मोखाडा नगरपंचायत रिक्त पदे; कंत्राटी कर्मचाऱ्यांवर भार

‘कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे’


मोखाडा : मोखाडा नगरपंचायत ही आता रिक्त पदांची पंचायत झाल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी येथील अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या झाल्या यामध्ये मुख्याधिकारी यांची सुद्धा बदली झाली. त्यानंतर नवीन मुख्याधिकारी येण्यासाठी तीन ते चार महिने लागले, मात्र आता या कार्यालयातील महत्त्वाची पद मात्र अद्यापपर्यंत रिक्त आहेत. यामध्ये महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा १, महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारक व प्रशासकीय सेवा ३ पदे महाराष्ट्र नगर परिषद नगर रचनाकार आणि विकास सेवा १ पद आणि स्वच्छता निरीक्षक २ पदे अशी एकूण ७ पदे मंजूर आहेत मात्र आज घडीला यापैकी एकही पद भरले गेले नसल्यामुळे अगोदरच कमी असलेल्या कर्मचाऱ्यावरच या पदांचा भार टाकून कसाबसा कारभार चालवला जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.


एखाद्या शहराचा सर्व कारभार हा येथील नगरपंचायत नगर परिषद किंवा महानगरपालिका यांच्याद्वारे केला जातो. याशिवाय घरपट्टी, पाणीपट्टी, रस्ते नाले गटारी साफसफाई अशा शहराच्या सर्वच मूलभूत गरजांसाठी नगरपंचायत अतिशय महत्त्वाची असते. यामुळे अशा कार्यालयातील महत्त्वाची सर्वच पद भरलेली असणे गरजेचे आहे. एका शहराचा विकास करण्यासाठी ज्या पदांचे महत्त्व अधिक असते ती पदं भरणे किंवा त्या पदावर कायमस्वरूपी अधिकारी असणे खूप गरजेचे असते. मात्र नव्यानेच निर्माण झालेल्या मोखाडा नगरपंचायतीत महत्त्वाची ७ पद रिक्त असताना नेमका कारभार करायचा कसा, असा सवाल येथील प्रशासनाला पडलेला आहे. प्रशासनाबरोबरच येथील नागरिकांना सुद्धा या रिक्त पदांमुळे त्रास भोगावा लागत आहे.


यामुळे सध्या उपलब्ध असलेले कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांच्यावरच या रिक्त पदांचा भार टाकून कसाबसा कारभार चालवला जात आहे. यामुळे कोणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे याप्रमाणे येथील कामकाज सध्या चाललेले आहे. शासनाने ही रिक्त पदे तत्काळ भरावीत आणि जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.

Comments
Add Comment

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण आणि

Ganeshotsav 2026 Sound Restrictions : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर होणार थेट कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी महत्त्वाच्या

Samruddhi Expressway Traffic Diversion : टाकळीवाडीत गॅस वाहिनीला गळती; खबरदारी म्हणून समृद्धी महामार्गावरील वाहतूक वळवली

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील टाकळीवाडी येथे गेल कंपनीच्या गॅस वाहिनीला गळती लागल्याने प्रशासनाने

Nepal Flood : नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे शर्थीचे प्रयत्न; ४०४ नागरिक सुरक्षित, ३३८ जणांशी संपर्क

मुंबई : नेपाळ येथील महापुरामध्ये अडकलेले महाराष्ट्रातील नागरिक व धार्मिक पर्यटनासाठी गेलेले पर्यटक यांच्या

FSSAI Raid : निकृष्ट दर्जाच्या हिंगावर FSSAIची कारवाई; दोन मोठ्या मसाला ब्रँडच्या विक्रीवर बंदी

मुंबई : ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, भारतीय अन्न सुरक्षा आणि