोंच्या संख्येने लोक याला बळी पडतात. कुत्र्यासोबतच लांडगा, कोल्हा आणि इतर पाळीव प्राण्यांच्या चाव्यामुळेही हा आजार होऊ शकतो. भारतात आढळणाऱ्या ९६ टक्के रेबीजच्या घटना कुत्र्याच्या चाव्यामुळेच होतात. रेबीजची लस मोफत उपलब्ध असूनही, याविषयी पुरेशी जागरूकता नसल्यामुळे अनेकदा गंभीर परिणाम होतात. त्यामुळे अशा घटनांनंतर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.